ADVERTISEMENT
home / आरोग्य
या योगासनांमुळे वाढेल स्मरणशक्ती, लहान मुलांनी अवश्य करावा सराव

या योगासनांमुळे वाढेल स्मरणशक्ती, लहान मुलांनी अवश्य करावा सराव

योगासनांमुळे शरीर आणि मनाचा सतुंलन राखण्यास मदत होते. शरीराचे आरोग्य राखण्यासाठी योगासनांचा सराव करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते मनाच्या आरोग्यासाठी देखील आहे. आजकाल अनेकांना विसरण्याचा त्रास जाणवतो. मनात असलेली चिंता, काळजी, नैराश्य तुमच्या मनाचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्याची गरज असते. बऱ्याचदा यासाठी पालक अनेक औषधोपचार मुलांवर करतात. मात्र जर विद्यार्थ्यांनी नियमित योगासने केली तरी त्याच्या स्मरणशक्तीत बदल होऊ शकतो. यासाठी जाणून घ्या स्मरणशक्ती वाढण्यासाठी कोणती योगासने करावी. तसंच वाचा निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार | Types of Yoga For Health In Marathi

स्मरणशक्ती वाढवणारी योगासने

स्मरणशक्ती वाढण्यासाठी नियमित काही योगासनांचा सराव करणे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

पद्मासन

पद्मासनाला लोटस पोझ असंही म्हणतात. पद्मासन हे एक बैठ्या स्थितीतील आसन असल्यामुळे विद्यार्थी दिवसभरात कधीही ते करू शकतात. मांडी घालून बसताना या आसनामध्ये फक्त आपली पावले मांडीवर कंबरेच्या दिशेने ठेवायची असतात. सुरूवातील पद्मासनात बसणं कठीण वाटू शकतं. मात्र सरावाने तुम्ही कितीही वेळ पद्मासनात बसू शकता. विशेष म्हणजे या आसनामुळे तुमचे मन शांत होते आणि तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मेडिटेशन अथवा ध्यानधारणेसाठी हे उत्तम आसन आहे. यासाठी वाचा पद्मासन माहिती मराठी | Padmasana Information In Marathi

वज्रासन

पद्मासनाप्रमाणेच व्रजासन हे देखील बैठे आसन आहे. या आसनाला इंग्रजीमध्ये डायमंड पोझ असं म्हणतात. संस्कृतमध्ये वज्रचा अर्थ आहे हिरा आणि या आसनामध्ये बसण्याचा सराव केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन हिऱ्याप्रमाणे मजबूत होते. या आसनामध्ये तुम्हाला पाय गुडघ्यात दुमडून पावलांवर नितंब ठेवून बसावे लागते. ज्यामुळे तुमच्या पाठीचा कणा ताठ होते. श्वासावर नियंत्रण ठेवता येते. या आसनात तुमचे मन शांत झाल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसंच वाचा वज्रासनाचे आश्चर्यचकीत करणारे फायदे (Vajrasana Benefits In Marathi

ADVERTISEMENT

सर्वांगासन

सर्वांगासनाला इंग्रजीमध्ये शोल्डर स्टॅंड असं म्हणतात. कारण या आसनामध्ये तुम्हाला तुमच्या खांद्यावर संपूर्ण शरीराला तोलून धरायचे असते. हे आसन केल्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीर आणि मनाचे आरोग्य सुधारत असल्यामुळे या आसनाला क्वीन ऑफ आसन म्हणजेच आसनांची राणी असंही म्हणतात. या आसनात तोल सांभाळण्यासाठी तुम्हाला मनाची एकाग्रता मिळावावी लागते. सहाजिकच यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. 

पश्चिमोत्तानासन

या आसनामध्ये तुम्हाला बसून पायाच्या दिशेने शरीर पुढे वाकवावे लागते. यासाठीच इंग्रजीमध्ये या आसनाला फॉरवर्ड बेंड असं म्हणतात. या आसनामध्ये पाठीच्या कण्यावर चांगला ताण येतो. ज्यामुळे एकाग्रता वाढवण्यासाठी हे एक चांगले आसन आहे. मन शांत करण्यासाठी आणि डोकेदुखी, ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित हे आसन करावे. मेंदूचे कार्याला  चालना मिळण्यासाठी या आसनाचा चांगला फायदा होऊ शकतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT