गेल्यावेळी आपण अशा काही राशी पाहिल्या ज्या नेहमीच कंटाळलेल्या असतात. त्यांना नवं असं काहीच करुन पाहावे असे वाटत नाही. पण या 12 राशीपैकी अशा काही राशी आहेत ज्या कायमच Romance साठी तयार असतात. त्यासाठी त्यांना वेळ काळ पाहावा लागत नाही. आता तुमच्याही आजुबाजुला असे काही लोकं असतील तर कदाचित ते आम्ही सांगितलेल्या काही राशींपैकीच एक असणार आहेत. मग बघायच्या नेमक्या कोणत्या राशी कायमच Romance साठी तयार असतात त्या..
वाचा कोणत्या राशीच्या व्यक्ती असतात कंटाळवाण्या
मेष ( Aries)
मेष राशीच्या व्यक्ती या फारच पॅशिनेट असतात.त्या काही बाबतीत कंटाळवाण्या असल्या तरी त्या Romance च्या बाबतीत त्या नंबर वन असतात. प्रेमासाठी त्या कायमच तयार असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती बेडमध्ये त्यांच्या पार्टनरला कायम खूश ठेवतात.सेक्सच्याबाबतीत या व्यक्ती पॅशिनेट असतात. यांना जोडीदारासोबत सेक्सबद्दल बोलायला कायम आवडते.
या राशीच्या व्यक्तींसोबत तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल तर तुम्हाला Love making साठी कायमच तयार राहायला हवे. बाहेर गेल्यानंतर यांना आपले प्रेम दाखवायला एखादा कोपराही पुरेसा असतो. एखाद्या लाँग ड्राईव्हवर गेल्यानंतर या राशीच्या व्यक्ती अगदी गाडीतदेखील Romance सुरु करु शकतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला Sex करण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. कारण या राशीच्या लोकांना नेहमीच काहीतरी नवीन करुन पाहायचे असते.
उदा. जर मेष राशीची स्त्री तुमच्या आयुष्यात असेल तर बेडवर तिचीच सत्ता चालणार हे लक्षात असू द्या.
राशीनुसार असतो तुमच्या जोडीदाराचा स्वभाव, कसा आहे तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
वृषभ (Tarus)
वृषभ राशीच्या व्यक्ती या दिसायला देखण्या आणि सेक्सी असतात. या राशीच्या पुरुषांचा आवाज मादक असतो. त्यांचा आवाज आणि त्यांचे शरीर हे या राशीचे प्लस पाँईंट असून त्यांचा Romance हा अधिक टिकणारा असतो. या राशीच्या लोकांना मेसेजवर किंवा फोनवर नॉटी टॉक करायला फार आवडते. पण प्रेमात पडल्यानंतर या राशीच्या व्यक्ती हे सगळलं करायला थोडा वेळ घेतात. पण एकदा का त्यांचा विश्वास तुमच्यावर बसला की, मग त्या मात्र तुम्हाला अजिबात सोडत नाहीत.
उदा. तुमचा बॉयफ्रेंड वृषभ राशीचा असेल त्याच्यासाठी छान रोमँटीक डेट अरेंज करा. तेव्हा तुम्हाला कळेल की, तुमचा पार्टनर किती रोमँटीक आहे ते.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या व्यक्तीही या कायम रोमँटीक मूडमध्ये असतात. पण या राशीच्या व्यक्ती या नेहमीच स्मार्ट लोकांच्या प्रेमाच पडतात. या राशीच्या व्यक्तीचे मन जिंकायचे असेल तर तुम्हाला त्यांच्यासोबत थोडे स्मार्टच राहावे लागते. या राशीच्या लोकांची जरा जरी तारीफ केली तरी या राशीचे लोक लगेच तुमच्यावर भाळतात.
या राशीच्या व्यक्ती इतक्या रोमँटीक असतात की, त्यांच्या पहिल्याच स्पर्शात तुम्हाला त्यांच्यातील भरलेला रोमाँस जाणवतो. आता या राशीच्या लोकांची एक निगेटीव्ह बाजू सांगायची झाली तर या व्यक्ती कधी कधी Romanceमध्ये इतक्या वाहून जातात की, कधी कधी त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात.
सेक्सच्या बाबतीत सांगायचे झाले तर या राशीच्या व्यक्ती त्याचा पुरेपूर आनंद देतात.
तुमचा आवडता रंग सांगतो तुमचा स्वभाव,तुमचा आवडता रंग कोणता?
सिंह( Leo)
सिंह राशीचे राशीचिन्ह आहे सिंह.. आता सिंह जंगलाचा राजा म्हटला जातो. Romace च्या बाबतीतही ही रास अगदी तशीच आहे. या राशीच्या व्यक्ती शक्तीशाली आणि आत्मविश्वासू असतात.ते जे करतात त्यांना माहीत असते. या राशीच्या लोकांना Romance च्या बाबतीत अगदीच वेगळ्या असतात. त्यांना सेक्स करताना नवीन काहीतरी ट्राय करायला आवडते.
या राशीच्या व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील तर या राशीच्या लोकांना प्रेमात रिझवायचे असेल तर अगदी सोपे आहे. या राशीच्या लोकांची तारीफ करा त्यांच्या केसांसोबत थोडेसे जरी खेळाल तरी या व्यक्ती अगदी Romance साठी तयार होतात. या राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराला सतत खूश ठेवायला आवडते. ते त्यांचे प्रेम वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करतात.
कन्या (Virgo)
जर तुम्ही खऱ्या प्रेमाच्या शोधात असाल तर कन्या राशीचे लोक हे तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. या राशीच्या व्यक्तींना जितके प्रेम दाखवाल तितक्या त्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या प्रेमात पडतात. तुमच्या आयुष्यातील, नात्यातील आनंद या व्यक्ती कमी होऊ देत नाहीत.
प्रेमात असताना या व्यक्ती तुम्हाला अगदी साध्या आणि थंड वाटत असतील. त्यांना Romance आवडत नसावे असे तुम्हाला वाटत असले तरी बेडवर या व्यक्ती फारच रोमँटीक असतात. या राशी सगळ्याच राशीच्या लोकांसोबत रोमँटीक असत नाहीत तर ही व्यक्ती फारच निवडक असतात. त्यामुळे राशीच्या लोकांमधील Romance जागवण्यासाठी तुम्हाला थोडा प्रयत्न तर करायलाच हवा.
तूळ (Libra)
तूळ राशीच्या व्यक्ती या रोमँटीक असतात या वर तुम्हाला विश्वास नसेल तर खरचं या राशी रोमँटीक असतात. या राशीच्या व्यक्तींना खुलायला थोडा वेळ जातो. या राशीच्या व्यक्तींसोबत तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येईल. या राशीच्या व्यक्तींचे राशीचिन्ह तराजू असल्यामुळे या व्यक्ती त्यांचा रोमान्स बॅलन्स करतात. तूळ राशीच्या व्यक्तींना त्याच्या जोडीदारासोबत एकट्यात वेळ घालवायला आवडते. त्यांना त्यांचे प्रेम चारचौघात दाखवायला आवडत नाही. जोडीदारावर कितीही प्रेम असले तरी ही व्यक्ती हे प्रेम चारचौघात दाखवण्यासाठी कचरते. पण एकट्यात या राशीच्या व्यक्ती फारच रोमँटीक असतात.
या राशीचे लोक फारच रोमँटीक असतात. पण ते तसे दाखवत नाही.त्यांच्यातील Romance तुम्हाला जागवायचा असेल तर त्यांना कोणत्याही नव्या गोष्टी फार करायला आवडत नसल्या तरी त्यांना त्यांच्या Classical मुव्हजमध्येच जास्त आनंद मिळतो. या व्यक्ती इतक्या आकर्षक असतात की, त्यांचा तो रोमान्सच अनेकांना आवडतो.
तुमचाही जोडीदार आहे का? असाच रोमँटीक.. मग तो या राशीपैकीच एक असेल नाही का?