ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
असं काय घडलं की पापाराझीवर एवढी भडकली यामी गौतम

असं काय घडलं की पापाराझीवर एवढी भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न झाल्यानंतर यामी गौतम पहिल्यांदाच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चाहत्यांसमोर येत आहे. यामीचा आगामी भूत पुलिस या महिन्यात सतरा तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. यामीदेखील चित्रपटाच्या  प्रमोशनमध्ये खूप व्यस्त  आहे. नुकतंच एका प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान यामी हटके लुकमध्ये सर्वांसमोर आली. सहाजिकच तिचा लुक कॅप्चर करण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली. पापाराझी जेव्हा सेलिब्रेटीजच्या फोटो पोझ घेत  असतात. तेव्हा ते त्यांच्या नावाने हाक मारून त्यांना  लेफ्ट, राईट अथवा सेंटर असा लुक देण्याची विनंती करतात. मात्र या कार्यक्रमात यामीला फोटोग्राफरने अशी हाक मारली की यामीच्या रागाचा पाराच चढला

काय घडलं भूतपुलिसच्या प्रमोशन दरम्यान

यामी गौतम नुकतीच मुंबईत भूत पुलिसच्या  प्रमोशनसाठी आली होती तिचे दिलखेचक फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर्स तिला निरनिराळ्या पोझ देण्यासाठी विनंती करत होते.  यामी लेफ्ट, यामी राईट, यामी सेंटर असं म्हणता म्हणता… अचानक एका फोटोग्राफरने यामीला “फेअर अॅंड लव्हली इकडे… पुढे बघ” असं अशी कंमेट केली. या कंमेटमुळे यामी चांगलीच भडकली. मात्र राग आवरत तिने  त्याला सुनावलं, ” अजून एकदा बोलला ना,तर…” फोटोच्या हसून पोझ दिल्यावर तिने पुन्हा त्याला सुनावलं की, ” आदराने बोलायचं, अशा नावाने नाही” यामीला असं संबोधल्यामुळे तिच्या रागाचा  पारा चढला होता. मात्र तिने त्या फोटग्राफरला जिथल्या तिथे चांगलंच सुनावलं आणि ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली.

एकता कपूरची मराठमोळी ‘कुसुम’ शिवानी बावकर

काय आहे भूत पुलिस

यामीचा आगामी चित्रपट भूतपुलिस 17 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. ज्यात यामीसोबत सैफ अली खान, अर्जून कपूर, जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचे शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये झालं आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अर्जुनला भेटण्यासाठी मलायका आणि सैफ अली खानला भेटण्यासाठी करिना पाचव्या महिन्यात गरोदर असताना हिमाचलमध्ये गेली होती. या चित्रपटात यामी एका मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. या प्रॉपर्टीमधील भूतांना घालवण्यासाठी ती भूत पुलिस हायर करते. ज्यातून चित्रपटात अनेक गमती जमती घडताना दिसणार आहेत. 

ADVERTISEMENT

हमारी अधुरी कहानी’ #sidnaaz च्या चाहत्यांना दुःख अनावर

जलेबी बेबी’ लुकमुळे झाली मल्लिका शेरावत ट्रोल

03 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT