सध्या सगळीकडेच एकाच रिअॅलिटी शो ची चर्चा आहे ती म्हणजे Big Boss13. सलमान खान या शोचे होस्टींग करत असून या शो चा टीआरपी सलमानमुळे नेहमीच वर असतो. पण आता या शो मध्ये असे काही झाले की, चक्क सलमान खानने शुटींग दरम्यान सेट सोडून जाणे पसंत केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान त्याच्या शो सोडून जाण्याबाबत फारच सिरिअस होता कारण सेटवर काहीच मिनिटांपूर्वी त्याची चीडचीड झाली होती. पण सलमानने अचानक असा निर्णय का घेतला असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. तर वाचा नेमकं काय घडलं?
रोमँटिक चित्रपटात पुन्हा दिसणार ‘हे’ Ex-Couple, लवकरच करणार घोषणा
झालं असं की, आयफा पुरस्कार सोहळ्यामुळे रविवारी Big Boss चा शो टेलिकास्ट झाला नाही. त्यामुळे वीकेंड का वार सोमवारी दाखवण्यात आला. या दरम्यान एका स्पर्धकाशी बोलताना सलमानची काहीतरी बाचाबाची झाली तो चिडला. त्याने बिग बॉसला सांगत त्याने आता तुम्हीच या पुढे सगळं काही सांभाळा असे म्हणत स्टेज सोडला. तो रागात स्टेज सोडतानाचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. आता सलमान खरंच गेला तर या शोची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
आता सगळ्यांना स्वाभाविकपणे पडणारा प्रश्न म्हणजे सलमान खरंच हा शो सोडून जाणार आहे का? पण नक्कीच सलमान हा शो जाणार ना्ही. कारण तो आहे तरच या शो ची जान आहे. पण घरात चाललेल्या काही गोष्टी खटकल्यामुळे सलमान हा स्टेज सोडून गेला.
हार्दिक पांड्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, या अभिनेत्रीसोबत जोडले नाव
गेल्यावेळी या रिअॅलिटी शोमधून कोएना मित्रा आणि दलजित कौर बाहेर पडल्या. त्यामुळे आता या शोमधून दरवेळी 2 स्पर्धक बाहेर पडणार आहेत. अबु मलिक, सिद्धार्थ डे, पारस छाबडा यावेळी बॉटम तीनमध्ये होते.
Big Boss म्हटले की, भांडण आलीच. घरात एक आठवडा होण्याच्या आतच या घरात ठिणगी पडू लागली होती. अनेकांची या घरात मोठी भांडण झाली. सिद्धार्थ शुक्लाचा अँग्री मॅन अवतार यामध्ये दिसला. पण खेळ खेळण्याची त्याची जिद्दही यामध्ये दिसून आली. पण त्याचे आणि रश्मीचे भांडणही यामध्ये दिसून आली.
वीकेंड का वार हा यंदा सोमवारी प्रसारीत झाला. या शोमध्ये अनेकांनी एकमेंकावर राग काढला आहेत. यावेळी सलमानने कोणतेही नाव न सांगता हे कोण म्हणाले असेल असा अंदाज काढायला लावला. असे करताना काहींचे अंदाज बरोबर आले तर काहींचे चुकले पण असे करताना काहींमध्ये नाहक वाद मात्र निर्माण झाला. आता हा एपिसोड संपल्यानंतर पुढे घरात नेमकं वातावरण कसं असेल ते पाहावे लागेल.
पण सलमान हा शो सोडून जाणार नाही हे मात्र नक्की!
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.