ADVERTISEMENT
home / योगासन
padmasana-information-in-marathi

पद्मासन माहिती मराठी | Padmasana Information In Marathi

योगाचे महत्त्व आपल्याकडे अगदी आपल्या पूर्वजांपासून आहे. आजच्या धकाधकीच्यी जीवनात योगा आपले आरोग्य चांगले राखण्यास अधिक मदत करते. योगामधील सूर्यनमस्कार तुम्ही रोज 10 मिनिट्स केले तरीही तुम्हाला त्याचे अद्भुत फायदे मिळतात. 21 जून हा आपल्याकडे ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस’ (International Yoga Day) म्हणून साजरा करण्यात येतो. आजकाल योगा कोट्स वापरण्याची नवी पद्धतही सुरू झाली आहे. निरोगी आयुष्यासाठी योग महत्त्वाचे आहे. योग करताना अनेक आसने केली जातात. यामध्ये शीर्षासन (शिर्षासनाचे फायदे), धनुरासन, हलासन (हलासन माहिती मराठी), मलासन (मलासनाचे फायदे) याचा समावेश आहे. मात्र आपण यामध्ये नेहमी पद्मासनदेखील ऐकले आहे. योगामध्ये पद्मासन अत्यंत प्रसिद्ध आहे. पद्मासन माहिती मराठी (Padmasana Information In Marathi) आम्ही तुम्हाला या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

पद्मासन म्हणजे काय | What is Padmasana In Marathi

पद्मासन म्हणजे काय (What is Padmasana)

कमळाचा अर्थात पद्माचा उपयोग आपल्याकडे फारच प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. कमळ म्हणजे पुनर्जन्म, त्याग, सौंदर्यता, अध्यात्म, संपत्ती, पवित्रता आणि जागतिक नूतनीकरणाचे एक प्रतिकच मानले जाते. अनेक महान कथा आणि देवदेवतांच्या आयुष्याचा कमळ हा अविभाज्य भाग मानला जातो. पद्मासन म्हणजे नक्की काय (Padmasana Information In Marathi) तर दोन विविध शब्दांपासून बनलेला हा शब्द. पद्म अर्थात कमळ आणि आसन अर्थात बसणे. कमळाच्या फुलासारख्या स्थितीमध्ये बसणे म्हणजे पद्मासन. पूर्वपरंपरागत योगीही अगदी पद्मासनाच्या स्थितीत बसल्याचे अनेक लेण्यांमध्येही दिसून आले आहे. त्यामुळे हे आसन अगदी पूर्वपरंपरागत असल्याचे समजते. 

पद्मासनाचे प्रकार | Type Of Padmasana In Marathi

पद्मासन माहिती मराठी घेत असताना आपल्याला पद्मासनाचे प्रकार नक्की किती आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

1. बद्ध पद्मासन (Baddha Padmasana)

बद्ध पद्मासन मराठी माहिती (Baddha Padmasana Information In Marathi) घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. बद्ध पद्मासन हे बद्ध आणि पद्म अशा दोन शब्दांपासून बनलेले आहे. यातील बंध म्हणजे बांधलेले आणि पद्म म्हणजे कमळाचे फूल असा अर्थ आहे. 
बद्ध पद्मासन घालताना दंडासनामध्ये बसावे लागते आणि त्यानंतर हाताने जमिनीवर किंचित दाबावे. हे आसन करताना श्वास घेताना पाठीचा कणा लांब करावा लागतो. पद्मासनाचा हा प्रकार पाठीचा कणा ताठ ठेवण्यास मदत करतो. 

ADVERTISEMENT

2. अर्ध पद्मासन (Ardha Padmasana)

अर्ध पद्मासन (Ardha Padmasana)

अर्ध पद्मासनाची मराठी माहिती हवी (Ardha Padmasana Information In Marathi) असेल तर तुम्ही हे नक्की वाचायला हवे. अर्ध पद्मासन हा पद्मासनाचा एक प्रकार आहे आणि हा करणे सोपे आहे. मात्र तुम्ही तुमच्या प्रशिक्षकाच्या उपस्थितीतच हे आसन करावे. 
अर्ध पद्मासन करताना सर्वात पहिले उजवा पाय ठेवता येत नसेल तर डाव्या पायाने सुरुवात केली तरी चालते. दोन्ही हातांचे अंगठे आणि तर्जनीची अर्थात आपल्या अंगठ्याजवळील बोट हे एकमेकांना चिटकवून ठेवा आणि डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. पाठीचा कणा आणि डोके सरळ रेषेत ठेवायला लागतात आणि मग डोळे बंद करून ध्यानस्थ बसावे जेणेकरून तुमच्या मनाची शांतता वाढविण्यास मदत मिळते. 

पद्मासन कसे करावे, पद्मासन करण्याची योग्य पद्धत | How To Do Padmasana In Marathi

पद्मासन कसे करावे, पद्मासन करण्याची योग्य पद्धत | How To Do Padmasana In Marathi
पद्मासन कसे घालावे, पद्मासन करण्याची योग्य पद्धत 

पद्मासन घालताना तुमचे दोन्ही पाय हे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसण्याची गरज असते. दोन्ही पाय हे दुमडून कमरेजवळ घेतले जातात. याला एक प्रतिकात्मक आसनही म्हटले जाते. ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ फुलते, त्याचप्रमाणे पद्मासन करताना कमळाच्या स्थितीमध्ये असावे. पद्मासन हे तुम्हाला तुमचे मन केंद्रित करण्यास मदत करते आणि त्याशिवाय शरीरातील अनेक चक्रांवर या आसनाचा प्रभाव दिसून येतो. मन संतुलित करण्यासाठी आणि आध्यात्मिक उर्जा जागृत करण्यासाठी या आसनाची मदत मिळते. मात्र पद्मासन नक्की कशा पद्धतीने करायचे (Padmasana Yoga Information In Marathi) आणि पद्मासन करण्याची माहिती (Padmasana Information In Marathi) ही स्टेप बाय स्टेप (Step By Step) – 

  • सर्वात पहिल्यांदा योगा मॅट घ्या. त्यावर सरळ बसा आणि मग पाठीचा कणा ताठ ठेऊन सरळ बसा आणि पाय पसरा 
  • त्यानंतर हळूहळू गुढघा वाकवा आणि डाव्या मांडीवर ठेवा. टाचांनी तुम्ही तुमच्या ओटीपोटाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा 
  • असेच तुम्ही दुसऱ्या पायासोबत जेव्हा पद्मासन घालायला जाल तेव्हा पायाचा स्पर्श ओटीपोटीला करण्याचा प्रयत्न करा 
  • असे करताना डोके आणि पाठीचा कणा तुम्ही व्यवस्थित ताठ ठेवा आणि दीर्घ श्वास घेत राहा 
  • त्यानंतर डोके हळूहळू खालच्या दिशेने न्या आणि हनुवटीने गळ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा
  • दुसरा पाय ठेऊन तुम्ही योगासनाचा सराव करा

पद्मासन घालण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी 

पद्मासन घालण्यापूर्वी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पद्मासन करणे सोपे आहे, मात्र तरीही तुम्ही त्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि मगच पद्मासनाचा सराव करावा. 

  • पद्मासनाचा नियमितपणे रोज सकाळी सराव करायला हवा. तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेत पद्मासन करणार असाल तर 4 ते 6 तासापूर्वी तुमचे जेवण झालेले असायला हवे. पोटात अधिक अन्न असेल तर तुम्ही पद्मासन घालणं शक्य नाही 
  • पद्मासन करण्यापूर्वी तुम्ही शौचाला जाणे गरजेचे आहे. तुमचे पोट पूर्णपणे साफ असेल आणि रिकामे असेल त्यानंतरच तुम्ही पद्मासन घालावे

पद्मासन घालताना काय सावधानता पाळायला हवी 

  • तुमच्या गुडघ्याला अथवा पायाला, घोट्याला दुखापत झाली असेल तर तुम्हीही कधीही पद्मासन घालू नका 
  • पद्मासनाची सुरूवात करताना तुम्हाला प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच करण्याची गरज आहे. योगगुरूंच्या उपस्थितीमध्येच तुम्ही पद्मासन घाला. हे आसन दिसायला जरी सोपे असेल तर करताना याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. योग्य पद्धतीनेच स्टेप बाय स्टेप तुम्ही हे पद्मासन करा 

पद्मासन करण्याचे फायदे | Benefits of Padmasana In Marathi

पद्मासन करण्याचे फायदे | Benefits of Padmasana In Marathi
पद्मासन घालण्याचे फायदे (Benefits of Padmasana)

पद्मासन घालण्याचे अनेक फायदे आहेत. मनःशांती हा नेहमी मुख्य फायदा समजला जातो. पद्मासनाचे अधिक फायदे काय आहेत, ते पाहूया (Padmasana Information In Marathi). 

ADVERTISEMENT

डोकं शांत राहण्यासाठी पद्मासन करावे

डोकं शांत राहण्यासाठी पद्मासन करावे

पद्मासन हे मुख्यत्वे तुमच्या मनाची शांती राखण्यासाठी आणि डोकं शांत राहण्यासाठी करण्यात येते. पद्मासन करताना ध्यानधारणा करण्यात येते आणि मन एका जागी केंद्रित करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. मन केंद्रित झाल्यावर आपोआप डोकं शांत राहण्यास मदत मिळते. डोकं शांत राहण्यासाठी तुम्ही पद्मासन साधारणतः दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. मात्र तुम्ही दिवसातून एकदा सकाळी केले तर त्याचा अधिक फायदा मिळतो. 

पद्मासन केल्याने गुडघेदुखीपासून मिळते सुटका 

जसजसे वय वाढते तसतशी आपल्या हाडांची झीज होते हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. त्यातही गुडघेदुखी हा तर अत्यंत सामान्य आजार आहे. एका ठराविक वयानंतर गुडघ्यातील हाडे ठिसूळ होतात आणि मग काहीही दुखापत झाली तर त्याचा त्रास होतो. गुडघेदुखी बरी करण्यासाठी पद्मासन अत्यंत फायद्याचे ठरते. पद्मासन करत असताना गुडघ्यांमधून एक विशिष्ट प्रकारचे द्रव्य स्रवते आणि त्यामुळेच गुडघेदुखी दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. आर्थरायटिस आणि गुडघेदुखीची समस्या कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. 

पद्मासन केल्याने गरोदरपणात होतो फायदा 

पद्मासन केल्याने गरोदरपणात होतो फायदा

गरोदर महिलांसाठी व्यायाम केल्याचा फायदा होतो. त्यातही तुम्ही गरोदर असाल तर पद्मासन तुमच्यासाठी लाभदायक मानले जाते. हे आसन करताना गरोदर महिलांच्या शरीराला कोणताही धोका नसतो. तसंच गरोदरपणात महिलांच्या मनावर येणारा ताण आणि होणारी स्नायुदुखी कमी करण्यासाठीही पद्मासन उपयुक्त ठरते. पद्मासनामुळे सांध्यांना अधिक मजबूती मिळते आणि लवचिकतादेखील येते. तसंच पद्मासनाच्या सरावामुळे ताठ बसण्याची सवय लागते आणि पाठीचा कणाही मजबूत होतो. याशिवाय गरोदरपणात तुमची फुफ्फुसे यामुळे व्यवस्थित कार्यरत राहतात आणि तुमची श्वसनक्रिया उत्तम राहते. 

पद्मासन मुळे शरीरात ऊर्जा राहते 

दिवसभर काम करण्यासाठी प्रत्येकाला शरीरात ऊर्जा हवी असते. International Journal Of Yoga मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, पद्मासन केल्याने दिवसभर शरीरामध्ये अधिक प्रमाणात वाढते असं सिद्ध झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी पद्मासन केल्याने मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो आणि यामुळे मेंदूतील स्मरणशक्ती आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकाग्रताही वाढते. पद्मासन करताना ध्यानधारणा करावी लागते, ज्यामुळे डोकं शांत ठेऊन राग कमी होण्यास मदत मिळते आणि डोकं हलकं झाल्यावर शरीरात अधिक काळ ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

पद्मासन केल्याने शांत झोप लागते 

पद्मासन केल्याने शांत झोप लागते

अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. झोप येत नसल्यास अनेक उपाय केले जातात. पण ज्या व्यक्तींना रात्री गाढ झोप लागत नाही किंवा रात्रभर जागे राहण्याची समस्या असते अथवा अनिद्रेची समस्या असते, त्यांना काम केल्याने दिवसभर थकवा येतो. रात्रीची झोप शांत न झाल्यास, डोकेदुखी आणि डोळ्यांची जळजळ, मधुमेह वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अनिद्रेपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला पद्मासन फायदेशीर ठरते. पद्मासनामुळे ताणापासून सुटका होते आणि डोकं शांत होऊन शांत झोप लागण्यास मदत मिळते. 

पद्मासन करण्यापूर्वी करण्याची आसने

पद्मासन करण्यापूर्वी तुम्ही काही आसने घालू शकता. सुरूवातीलाच पद्मासन घालणे योग्य नाही. योगाभ्यास करण्याची एक पद्धत असते. त्यामुळे पद्मासन करण्यापूर्वी तुम्ही कोणती आसने घालू शकता याची माहिती घ्या. 

1. अर्ध मस्त्येन्द्रासन (Ardha Matsyendrasana) 

Ardha Matsyendrasana

अर्ध म्हणजे अर्धा, मत्स्य म्हणजे मासा आणि इंद्र म्हणजे देव. ‘अर्धमत्स्येंद्र’ म्हणजे आपले शरीर अर्धवट वाकवणे किंवा फिरवणे. योगासनातील अर्धमत्स्येंद्र मुद्रा ही आपल्या पाठीच्या कण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे योगासन फुफ्फुसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते आणि याशिवाय गुप्तांगांसाठी खूप फायदेशीर आहे.

2. बद्ध कोणासन (Baddha Konasana)

Baddha Konasana

कोण अर्थात कोन म्हणजे बीजगणितामधील कोण किंवा डिग्रीचा असणारा अँगल. बद्ध कोणासन या आसनाचा अर्थ म्हणजे बसण्याची स्थिती असे म्हटले जाते. बूट, चप्पल शिवणारे अधिकांश मोची अशा आसनामध्ये बसत असल्यामुळे या बसण्याच्या मुद्रेला इंग्रजी भाषेमध्ये ‘कोब्लर पोझ’ (Cobbler Pose) असेही म्हटले जाते. 

ADVERTISEMENT

3. वीरासन (Virasana)

Virasana

वीरासन हे ध्यानधारणेसाठी आणि मनशांतीसाठी उपयुक्त आसन मानले जाते. वीरासन करत असताना तुम्ही जगाच्या संपर्कात राहूनही एकांताचा अनुभव घेऊ शकता. सुप्तावस्थेत आपले मन निद्रिस्त असते आणि असे निद्रिस्त मन हे या आसनाच्या नियमित सरावाने जागृत होते. वीरासन हे दणकट बांध्याच्या आणि कणखर मनाच्या वीर योद्ध्यासाठी निर्माण केले गेले होते असे मानण्यात येते. 

4. जानु शीर्षासन (Janu Sirsasana)

Janu Sirsasana

जानु शीर्षासन हे आसन ज्यांना नव्याने योगा सुरू करायची आहे त्यांच्यासाठी आहे. जानु शीर्षासन हे सगळ्यात सोपे आसन मानले जाते. जानु शीर्षासन नेहमी अष्टांग योग शैलीत केले जाते. हे आसन एका पायाने 30 ते 60 सेकंदांसाठी करण्यासाठी सांगण्यात येते.

पद्मासन केल्यानंतर करावी ही आसने

पद्मासन केल्यानंतरही तुम्ही काही आसने करण्याची गरज आहे. आसनांची एक प्रक्रिया असते आणि त्याप्रमाणेच तुम्ही ती योगामध्ये करायला हवीत. अशी कोणती आसने आहेत ते पाहूया.

अधोमुख श्वानासन (Adho Mukha Svanasana)

Adho Mukha Svanasana

नौकासनासारखी अधोमुख श्वानासनामध्ये शरीराची तयार होणारी अवस्थेच्या अगदी उलट अवस्था असते. नौकासन (Navasana) हे आपल्या शरीरातील पोटातील खालच्या भागातले स्नायू मजबूत करते आणि त्याशिवाय पाठीच्या कण्याला पाठिंबा देते. अधोमुख श्वानासन हेदेखील यासाठीच करण्यात येते. 

ADVERTISEMENT

सुप्त पादांगुष्ठासन (Supta Padangusthasana)

Supta Padangusthasana

सुप्त पादांगुष्ठासन या आसनाच्या नियमित सरावाने आपल्याला मधुमेहासारख्या समस्येवर नियंत्रण मिळवता येते. सुप्त पादांगुष्ठासन आसन नियमित केल्यामुळे वीर्य मेंदूकडे जाते अर्थातच त्याला ऊर्ध्वगती मिळते. सुप्त पादांगुष्ठासन आसन वीर्य वाढविण्यासाठी परिणामकारक असल्यामुळे स्वप्नदोष, नपुसंकता यासारखे रोग बरे होतात.

प्रश्नोत्तरे (FAQs) – Padmasana Information In Marathi

प्रश्न – पद्मासन नक्की कोणत्या वेळी करायला हवे?
उत्तर – पद्मासन तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी करू शकता. मात्र पद्मासन करताना तुमचे पोट रिकामे असणे अत्यंत आवश्यक आहे. भरल्या पोटी तुम्ही कधीही पद्मासन करू नका. 

प्रश्न – पद्मासन केल्याचे काही तोटे आहेत का? 
उत्तर – पद्मासन हे रिकाम्या पोटीच करावे. मात्र तुम्ही नियम न पाळता पद्मासन केल्यास, तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही सावधानता बाळगूनच पद्मासन करावे. 

प्रश्न – पद्मासन कोणत्या वयापासून करता येते?
उत्तर – पद्मासन हे तुम्ही साधारणतः 12 वर्षानंतर कधीही करू शकता. मात्र योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच पद्मासन करावे. 

ADVERTISEMENT

निष्कर्ष – पद्मासन माहिती मराठी

तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या लेखाचा नक्की आधार घ्या. बद्ध पद्मासन मराठी माहिती (Baddha Padmasana Information In Marathi) आणि अर्ध पद्मासन (Ardha Padmasana Information In Marathi) हे दोन प्रकार असून प्रशिक्षकांच्या देखरेखीखालीच हे करावे. 

10 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT