ADVERTISEMENT
home / मनोरंजन
shivani baokar - kusum

एकता कपूरची मराठमोळी ‘कुसुम’ शिवानी बावकर

साधारण एक दशकापूर्वी एकता कपूरच्या (Ekta Kapoor) ‘कुसुम’ (Kkusum) या मालिकेतून नौशाद अली सरदार (Naushad Ali Sardar) ही अभिनेत्री घराघरात पोहचली होती. अगदी शाळेतल्या मुलींपासून ते वडीलधाऱ्या माणसांपर्यंत ही मालिका पाहिली जात होती. आता याच नावाची आणि तशाच स्वरूपातील मालिका मराठीमध्ये लवकरच येत आहे. सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि महेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे.

अधिक वाचा – येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेला नवं वळण, होणार प्रिया मराठेची एन्ट्री

कुसुमचा पहिला प्रोमो प्रसारित

कुसुम ही मालिका लवकरच येणार असून त्याचा पहिला प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे. या  प्रोमोमध्ये लोकलमध्ये कुसुमची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा ‘बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे’, असं सांगते. त्यावर ‘अजूनही तूच करतेस त्या घरचं?’ असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का?’मसर्वच मुलींच्या मनातला प्रश्न कुसुमने यात बोलून दाखवला आहे आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली एक वाटते. सामान्य घरातील आणि नेहमी आपल्या माहेर आणि सासरचा विचार करणारी अशी साधी आणि तरीही वेगळी अशी ही कुसुम शिवानी बावकर साकारताना दिसणार आहे. खरं तर आपल्याकडे सासरी गेल्यानंतर माहेरची नाळ तुटते असा समज आहे. पण हल्ली मुली माहेर आणि सासर दोन्ही व्यवस्थित सांभाळताना दिसून येतात. मुलांपेक्षा मुलीच अधिक कणखरपणे आपल्या आई-वडिलांची जबाबदारी उचलताना दिसून येतात. या स्वरूपाची ही कथा असल्याचे दिसून येत आहे. 

अधिक वाचा – मुलगी झाली हो’… अभिनेत्री स्मिता तांबे झाली आई

ADVERTISEMENT

एकता कपूरने शेअर केला प्रोमो

एकता कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचा प्रोमो शेअर केला असून बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा मराठीत पाऊल ठेवत असल्याचे सांगितले आहे. याआधी काही वर्षांपूर्वी एकता कपूरने मराठी मालिकेची निर्मिती केली होती ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता आणि मराठी मालिकेतून अभिजित खांडकेकर हा नवा चेहरा मिळाला. आता शिवानी बावकर आपल्या अल्लड भूमिकेतून सर्वांना माहीत आहे. मात्र ही अशी सर्वांना जपणारी आणि जबाबदारी उचलणारी कुसुम शिवानी कशी साकारणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवानीचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे या मालिकेतून नक्की शिवानीचे काम कसे होणार आणि तिच्यासह अन्य कोणकोणते कलाकार आहेत याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. तर जुन्या हिंदी मालिकेनुसारच हीदेखील मालिका असणार का यासारख्या चर्चांनाही सुरूवात झाली आहे. हिंदी आणि मराठी प्रेक्षकांमध्ये खूपच तफावत असते. त्यामुळे मूळ कथेत नक्कीच बदल करण्यात आला असेल असेही प्रेक्षकांना वाटत आहे. दरम्यान ही मालिका नक्की कोणत्या मालिकेच्या ठिकाणी सुरू होणार याबाबत अजूनही कळले नाहीये. पण लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शीतली म्हणून जसे आपल्याला प्रेम मिळाले तसेच प्रेम कुसुम म्हणूनही मिळेल असा विश्वास शिवानीला नक्कीच आहे. 

अधिक वाचा – शनाया कपूरला पाहून म्हणाले ही तर दुसरी अनन्या पांडे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT