पुन्हा एकदा जरीनची होणार 'मिर्झापूर 2' मध्ये एंट्री

पुन्हा एकदा जरीनची होणार 'मिर्झापूर 2' मध्ये एंट्री

मिर्झापूर ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजलेल्या काही वेबसीरिजपैकी एक आहे. या वेबसीरिजचं सिक्वलही या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याबाबत उत्सुकता आहेच. मिर्झापूर 2 च्या सिझनबाबत नुकतीच एक बातमी आली आहे. मिर्झापूरने खरंतर वेबसीरिजच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. यातील कालीन आणि इतरही पात्र प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजी आहेत. थोड्याच काळात लोकप्रियता मिळवलेल्या वेबसीरिजमध्ये मिर्झापूरचं नाव घेतलं जातं. त्यामुळे जेव्हा यातील एखाद्या भूमिकेबाबत बातमी आली तरी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढते.

जरीनच्या भूमिकेबाबत रहस्य कायम

जरीनच्या भूमिकेत मिर्झापूर या बहुचर्चित सिरीजद्वारे अभिनेत्री अनंगशा बिस्वासने ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केलं होतं. ज्यामुळे चाहत्यांना आता ती पुन्हा एकदा मिर्झापूर 2 मध्ये दिसणार असल्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनमध्ये जरीनच्या भूमिकेबद्दल अजून काही रहस्य उघड होण्याची शक्यता नक्कीच वाटत आहे. अनंगशच्या भूमिकेने समीक्षकांचेही लक्षही वेधून घेतले होते.

मिर्झापूरचा प्रवास अवर्णनीय

मिर्झापूरमधील आपल्या भूमिकेबाबत अनंगशा म्हणाली की, मिर्जापूरचा हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय होता आणि या प्रवासात निश्चितपणे मला खूप काही शिकायला मिळाले आहे. चाहत्यांनी जरीनला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. प्रेक्षकांचं हे प्रेम मला माझ्या पुढच्या कामासाठी नक्कीच प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.

मिर्झापूरआधी अनंगशाचं करिअर

अनंगशी ही मूळची बंगालची आहे. तिने अभिनयात येण्याआधी ऑस्ट्रेलियाला जाऊन अभिनयाचं रीतसर शिक्षणही घेतलं होतं. त्यानंतर तिने नाटकात काम करायला सुरूवात केली आणि त्यानंतर तिने बॉलीवूड व वेबसीरिज असा प्रवास केला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्याआधी ‘माया 2’ या शॉर्टफिल्ममध्ये प्रिया गोर, लीना जुमानजी आणि प्रणव सचदेव या नामंकित कलाकारांसोबत तिने काम केलं होतं. या व्यतिरिक्त तिने ‘अंधेरी’ आणि ‘सेल ट्रॅप’ सह अनेक शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे आणि चित्रपट ‘लव शव ते चिकन खुराना’ आणि ‘खोया खोया चांद’ फिल्ममध्ये सुद्धा काम केलं आहे. तिला अभिनयात अजून बरंच नाव मिळवायचं आहे. आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने तिला प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवायचा आहे. बॉलीवूडमधील आवडत्या अभिनेत्रींमध्ये तिची आवडती अभिनेत्री आहे फिल्म लेजंड स्मिता पाटील. तिला स्मिता पाटील यांच्या भूमिका पाहून नेहमीच प्रेरणा मिळते असं तिचं म्हणणं आहे.

आता तिच्या ‘मिर्झापूर 2’ मधील भूमिकेबाबतही उत्सुकता आहे. पाहूया जरीनच्या भूमिकेत अनंगशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकते का? बेस्ट ऑफ लक अनंगशा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.