ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
yoga-poses-on-belly-use-for-10-minutes-daily-to-reduce-belly-fat-in-marathi

बेडवर उलटे झोपून 10 मिनिट्स योग करा आणि पोटाची चरबी करा कमी

बऱ्याचदा कामात आणि घरसंसारात महिला इतक्या गुंततात की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळही नसतो. वाढत्या वयासह हार्मोनल बदल वाढतात आणि मग त्याचा परिणाम म्हणून वजन वाढते. पोटाच्या आसपास चरबी वाढू लागते. पण महिला अनेकदा वेळ नाही म्हणून व्यायाम करणे अथवा योग करण्यापासून दूर राहतात. पण खास महिलांसाठी अशी काही योगासने आहेत, जी सकाळच्या वेळी तुम्ही अगदी तुमच्या बेडवरही करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी या योगासनांचा उपयोग करून घेता येईल. सकाळची केवळ 10 मिनिट्स तुम्ही स्वतःला द्यायची आहेत. तसंच हे योगा करणे अत्यंत सोपे आहे. योगाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शरीराची योग्य काळजी घेऊ शकता, निरोगी आरोग्यासाठी योगा फायदेशीर ठरतो आणि शरीर अधिक मजबूत होण्यास मदत होते. तसंच हाडांची मजबूतीही वाढते. मानसिक ताणतणावापासून सुटका मिळण्यासाठीही योगाचा उपयोग होतो. तसंच स्मरणशक्ती आणि एकताग्रतेसाठीही उपयोगी ठरते योगा. नियमित स्वरूपात तुम्ही योगाचा आपल्या आयुष्यात वापर करून घ्यायला हवा. यासाठी तुम्ही पोटावर झोपून असणारा सोपा योगाही निवडू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी असा सोपा योगा नक्की कोणता आहे पाहूया. 

भुजंगासन (Bhujangasana)

भुजंगासन (Bhujangasana)

भुजंगासन मराठी माहिती साधारणतः सर्वांना असते. पण तरीही वेळ काढून भुजंगासन करणे अत्यंत सोपे आहे. जमिनीशी जोडलेले आसन म्हणूनच याला भुजंगासन असेही म्हटलं जातं. 

  • योगासाठी असलेली मॅट अंथरुन घ्या अथवा तुम्ही हे तुमच्या बेडवरही करू शकता 
  • त्यावर पोटावर झोपा आणि तुमचे पाय जवळ घ्या आणि ताठ ठेवा. हात छातीजवळ दुमडून घ्या
  • दुमडलेल्या हाताला सरळ करुन डोकं, खांदे पाठ उचलून घ्या. पायाचा भाग मात्र तुम्ही उचलू नका
  • हे आसन सापाप्रमाणे दिसते. म्हणूनच याला Snake Pose असेदेखील म्हटले जाते 
  • साधारण 30 सेकंदवर अंग उचलून धरा आणि त्यानंतर ते हळुहळू अंग खाली सोडा आणि रिलॅक्स व्हा
  • सापाचं शरीर जसं लवचिक असतं. अगदी त्याच प्रमाणे तुम्हाला या आसनामुळे लवचिकता येते आणि अनेक फायदे मिळण्यास मदत मिळते. 
  • हे आसन तुम्ही पाच ते सहा सेटमध्ये करू शकता. जेणेकरून तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते 

धनुरासन (Dhanurasana)

धनुरासन (Dhanurasana)

योगासनामध्ये धनुरासन हे असं आसन आहे जे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी आणि हाडांच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते. याशिवाय तुमच्या शरीरामध्ये अधिक चांगला लवचिकपणा येतो. धनुरान मराठी माहिती वाचतना तुम्हाला धनुरासान करण्याचे अनेक फायदे आहेत हे नक्कीच लक्षात येईल. कसे करावे धनुरासन वाचा.  

  • योगा मॅटवर अथवा बेडवर तुम्ही पोटावर झोपा आणि पाय जवळ घ्या तसंच हातही पायाजवळ सरळ रेषेत ठेवा
  • त्यानंतर हळूहळू मागच्या बाजूने पाय वरच्या बाजूला घ्या आणि हात मागे करून पाय पकडा 
  • श्वास आतल्या बाजूला खेचा आणि छाती वर उचला. त्यानंतर तुमच्या मांड्या आणि छातीचा भाग दोन्ही हळूहळू वर उचला. हात तुम्ही पायाच्या दिशेने खेचा 
  • समोरच्या बाजूला चेहरा ठेवा आणि चेहऱ्यावर हास्य टिकवून ठेवा 
  • आपले लक्ष तुम्ही तुमच्या श्वासावर केंद्रीत करा. शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे होईल अशा पद्धतीने तुम्ही आसन करा. हात हे धनुष्याच्या दोरीप्रमाणे काम करते 
  • जोपर्यंत तुमचा श्वास सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने येत आहे तोपर्यंत तुम्ही हे आसन करा आणि दीर्घ श्वास घेत राहा 
  • साधारण 15-20 सेकंद तुम्ही श्वास घ्या आणि सोडा 

त्रिका भुजंगासन (Trika Bhujangasana)

त्रिका भुजंगासन (Trika Bhujangasana)

त्रिका भुजंगासन हा भुजंगासनाचाच एक उपप्रकार आहे. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते आणि तुमच्या पाठीचा त्रासही कमी होतो 

ADVERTISEMENT
  • त्रिका भुजंगासन करण्यासाठी तुम्ही बेडवर उपडी अर्थात पोटावर झोपा 
  • हात तुम्ही खांद्याखाली घ्या
  • पायांमध्ये साधारणतः 2 फूटांचे अंतर ठेवा आणि पायाची बोटं ही जमिनीवर लावा 
  • आता मान उचलताना श्वास घ्या. उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्याकडे पाहा
  • हे आसन साधारणतः 10 सेकंदासाठी तुम्ही रोखून ठेवा. समोर बघा आणि पुन्हा मान वळवा. तुमचे धड खाली घेऊन श्वास सोडा 
  • पुन्हा दुसऱ्या बाजूला हीच प्रक्रिया करा 

सर्पासन (Sarpasana)

सर्पासन (Sarpasana)

आपल्या शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी सर्पासनाचा उपयोग होतो. नियमित स्वरूपात तुम्ही सर्पासन केल्यास, खांदे, हात आणि पाठीच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते 

  • सर्पासन करण्यासाठी तुम्ही मॅटवर वा बेडवर पोटाच्या बाजूने झोपा
  • हात पाठीच्या मागे घ्या आणि पूर्णतः श्वास रोखून धरा 
  • त्यानंतर शरीराचा पुढचा भाग वर घ्या आणि पाय जमिनीवरच राहतील याची खात्री करून घ्या 
  • 10 सेकंदासाठी तुम्ही रोखून ठेवा आणि मग हळूहळू खाली या आणि मग श्वास सोडा

शलभासन (Shalbhasana)

वजन कमी करण्यासाठी शलभासन हे चांगले योगासन मानण्यात येते. तुमच्या पोटावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही या आसनाचा नक्की उपयोग करून घ्या. तसंच मांसपेशी मजबूत करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

  • शलभासन करण्यासाठी तुम्ही पोटाच्या बाजूला झोपा आणि आपले हात मांड्यांजवळ घ्या 
  • श्वास घ्या आणि रोखून ठेवा आणि मग पाय एकत्र वर उचला. मात्र हे करताना गुडघे सरळ ठेवा 
  • तुमचे कपाळ हे जमिनीला टेकवा 
  • 10 सेकंदासाठी तुम्ही रोखून ठेवा आणि मग हळूहळू खाली या आणि मग श्वास सोडा

तुम्हीदेखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी बेडवर उलटे झोपून ही योगासने करू शकता. दिवसातून किमान दहा मिनिट्स स्वतःसाठी काढणे अत्यंत गरजेचे आहे. योग करताना काही महत्त्वाचे नियमही असतात जे तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT