ऎल ही तूच अन पैलही तू सख्या 'जिवलगा'.. या आशयाच्या ओळी असलेलं सुंदर टायटल साँग आहे बहूचर्चित ‘जिवलगा’ या मालिकेचं. अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी तगडी स्टारकास्ट असलेली ‘जिवलगा’ ही मालिका घेऊन स्टार प्रवाह घेऊन येत आहे. या मालिकेची चर्चा त्याचे टीझर आल्यापासूनच सुरू झाली होती.
साधारणतः मराठीतील अभिनेते आणि अभिनेत्री चित्रपटातील करिअर सूरू असताना मालिकाकडे वळताना दिसत नाहीत. पण या मालिकेच्याबाबतीत मात्र ते घडलं आहे. या मालिकेतील स्टारकास्टही तगडी तर आहेच पण या मालिकेतील जोड्याही पहिल्यांदाच टीव्हीवर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या मालिकेचा लुक खूपच फ्रेश वाटत आहे. या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची असून मालिकेतील कथेसाठी डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांच्या कथेतून प्रेरणा घेण्यात आली आहे. या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे उमेश नामजोशी.
जितकं लक्ष या मालिकेच्या टीझर्सनी वेधलं होतं. तितकंच लक्ष आता या मालिकेच्या टायटल साँगने वेधलं आहे. हे सुरेल आणि हृदयाला भिडणाऱ्या टायटल साँगला संगीत दिलं आहे हरहुन्नरी संगीतकार निलेश मोहरीरने. संगीतकार निलेश मोहरीरने आतापर्यंत अनेक सुंदर आणि आठवणीत राहतील अशी मालिकांची टायटल साँग्ज बनवली आहेत आणि जिवलगा ही याला अपवाद नाही. या टायटल साँगला आवाज लाभला आहे तो मराठीतील प्रसिद्ध गायक आणि गायिका यांचा. ज्यामध्ये वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांचा समावेश आहे. पाहा या टायटल साँगचं मेकींग.
या टायटल साँग ऐकायला जितकं मधुर आहे तितकंच डोळ्यांसाठी ट्रीट आहे, इतकं सुंदर याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. पाहा हे टायटल साँग.
View this post on Instagram
‘जिवलगा’ ही नातेसंबंध उलगडणारी कथा आहे. यात नातेसंबधातील अनेक पैलू उलगडले जाणार आहेत. मानवी स्वभाव, प्रगल्भता आणि विचार करण्याची पद्धत याची प्रत्येकाची एक शैली असते. ती या कथेतून समोर येणार आहे. बऱ्याचदा नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. एखाद्याच्याबाबतीतले आपले सर्व अंदाज चुकतात. या सगळ्या पैलूवर ही मालिका प्रकाश टाकणार आहे. पाहूया आता ही मालिका प्रेक्षकांची जिवलग होते का?
हेही वाचा
वेबसिरीज आल्या तरी या 5 जुन्या मालिका अजूनही हव्याहव्याशा