म्हणून अमिताभ बच्चन साजरा करणार नाहीत वाढदिवस, सांगितलं कारण

म्हणून अमिताभ बच्चन साजरा करणार नाहीत वाढदिवस, सांगितलं कारण

अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे शहेनशाह आहेत. त्यांच्या चित्रपटांपासून ते त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा असते. त्यांची प्रत्येक लहानसहान गोष्ट ही चर्चेचा विषय होते. आज अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला 77 वर्षांचे होत आहेत. चाहते आणि अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस नेहमीच धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. पण यावर्षी अमिताभ बच्चन आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामागचं नक्की कारण काय हे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही नक्कीच अमिताभचे चाहते असल्याचा अभिमान वाटेल. 

म्हणून अमिताभ बच्चन साजरा करणार नाहीत वाढदिवस, सांगितलं कारण

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपल्या वाढदिवसाला नक्की काय करायला आवडेल यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘वाढदिवसाला सेलिब्रेशनची काय गरज आहे? एखाद्या साध्या दिवसाप्रमाणेच हा दिवसदेखील आहे. मी अजूनही काम करत आहे तर मला आनंद आहे. माझं शरीर अजूनपर्यंत इतकं सक्षम आहे की, माझ्या आत्म्यासह व्यवस्थित पावलावर पाऊल ठेवत जाऊ शकेन.’ यावेळी अमिताभ यांनी आपल्या आई - वडिलांसह साजरा केलेल्या वाढदिवसांच्या आठवणीही जागवल्या. ‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बाबा (दिवंगत हरिवंशराय बच्चन) नेहमी माझ्यासाठी कविता लिहित असत आणि ती कविता मला वाचून दाखवत असत’. त्यापुढे अमिताभ यांनी असंही सांगितलं आहे की, ‘वाढदिवसाच्या दिवशी कविता ऐकणं ही आमच्या कुटुंबाची परंपरा होती. पण ही परंपरा 1984 मध्ये आलेल्या कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातानंतर तुटली. त्यावेळी मी अतिशय जवळून मृत्यू पाहिला होता. मी जेव्हा बरा झालो तेव्हा वडिलांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी लिहिलेली कविता ऐकवली आहे. कारण हे माझ्यासाठी एक नवीन जीवनच होतं. कविता वाचताना माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या वडिलांना असं रडताना मी त्यावेळी शेवटचं पाहिलं होतं.’

शमशेराचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा रणबीर कपूरचा हा लुक

आई - वडिलांची येते आठवण

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वडिलांच्या कविता आणि आईच्या चेहऱ्यावरील आनंद खूपच आठवतो. केक कटिंगच्या परंपरेबद्दल मला अजिबातच आता जिव्हाळा नाही. त्यामुळे यावर्षी वाढदिवस साजरा करावा असं वाटत नाही. अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे या सेटवर त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यासंदर्भात टीव्ही चॅनेलने ट्वीट करत एक व्हिडिओ पण पोस्ट केला आहे. त्यामुळे किमान इतर ठिकाणी नाही पण सेटवर तरी अमिताभ बच्चन आपला वाढदिवस चाहत्यांबरोबर साजरा करणार आहेत. पण त्यांनी आपल्या घरी कोणतीही पार्टी ठेवली नसल्याचं सांगितलं आहे. अमिताभ बच्चन सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा ‘ब्रह्मास्र’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तसंच अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरदेखील बरेच अॅक्टिव्ह असतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी त्या आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. या वयातदेखील तरूणांना लाजवेल असा उत्साह अमिताभ यांच्यामध्ये दिसून येतो. तसंच आपल्या प्रत्येक चाहत्याशी जोडून राहाता येईल असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. 

बॉलीवूडची अजरामर पण अधुरी प्रेम कहाणी….

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.