ADVERTISEMENT
home / आरोग्य
Bhujangasana Information In Marathi

जाणून घ्या भुजंगासन संपूर्ण माहिती मराठी | Bhujangasana Information In Marathi

योग हे आरोग्यासाठी वरदान आहे. योगाचे महत्व जाणत आता नव्या लाईफस्टाईलमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. योगमध्ये अनेक आसनांचा समावेश होतो. शीर्षासन, गोमुखासन, हलासन, बकासन, पद्मासन, सर्वांगासान अशी आसनं आपण नक्कीच केली असतील. आज आपण त्यापैकीच एक असलेल्या अशा भुजंगासन या आसनाची संपूर्ण माहिती घेणार (bhujangasana information in marathi) आहोत. याच बरोबर भुजंगासनाचे फायदे मराठी जाणून घेत. हे आसन कसे करायचे, कशी काळजी घ्यायची हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. जेणेकरुन तुमच्या व्यायामामध्ये तुम्हाला या आसनाचा नक्की समावेश करता येईल. चला करुया सुरुवात.

भुजंगासन कसे करावे – How To Do Bhujangasana In Marathi

bhujangasana information in marathi
How To Do Bhujangasana In Marathi

भुजंगासन याला स्नेक पोझ (snake pose) किंवा बॅकवर्ड बेंडिग पोझ (Backward Bending pose) असे देखील म्हणतात. हे आसन सगळ्या आसनांमधील सगळ्यात सोपे असे आसन आहे. या आसनाचा समावेश हा सूर्यनमस्कारामध्ये देखील केला जातो.  त्यामुळे ते कोणालाही करता येते. तुम्हाला हे आसन करण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया 

  1. योगासाठी असलेली मॅट अंथरुन घ्या. 
  2. त्यावर पोटावर झोपा. पाय जवळ आणि ताठ असू द्या.
  3. हात छातीजवळ दुमडून घ्या. 
  4. दुमडलेल्या हाताला सरळ करुन डोकं, खांदे पाठ उचलून घ्या. पायाचा भाग उचलू नका. 
  5. हे आसन एखाद्या सापाप्रमाणे दिसते. म्हणूनच याला Snake Pose असे देखील म्हणतात. 
  6. साधारण 30 सेकंदवर अंग उचलून धरा आणि त्यानंतर ते हळुहळू अंग खाली सोडा आणि रिलॅक्स व्हा. 
  7. सापाचं शरीर जसं लवचिक असतं. अगदी त्याच प्रमाणे तुम्हाला या आसनामुळे लवचिकता येते आणि अनेक फायदे मिळण्यास मदत मिळते. 

भुजंगासन करताना घ्यावयाची काळजी – Precautions To Take While Doing Bhujangasana

निरोगी आरोग्यासाठी योगा  खूप आवश्यक आहे. त्यातील भुजंसानाला वेदनाशमक आसन म्हणून देखील ओळखले जाते. या आसनामुळे तुमच्या कुंडलिनी जागृत होण्यास मदत मिळते. पण या आसनाचे अनेक फायदे असले तरी देखील हे आसन करताना काही काळजी घेणे देखील तितकेच आवश्यक असते. 

  1.  ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे अशांनी हे आसन करताना खूप सावधान राहायला हवे. कारण मागे वागताना जर तुम्हाला त्रासदायक होत असेल तर तुम्ही हे आसन योग्य सल्ल्याशिवाय अजिबात करु नका. 
  2. ज्यांच्या मानेला त्रास आहे त्यांनी देखील हे आसन करताना खूप काळजी घ्यायला हवी. कारण हे  आसन करताना आपण मानेवर बराच ताण देतो. त्यामुळेही मानेचा त्रास असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. 
  3. अपघात किंवा काही कारणास्तव तुमच्या पाठीचा कणा दुखावला असेल तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करु नये. 
  4. खूप जणांना हे आसन केल्यानंतर चक्कर आल्यासारखे होते. कारण मान मागे घेतल्यामुळे आणि डोळ्यांची हालचाल केल्यामुळे हा त्रास होतो. डोळे मिटून जर तुम्ही हे आसन केले तर तुम्हाला त्यामुळे आराम मिळण्यास मदत मिळेल. 
  5. भुजंगासन करताना तुम्ही काही खाल्लेले नसावे. कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या आसनात पोटावर ताण येतो. नुकतेच खाल्लेले असेल तर तुम्हाला उलटी, पोटदुखी होण्याची शक्यता असते. 

भुजंगासनाचे प्रकार – Types Of Bhujangasana In Marathi

भुजंगासन( Bhujangasana Yoga Information In Marathi) जाणून घेताना त्याचे प्रामुख्याने तीन प्रकार सांगितले जातात. तुम्ही जस जसा या आसनाचा सराव करता त्याप्रमाणे त्यातील कठीण प्रकार वाढवत या आसनामध्ये व्हेरिएशन आणले जाते. जाणून घेऊया तीन वेगवेगळ्या प्रकारे हे आसन कसे करायचे

ADVERTISEMENT

भुजंगासन 1

Types Of Bhujangasan In Marathi
भुजंगासन 1
  • आसनासाठी पोटावर झोपावे.
  • दोन्ही हात पाठीच्या दिशेला घेऊन पंजे एकमेकांना जोडून घ्यावेत.
  • आता संपूर्ण शरीराचा भार उचलावा
  • ही आसनाची कठीण अशी स्थिती आहे. कारण हात जमिनीवर न टेकता तुम्हाला संपूर्ण शरीर यामध्ये उचलायचे असते.

भुजंगासन 2

भुजंगासन 2
  • आसनासाठी पोटावर झोपावे
  • कपाळ ज्या ठिकाणी टेकले आहे. त्याच्याखाली दोन्ही हात घेऊन एकमेकांमध्ये बोट अडकून घ्यावी. (पोटावर झोपताना खूप जण अशा पद्धतीने झोपतात.) आता अलगद तुम्हाला तुमचे शरीर उचलायचे आहे. यामध्ये तुमचे दोन्ही हात तुमच्या समोरच्या बाजूला असतात.

भुजंगासन 3

भुजंगासन 3
  • आसनासाठी पोटावर झोपावे
  • दोन्ही हात छातीच्या खाली समातंर ठेवावे
  • आता संपूर्ण शरीराचा भार उचलावा.
  • यामध्ये तुमच्या पाठीच्या वरच्या भागाला ताण जाणवतो.

वाचा – पद्मासन माहिती मराठी मध्ये

भुजंगासनाचे फायदे – Benefits Of Bhujangasana In Marathi

भुजंगासन फायदे मराठी - Bhujangasana Benefits In Marathi
भुजंगासनाचे फायदे

भुजंगासन Bhujangasana Information In Marathi घेतल्यानंतर त्याचे फायदे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. हे आसन केल्यामुळे शरीराला नेमके कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया. या शिवाय तुम्ही धनुरासन माहिती देखील जाणून घ्यायला हवी. जाणून घेऊया भुजंगासन फायदे मराठी 

सायटिकासाठी उत्तम

ज्यांना सायटिकाचा त्रास आहे अशांसाठी भुजंगासन हे फारच महत्वाचे असे आसन आहे.  सायटिकामध्ये कंबरेच्या खालच्या नसा सुजतात. अशावेळी खूप जणांना असह्य अशा वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी भुजंगासन मदत करते. 

अस्थमाचा त्रास करते कमी

ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांनी भुजंगासन करायलाच हवे. भुजंगासनामुळे फुफ्फुस ताणली जातात. त्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे अशांनी अगदी हमखास भुजंगासन करायला हवे.

ADVERTISEMENT

नितंबांना टोन्ड करणे

टोन्ड बॉडी ही खूप जणांना आवडते. महिलांमध्ये स्थुलपणा हा ओटीपोटाकडून वाढत जात असतो. अशावेळी पोट, नितंब आणि मांड्यांना ताण देऊन त्यांना टोन्ड करण्याचे काम करते.

ताण-तणाव करते कमी

हल्ली अनेक जण ताण-तणावाखाली असतात. हे आसन केल्यामुळे एक कमालीची शांती मिळते. शरीरावर असलेला ताण कमी होण्यास मदत मिळते. खूप काम केल्यानंतर तुम्ही दोन मिनिट हे आसन केले तरी देखील तुम्हाला कमालीची मन:शांती मिळण्यास मदत होईल.

पोटाचे विकार करते कमी

भुजंगासनाचा ताण हा पोटावर जास्त जाणवतो. खूप जणांना अपचन किंवा पोटाचे अन्य विकार असतात. पोटाला असा ताण मिळाल्यामुळे हे त्रास कमी होतात. चयापचय क्रिया सुरळीत होते. पोटाचे विकार असणाऱ्यांसाठी हे आसन फारच फायद्याचे असे आसन आहे. 

चेहऱ्यावर आणते ग्लो

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी देखील हे एक उत्तम असे आसन आहे. या आसनामध्ये फेस योगा देखील होतो. कारण यामध्ये माण ताणली जाते. शरीराचा रक्तपुरवठा होतो. रक्त पुरवठा सुरळीत झाल्यामुळे त्याचा फायदा त्वचेला देखील होण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

पाठीचा कणा करणे मजबूत

पाठीचा कणा जास्तीत जास्त वर्षे ठणठणीत ठेवायचा असेल तर अशांनी भुजंगासन करायला हवे. कारण या आसनामुळे पाठीचा कणा ताणला जातो. त्यामुळे त्यांना बळकटी येण्यास मदत मिळते.

स्थुलपणा करते कमी

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरावरील फॅट कमी करण्यासाठी हे आसन उत्तम आहे. शरीराला ताण मिळाल्यामुळे पोट, पाठ, नितंब आणि मांड्या यांवरील फॅट कमी होण्यास या आसनामुळे मदत मिळते.

उंची वाढण्यासाठी चांगले

उंची ही खूप जास्त गरजेची आहे. हल्ली खूप जणांना उंचीसाठी औषधे घ्यावी लागतात. चांगली उंची हवी असेल तर भुजंगासन उत्तम आहे.कारण यामुळे पाठ, पाय यांच्यावर चांगला ताण मिळतो. त्यामुळे उंची वाढण्यास मदत मिळते.

खांदे आणि हात करतात मजबूत

शरीराचे सांधे मजबूत कऱण्यासाठी देखील हे आसन उत्तम आहे. खांदा आणि हातावर आपल्या सगळ्या शराराचा भार असतो. त्यामुळे हे मजबूत होण्यास चांगलीच मदत मिळते. 

ADVERTISEMENT

भुजंगासन कोणी करू नये – Who Should Not Do Bhujangasana

भुजंगासन चांगले असले तरी देखील काही जणांसाठी हे आसन त्रासदायक ठरु शकते. कोणी भुजंगासन करु नये हे आपण आता जाणून घेऊया.

  1. ज्यांना मानेचा गंभीर त्रास आहे अशांनी भुजंगासन करु नये 
  2. पाठीचा अपघात झाला असेल तरी देखील हे आसन चांगले नाही. 
  3. ज्यांचा अस्थमा हा अधिक त्रासदायक आहे अशांनी देखील आसन करताना प्रशिक्षिकाच्या मार्गदर्शनाखालीच करणे केव्हाही चांगले

FAQ’S

प्रश्न – भुजंगासन किती मिनिटासाठी करावे?

उत्तर – भुजंगासन हे अनेक कारणासाठी लाभदायी असे आसन आहे. हे आसन तुम्ही साधारण दोन मिनिटांसाठी धरुन ठेवू शकता. त्याहून अधिक काळ हे आसन रोखून धरु नये. कारण त्यामुळे तुम्हाला पाठदुखी होण्याची शक्यता असते. शिवाय मानदुखीही होऊ शकते. त्यामुळे हे आसन जास्त काळासाठी रोखून धरु नये.

प्रश्न – भुजंगासन कधी करावे?

उत्तर – खूप जण भुजंगासन हे केवळ स्ट्रेचिंगसाठी करतात. जर तुम्ही योग नीट करत असाल तर तुम्ही शेवटी भुजंगासन करायला काहीच हरकत नाही. सूर्यनमस्कार घालत असाल तर तु्म्ही हे आसन 12 आसनांमध्ये करता.

प्रश्न – भुजंगासन कोणी करु नये?

उत्तर – भुजंगासन हे आसन लाभदायी असले तरी देखील हे आसन कोणासाठी त्रासदायक आहे हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, ज्यांना पाठीला मार लागला आहे अशांनी हे आसन शक्यतो टाळलेले बरे असते. 

ADVERTISEMENT

भुजंगासनाची माहिती मराठी (Bhujangasana Information In Marathi), भुजंगासन फायदे मराठी आणि कसे करावे जाणून घेतल्यानंतर आता हे आसन करायला अजिबात विसरु नका.

14 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT