Advertisement

मनोरंजन

युट्युबर कॅरी मिनाटी अडचणीत, दिल्लीत गुन्हा दाखल

Leenal GawadeLeenal Gawade  |  Sep 9, 2021
कॅरी मिनाटी

Advertisement

एखादा चित्रपट आला की, किंवा काही वेगळं आलं की त्यातील चुका शोधून त्याचा व्हिडिओ विनोदी करण्याचा प्रयत्न करतो. असाच काहीसा  व्हिडिओ त्याने केला होता. पण दिल्लीतील एक वकील गौरव गुलाटी यांनी त्याच्या रोस्ट व्हिडिओ विरोधात आवाज उठवला आहे. त्याने कॅरीला कोर्टात खेचले असून त्याच्या व्हिडिओमध्ये महिलांचा अपमान करण्यात येतो. त्यांना नको नको ते शब्द वापरले जातात असे म्हटले आहे. भारतात महिलांचा आदर हा सर्वोच्च स्तरावर असताना आपल्या देशातील एक अशी सेलिब्रिटी ज्याला सगळेच बघतात. त्याने अशाप्रकारे महिलांचा अपमान करणे हे कोणालाच रुचणारे नाही. याचे कारण देतच गौरव गुलाटी याने कॅरीला कोर्टात खेचले आहे.

कॅरीवर आला हा आरोप

जर तुम्ही युट्युब पाहात असाल तर तुम्हाला कॅरीचे व्हिडिओ नेमके कोणत्या स्वरुपाचे असतात ते तुम्हाला नक्कीच कळेल. तो नेहमीच रोस्ट अशा प्रकारचे व्हिडिओ करतो. एखादा चित्रपट आला की, किंवा काही वेगळं आलं की त्यातील चुका शोधून त्याचा व्हिडिओ विनोदी करण्याचा प्रयत्न करतो. असाच काहीसा  व्हिडिओ त्याने केला होता. पण दिल्लीतील एक वकील गौरव गुलाटी यांनी त्याच्या रोस्ट व्हिडिओ विरोधात आवाज उठवला आहे. त्याने कॅरीला कोर्टात खेचले असून त्याच्या व्हिडिओमध्ये महिलांचा अपमान करण्यात येतो. त्यांना नको नको ते शब्द वापरले जातात असे म्हटले आहे. भारतात महिलांचा आदर हा सर्वोच्च स्तरावर असताना आपल्या देशातील एक अशी सेलिब्रिटी ज्याला सगळेच बघतात. त्याने अशाप्रकारे महिलांचा अपमान करणे हे कोणालाच रुचणारे नाही. याचे कारण देतच गौरव गुलाटी याने कॅरीला कोर्टात खेचले आहे. 

कंगनाची महाराष्ट्र सरकारला विनंती, इंडस्ट्रीच्या भवितव्यासाठी पुढे सरसावली

कॅरी मिनाटी सापडला अडचणीत

इतरवेळी सगळ्यांना रोस्ट करु पाहणारा कॅरी त्याच्या या नव्या तक्रारीमुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. कॅरीचे व्हिडिओ तरुण नाही तर लहानमुले देखील बघतात. अशावेळी महिलांप्रती अपमानास्पद भाषा वापरणे  हे अजिबात चांगले नाही. अशांनी त्याच्या युट्युबरवर खूप वाईट असा परिणाम होऊ शकतो. कॅरीच्या या गोष्टीचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यामुळेच की काय आता कॅरीला नक्कीच त्याच्या या गोष्टीसाठी माफी मागावी लागणार आहे. 

माही विजने पती जय भानुशालीला केले इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण वाचून व्हाल हैराण

सगळ्यात जुना युट्युबर

कॅरी मिनाटी हा सगळ्यात जुना युट्युबर आहे. त्याच्या वयाच्या 10 व्या वर्षापासून तो युट्युबवर व्हिडिओ करत आहे. अगदी लहान वयापासून व्हिडिओ करत असल्यामुळेच त्याला जास्त प्रसिद्ध मिळाली. अभ्यासात काहीही रस नसलेला कॅरीने लहान वयात याला सुरुवात केली. तो मुळचा फरीदाबाद येथील आहे. त्याचे नाव अजय नागर असे असून  तो आपले युट्युबवरील नाव कॅरी मिनाटी असे लावतो. कॅरीला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 

आता कॅरी मिनाटीच्या अडचणीत नेमकी आणखी किती वाढ होईल आणि त्याला काय फटका बसेल हे जाणून घ्यावे लागेल .

दीपिकाने केली अमिताभ बच्चन यांच्याकडे रणवीरची तक्रार आणि…