Advertisement

मनोरंजन

माही विजने पती जय भानूशालीला केले इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण वाचून व्हाल हैराण

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Sep 8, 2021
माही विजने पती जय भानूशालीला केले इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण वाचून व्हाल हैराण

टीव्ही स्टार माही विज आणि जय भानुशाली एक सेलिब्रेटी कपल आहे. या दोघांचे प्रेम आणि बॉन्डिग चाहत्यांना नेहमीच आवडतं. हे दोघं परफेक्ट पतीपत्नी आहेतच पण त्यासोबत एकमेकांचे बेस्ट फ्रेंडदेखील आहेत. माही आणि जय दोघंही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्यांचे बॉन्डिंग आणि मजेदार तक्रारी पाहण्यात चाहत्यांना मौज येते. सहाजिकच सोशल मीडियावर दोघांचा खास चाहता वर्ग आहे. मात्र नुकतंच माहीने जयला इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॉक केलं आहे. ज्यामुळे चाहते चांगलेच हैराण झालेत.

श्रुती मराठेचे लुक थक्क करणारे, दिसतेय अप्रतिम

माहीने जयला का केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक

जय भानुशालीने स्वतःच या गोष्टीचा चाहत्यांसमोर खुला सा केला आहे. जयने इन्स्टाग्राम स्टोरीत करत एक पोस्ट शेअर केली आहे. वास्तविक झालं असं की, जयने माही आणि  त्यांची मुलगी तारासोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ज्या फोटोला जयने ‘कुटुंब’ अशी कॅप्शनदेखील दिली होती. मात्र ही पोस्ट न आवडल्यामुळे माहीने जयला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे. माहीने जयला कोणत्या कारणासाठी ब्लॉक केलंय हे कारण ऐकून तुम्ही तर नक्कीच हैराण व्हाल. कारण माहीला वाटतंय की, ती या पोस्टमध्ये  मुळीच चांगली दिसत नाही आहे. माहीचा खराब लुक असलेला फोटो शेअर केल्यामुळे माही नाराज झाली आणि तिने चक्क जयला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं. चाहत्यांना मात्र जयने शेअर केलेला हा फोटो खूपच आवडला आहे. 

विजय देवरकोंडाचा बॉलीवूड डेब्यू रजनीकांत,प्रभासपेक्षाही असणार ग्रॅंड

जय करतोय माहीची अशी मस्करी

जयने यावर माहीची आणखी मस्करी करत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने शेअर केलं आहे. “विचार करा जर पुरूषाने बायकोला ब्लॉक केलं असतं तर त्याचे काय हाल झाले असते. जर हिच गोष्ट मी केली असती तर मला आता पर्यंत खूप लेक्चर ऐकावं लागलं असतं. तुझं माझ्यावरच प्रेमच नाही, तुझे कुठे अफेअर सुरू आहे का वगैरे… यावर जयने चाहत्यांना विनंती केली आहे की, “प्लीज तुम्ही माहीला मेसेज करा आणि मला अनब्लॉक करायला सांगा. कारण माही सध्या माझी इन्स्टाग्राम स्टोरी शूट करताना पाहतेय पण तिला माझी पोस्ट वाचता  येत नाही आहे” हे सांगून जय माहीची खूप थट्टा मस्करी करताना दिसत होता. माही आणि जयची अशी गोड भांडणे पाहायला चाहत्यांना खूप आवडतं. म्हणूनच या क्यूट जोडीचे जगभरात अनेक चाहते आहेत. दीपिकाने केली अमिताभ बच्चन यांच्याकडे रणवीरची तक्रार आणि…