मालिका या केवळ मनोरंजनासाठी तयार केल्या जातात हे जरी खरे असले तरी मालिकेमध्ये जे दाखवले जाते त्याचा परिणाम थेट प्रेक्षकांवर होत असतो. झी मराठीवर नुकतीच एक मालिका सुरु झाली आहे ती म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’..निवेदिता सराफ, गिरीश ओक,तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका अगदी हा हा म्हणता लोकांच्या मनात घर करु लागली आहे.आता ही मालिका आवडण्यामागेही काही कारणं आहेत म्हणा.लोकांना नेमकी का आवडतेय ही मालिका ते देखील जाणून घेऊया.
Indian Idolमधील हे विजेते सध्या काय करत आहेत, जाणून घ्या
1. नवी concept
मालिका ही तेव्हाच प्रेक्षकांच्या मनाला भिडते जेव्हा त्याची concept प्रेक्षकांना नवी वाटते. अग्गंबाई सासूबाई ही मालिका सासूच्या पुर्नलग्नाची आहे. इतकी वर्ष मनाने एकटी झालेल्या सासूच्या आयुष्यात एक नवीन आशा घेऊन येण्याचं काम चक्क सूनबाई करणार आहे. त्यामुळे या मालिकेत सासू-सुनेमधील हेवेदावे दाखवण्यात येणार नाही. सासूबाईंना दुसऱ्या लग्नासाठी तयार करणारी एक सूनबाई दिसणार आहे. मालिकेत सध्या हा प्रयत्न सुरु झाला आहे.
2.सून भांडणारी नाही तर घराला शिस्त लावणारी
आता घरात सून आली म्हणजे तिने केवळ सासूच्या चहाड्या.. किंवा सासूने तिचा छळच केला पाहिजे हे दाखवण्याचा जमाना गेला आहे. साधारण मुलं मोठी झाली की, ते आईपेक्षा जोडीदाराचे अधिक ऐकतात. अशावेळी जर जोडीदार योग्य असेल तर घर आपोआपच एकत्र जोडले जाते. तेजश्री प्रधानच्या रुपात पुन्हा एकदा एक गोड सून लोकांना पाहायला मिळाली आहे. घरात केवळ आईनेच काम करायचं अशा आवेशात वागणाऱ्या आज्जेसासऱ्यांना आणि नवऱ्याला शिस्त लावण्याचे काम या मालिकेत एक सून करत आहे. शिवाय असे करताना ती कोणाचीही मनं दुखवत नाही. त्यामुळे तरुणींनी हा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे.
बॉलीवूडचे हे कलाकार आहेत ‘शुद्ध शाकाहारी ‘
3.उगाच रडवून हैराण करत नाही मालिका
आता विधवा सासू दाखवून तिची दु:खद गाथा मांडणारी ही मालिका अजिबात नाही बरं का! उलट निवेदिता सराफ सगळं विसरुन आपलं आयुष्य केवळं तिचा मुलगा असं करुन बसली आहे. ती स्वत:च आयुष्य विसरुन गेली आहे. घर आणि घरासाठी काम करण्याचा तिने सपाटा लावला आहे. पण तरीसुद्धा हे दाखवत असताना कुठेही सॅड म्युझिक वाजवून उगाच ही मालिका रडरड करत नाही म्हणूनतच पाहायला कंटाळा येत नाही.
4.वास्तवदर्शी मालिका
मुळातच ही मालिका आवडण्याचे कारण म्हणजे ती वास्तवाला धरुन आहे. आतापर्यंत या मालिकेत एकही असा प्रसंह दाखवला नाही की, ज्यामुळे ही मालिका… मालिका वाटावी. प्रत्येक घरात एक लाडावलेला मुलगा असतोच आणि काहींच्या घरी खोचक आजोबाही असतील. म्हणजे ते असतात प्रेमळ पण त्यांना ते दाखवता येत नाही आणि प्रत्येक घरातील आईला कामातून कधीच ब्रेक मिळत नाही. तिला कायमच तिच्या मुलांनी चांगले राहावे असे वाटते. पण ती स्वत:कडे कधीच लक्ष देत नाही.
5.चेहरे जुनेच पण अभिनय नवा आणि हवाहवासा
पाहायला गेलं तर या मालिकेत फारच कमी नवीन चेहरे आहेत.आशुतोष पत्की त्यातल्या त्यात लोकांसाठी नवा चेहरा असेल कारण या आधी त्याला नक्कीच अशी ओळख मिळाली नसेल. तर दुसरीकडे निवेदिता सराफ यांनी इतक्या वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. होणारं सून मी या घरची या मालिकेनंतर तेजश्री प्रधान या मालिकेत दिसली आहे. तर एव्हरग्रीन गिरीश ओक यांनी ही खूप वर्षांनी मालिकेत काम केले आहे. जुन्या चेहऱ्यांची नवीन कथेतील ही भट्टी एकदम छान जुळून आली आहे.
बॉलिवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय
मग तुम्हाला ही मालिका कशी वाटली?