व्हजायनल हेल्थ (Vaginal Health) महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गोष्टीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. खराब यौन आरोग्य हे तुमच्या यौनसंबंध आणि जीवनशैलीवर वाईट प्रभाव टाकतात. त्यामुळे योनीसंबंधित कोणतीही समस्या हे शारीरिक आणि मानसिक त्रासाचे कारण ठरते. योनीबाबात महत्त्वाची माहिती ही प्रत्येकाला माहीत असायला हवी. निरोगी योनी एक महिलांना नेहमीच फायदेशीर ठरतेय यासाठी खाण्याच्या योग्य सवयी, चांगली लाईफस्टाईल आणि चांगल्या सवयी असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा अनेक महिलांना अंगावरून पांढरे जाण्याची समस्या उद्भवते अर्थात व्हाईट डिस्चार्जचा त्रास अनेक महिलांना असतो. ल्युकोरिया हा व्हाईट डिस्चार्ज होण्याचा अर्थात श्वेतपदराचा (Shwetpadar) आजार तरूण मुलींमध्ये होणे सामान्य आहे. तरूण अथवा मध्यमवयीन महिलांमध्ये अंगावरून पांढरं जाण्याचा त्रास अधिक पाहायला मिळतो. औषधे घेऊन अथवा योगाचा आधार घेऊन तुम्हाला ही समस्या दूर करता येऊ शकते. त्याआधी याची लक्षणे जाणून घ्या.
काय सांगतात तज्ज्ञ
महिलांमध्ये व्हजायनल डिस्चार्ज अर्थात अंगावरून पांढरं जाणं (Shwetpadar) हे प्रजनन प्रक्रियेसाठी एक सामान्य भाग आहे. हा स्राव महिलांच्या आरोग्याला चांगले राखण्यास मदत करतो. पाळीच्या आसपास अनेक महिलांना अंगावरून पांढरं जातं हेदेखील सामान्य आहे. जेव्हा महिलांचा मेनोपॉजचा कालावधी असतो तेव्हा अधिक प्रमाणात अंगावरून पांढरं जातं असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. कधी कधी हे बॅक्टेरिया अथवा संक्रमणामुळे होते. तेव्हा यावर उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. योगिक दृष्टीकोनातून ज्या महिलांना हे संक्रमण होते, त्यांनी प्राणायाम आपल्या सकाळच्या व्यायामात समाविष्ट करून घ्यायला हवा. तसंच वज्रासन आणि पश्चिमोत्तानासन अशा आसनाचा समावेश करून घ्यावा. यामुळे आंतरिक स्वास्थ्य राखण्यास आणि तणावापासून मुक्त राहण्यास मदत मिळते.
तसंच तुम्ही सकाळी चालणेदेखील आपल्या रूटिनमध्ये समाविष्ट करून घ्यावे. सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी सूर्याची पहिली किरणं ही प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो आणि अंगावरून पांढरंही कमी जाते.
वज्रासन
- सर्वात पहिले तुम्ही गुडघ्यावर जमिनीवर बसा
- त्यानंतर दोन्ही पायांचे अंगठे एकत्र आणा आणि आपल्या टाचा जोडून ठेवा
- त्यानंतर आपले हिप्स हे मागच्या टाचांवर टेकवा आणि आपले हात तुम्ही गुडघ्यावर ठेवा
- या दरम्यान आपली पाठ आणि आपले डोके सरळ रेषेत ठेवा
- लक्षात ठेवा की या दरम्यान तुमचे दोन्ही गुढघे एकमेकांना टेकायला नको आणि यावेळी श्वास घेत राहा
- तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तुम्ही या आसन स्थितीमध्ये बसून राहा. पायातून गोळा येत आहे असं वाटू लागेल तेव्हा हे आसन तुम्ही सोडा आणि मध्ये एक मिनिट्स थांबून पुन्हा एकदा अशा पद्धतीने वज्रासन करा
पश्चिमोत्तानासन
- पाय समोर ठेवा आणि पसरवा. तुम्ही तुमचे गुडघे यादरम्यान थोडे दुमडू शकता
- श्वास घेताना तुम्ही आपल्या दोन्ही बाजू वर उचला आणि असे करताना तुम्ही तुमची हाडे वाकवू नका
- शरीराच्या वरच्या बाजूच्या आणि खालच्या बाजूच्या भागावर तुम्ही लक्ष द्याा आणि मग दीर्घ श्वास घ्या आणि पुढे वाका
- त्यानंतर तुम्ही हाताच्या बोटांनी आपल्या पायाची बोटं पकडण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या गुडघ्याला नाकाने स्पर्श होतोय का पाहा
वाचा – योग निद्रा म्हणजे काय – Yoga Nidra In Marathi
अंगावरून पांढरं जाण्याची कारणं
अनेक आजारांप्रमाणे अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती हेच अंगावरून पांढरं जाण्याच्या समस्येचेही मुख्य कारण आहे. याशिवाय तुम्ही वापरत असलेल्या अंडरगारमेंट्स खराब असतील तर तुम्हाला हायजीनमुळे त्रास होण्याचा धोका असतो. कधीतरी व्हजायनामधून हलकासा पिवळा, लाल अथवा काळ्या रंगाचा लिक्विड पदार्थ येतो. यामुळे तुम्हाला सतत योनीमध्ये खाज येते. यामुळे बद्धकोष्ठता, सतत डोकं दुखणे अथवा पोटाच्या खालच्या भागात दुखणे आणि व्हजायनामधून दुर्गंध येणे अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते. ही सर्व मुख्य कारणे आहेत ज्यामुळे अंगावरून पांढरे जाते.
अंगावरून पांढरं जात असल्यास, घरगुती उपचार
- अंगावरून पांढरं जात असेल तर सर्वात महत्त्वाचा घरगुती उपचार म्हणजे हायजीन पाळणे. व्हजायनाची स्वच्छता व्यवस्थित असायला हवी
- कायम स्वच्छ आणि कॉटनची अंडरवेअर घालण्याचा प्रयत्न करा
- एसटीआयपासून वाचण्यासाठी नेहमी सुरक्षेचा उपयोग करा
- अँटिबायोटिक्स घेताना तुम्ही संक्रमणापासून वाचण्यासाठी दही खा
- आवळा वाटून घ्या आणि याची पावडर गव्हाच्या पिठात अथवा तुम्ही जी पोळी करणार असाल त्यामध्ये मिक्स करून साधारण एक महिना खा. यामुळे तुम्हाला व्हाईट डिस्चार्जपासून सुटका मिळेल
- टॉमेटोचे रोज सेवन केल्यासही तुम्हाला फायदा मिळू शकतो. मात्र टॉमेटोचे सेवन प्रमाणापेक्षा अधिक करू नये
- करवंदाचे सरबत तुम्ही नियमित प्यायल्यास, तुम्हाला याचा फायदा व्हाईट डिस्चार्जसाठी होतो
तुम्हालाही अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास असेल तर तुम्हीही हे योग नक्कीच करून पाहा आणि तुमचा अनुभव आमच्यासह शेअर करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक