आम्ही बेफिकर या चित्रपटाचं ट्रेलर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. कॉलेजमधले अगदी तरुण-तरुणींसाठी अविस्मरणीय दिवस असतात. मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, भांडणं, प्रेम-प्रेमभंग असा सगळं वातावरण कॉलेजच्या दिवसात प्रत्येकालाच अनुभवता येतो. “आम्ही बेफिकर” या चित्रपटातून कॉलेजचं हे अदभूत जग आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या विषयावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट असल्याने तो पेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरू शकतो.. या चित्रपटाचा लुकही यूथफुल असल्याचं आपल्याला या ट्रेलरमधून दिसत आहे. उत्तम कलाकार, धमाल कथा, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला ‘आम्ही बेफिकर’ हा चित्रपट पाहून प्रेक्षकही ‘आम्ही बेफिकर’ म्हणतील यात काहीच शंका नाही.
आम्ही बेफिकर ‘8 मार्च’ ला होणार प्रदर्शित
हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी आम्ही बेफिकर निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही जोडी दिसणार आहे. या दोघांसोबतच राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये असणार आहेत. या चित्रपटासाठी चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात या चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
आम्ही बेफिकरमध्ये दिसणार ‘मिताली आणि सुयोग’ची ऑनस्क्रीन केमिस्ट्री
सुयोग आणि मितालीला अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आपण पाहिलंच आहे. मितालीने आतापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं असून तिचे अनेक चाहते आहेत. सुयोग मुळात डॉक्टर असला तरीही त्याने अभिनयक्षेत्र करिअर म्हणून निवडलं असून त्याचंही फॅन फॉलोईंग चागलं आहे. सुयोगनेही आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. त्यामुळे ‘मिताली आणि सुयोग’ची ऑनस्क्रीन केमिस्ट्री या चित्रपटात प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटामधून कॉलेजचं जीवनविश्व उलगडलं जाणार असल्यामुळे तरूणाईमध्ये याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीसाठी आणि युवांचा आवडता विषय पाहण्यालाठी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
रणवीर सिंगने चित्रपटाचे मानधन घेण्यासाठी का दिला नकार
अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित
भारत चित्रपटामध्ये कतरिना कैफचा ‘सिंपल’ लुक
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम