अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या 'केसरी' चित्रपटाचं ट्रेलर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं. बहुचर्चित 'केसरी' चित्रपट 21 मार्च 2019 ला प्रदर्शित होत आहे. होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केसरी चित्रपट 1896 साली ‘ब्रिटीश इंडीयन आर्मी’ आणि ‘अफगाण पश्तो मिलिट्री’ यांच्यात झालेल्या सारागढी युद्धावर आधारित आहे. या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेतील फक्त 21 शीख सैनिकांनी अफगाण मधील 10 हजार सैनिकांना आपल्या तलवारीने पाणी पाजलं होतं. ही लढाई भारतीय लढायांमधील एक अविस्मरणीय आणि अत्यंत अटीतटीची लढाई ठरली होती. केसरीच्या ट्रेलरमध्ये या लढाईची एक झलक पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार यामध्ये एका तळपती तलवारी आणि पगडीवरील चक्राप्रमाणे दिसणारे एक हत्यार याने लढाई करताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये केशरी रंगाची पगडी आणि सैनिकी पोषाखामध्ये अक्षय दिसत आहे. ट्रेलरमधील अक्षयचे देशभक्ती दर्शवणारे दमदार डायलॉग्स आणि शत्रूला धुळ चाखायला लावणारे सैनिकी शौर्य पाहून 1896 चा काळ डोळ्यासमोर उभा राहतो. चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच हा युद्धपट थिएटरमध्ये पाहतानादेखील अंगात नक्कीच वीरश्री संचारल्याशिवाय राहणार नाही. केसरी मार्चमध्ये होणार प्रदर्शित


करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि अक्षय कुमार यांची निर्मिती असलेला केसरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केसरी  चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणिती चोप्राची प्रमुख भूमिका असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं आहे. केसरीची कथा गिरीश कोहली आणि अनुराग सिंग यांनी लिहीली आहे. 21 मार्चला होळीच्या मुहूर्तावर केसरी चित्रपट पाहणं स्फुर्तिदायक असणार आहे.

'केसरी'च्या ट्रेलरची चाहते करत होते प्रतिक्षा


काही दिवसांपूर्वी अक्षयने त्याचा केसरीमधील लुक इन्स्टावर शेअर केला होता शिवाय सोबत .“ केसरी सिनेमामध्ये काम करणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद असून 21 मार्च 2019 ला या सर्वात धाडसी लढ्यासाठी सज्ज व्हा” असं देखील अक्षयनं या फोटोसोबत शेअर केलं होतं. डोक्यावर भलीमोठी शीख पगडी आणि लांबसडक दाढी असलेला अक्षयचा लुक चाहत्यांना फार आवडला होता. अभिनेत्री परिणिती देखील यामध्ये निळ्या रंगाचा दुपट्टा आणि शीख पंजाबी सूट यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या लुकमध्ये दिसत होती. त्यानंतर या चित्रपटाचे 'ग्लिमसेस' आणि 'टीझर' प्रदर्शित करण्यात आले. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांना केसरीच्या 'ट्रेलर'ची प्रतिक्षा लागली होती.नु कतच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमुळे केसरी चित्रपटाबाबत उत्सुकता अधिकच वाढत आहे.
भारत चित्रपटामध्ये कतरिना कैफचा 'सिंपल' लुक


अनन्या पांडेने जेव्हा शेअर केले स्वःतावरील फनी मीम्स


आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात


फोटोसौजन्य -  इन्स्टाग्राम