ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
greasy hair

सतत केस होत असतील चिकट तर आहेत ही कारणं, घ्या जाणून

आपल्या शरीराप्रमाणेच स्काल्पचीदेखील काम करण्याची एक पद्धत असते. स्काल्प दमटपणाची पातळी राखण्यासाठी एक निश्चित प्रमाणात तेलाचे उत्पादन करत असते. हे स्काल्प आणि वातावरणात एक मर्यादित बॅरिअर बनविण्यासाठी मदत करते. पण कधीतरी असे होते की स्काल्प आपल्याला हवं त्यापेक्षा अधिक सीबमचे उत्पादन करते आणि त्यामुळे केस अधिक चिकट आणि ग्रिसी, तेलकट दिसतात. असेदेखील म्हटले जाते की, केस सतत धुतल्यामुळेदेखील केस तेलकट होतात. याशिवाय अनेक कारणे आहेत ज्यामुळे केस अधिक चिकट होतात. सतत केस चिकट होण्याची नक्की काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया. 

अधिक घट्ट आणि स्लीक पोनीटेल बांधणे

एक स्लीक आणि घट्ट पोनीटेल दिसण्यात अत्यंत छान दिसते. यामुळे तुमचे केस अधिक आकर्षक दिसतात. पण जेव्हा तुम्ही स्लीक पोनीटेल बांधता तेव्हा एक नीट लुक देण्यासाठी अनेक स्टायलिंग उत्पादनांची गरज भासते. जे तुमच्या केसांना अधिक चिकट बनवते आणि त्यामुळे केस अधिक तेलकट दिसतात. इतकंच नाही तर अनेक हेअरस्टाईल करताना सीबमचा केलेला वापर हा केसांमध्ये आणि त्याच्या मुळाशी जमा होतात. ज्यामुळे केस चिकट होतात. 

काय करायला हवेः अशी हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये अधिक स्टायलिंग प्रॉडक्टचा वापर करण्याची गरज नसेल. तसंच सतत केसांना ब्रश करण्याची आणि हात लावण्याची गरज नाही याची तुम्ही काळजी घ्या. कारण सतत ब्रश केल्यानेदेखील केसांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त निर्माण होते. 

केस थंड पाण्याने न धुणे

साधारणतः हिवाळ्यापर्यंत महिला या गरम पाण्याने केस धुतात. गरम पाणी हे पोर्स ओपन करतात आणि केसांचे क्युटिकल्स ओपन करून त्यातील घाण काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र तुम्ही त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ न केल्यास, केसांसाठी हे हानिकारक ठरते. वास्तविक गरम पाणी हे स्काल्पमधून सीबम काढून टाकून केस अधिक कोरडे करते. त्यामुळे स्काल्प हे अत्याधिक तेलाची निर्मिती करते आणि त्यामुळे केस अधिक चिकट होतात. हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 

ADVERTISEMENT

काय करायला हवेः शँपू करणे आणि कंडिशनिंग करण्यासाठी तुम्ही नेहमी गरम पाणी वापरा. मात्र शेवटच्या केसांमधील क्युटिकल्स बंद करण्यासाठी केसांना नंतर थंड पाण्याने धुणे अत्यंत गरजेचे आहे. 

केसांना सतत ब्रश करणे

बऱ्याचशा महिलांना याबाबतीत माहीत नसते. पण केसांना सतत हात लावल्याने आणि ब्रश केल्याने केस अधिक तेलकट होतात आणि चिकट होतात. असे होण्याचे कारण म्हणजे केसांना हात लावल्याने तुमच्या हाताचे तेल आणि बॅक्टेरिया केसांमध्ये ट्रान्सफर होतात. हे तुमच्या केसांना अधिक तेलकट आणि चिकट बनवतात. तर तुम्ही सतत ब्रश करत राहिलात तर केसांमधील सीबम पसरतो आणि केस अधिक तेलकट दिसू लागतात. 

काय करायला हवेः तुमच्या केसांना सतत हात लावणे तुम्ही सहसा टाळा. याशिवाय तुम्ही केसांना सतत ब्रश लावणे योग्य नाही. दिवसातून दोन वेळा केसांना ब्रश करणे योग्य आहे. तसंच केसांना फणी लावल्यानंतर तुम्ही ब्रश नेहमी स्वच्छ करावा. 

अधिक तणावात राहणे

अधिक तणावाचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर तुमच्या केसांवरही होतो. तणाव कोर्टिसोलचे अधिक उत्पादन करते. हे हार्मोन तुमच्या त्वचेतून सीबमचे उत्पादन अधिक करण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळे याच्या परिणामस्वरूप, तुमचा स्काल्प अधिक तेलकट आणि चिकट दिसतो. 

ADVERTISEMENT

काय करायला हवेः प्रयत्न करा की, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असा बदल करा, जेणेकरून तुमचा तणाव कमी होऊ शकेल. तसंच तुम्ही तुमच्या केसांच्या टाईपनुसार केसांच्या उत्पादनाचा वापर करावा. ज्यामुळे तुमचा स्काल्प आणि केसांमधील तेल तुम्हाला नियंत्रणात आणता येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT