वाढदिवसाच्या दिवशी अनुराग कश्यप होत आहे ट्रोल, ड्रग्जचाही होतोय उल्लेख

वाढदिवसाच्या दिवशी अनुराग कश्यप होत आहे ट्रोल, ड्रग्जचाही होतोय उल्लेख

चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एकीकडे मात्र त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे बॉलिवूडमधील ड्रग्जचा विषय चांगलाच गाजत असताना अनुराग कश्यपही ड्रगिस्ट असल्याचे म्हणत नेटीझन्सनी त्याला वाढदिवसाच्या दिवशीच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. #happybirhtdaycharsianurag हा ट्रेंड यामुळे वायरल होऊ लागला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा ट्रेंड सुरु झाल्यानंतर अनुराग कश्यप ही शांत बसला नाही तर त्यानेही याचे उत्तर अगदी त्याच्याच स्टाईलने दिले आहे. या आधी सुशांत सिंह प्रकरणातही त्याने काही चॅट शेअर केले होते ज्यामुळे अनेकांना त्याच्याबद्दल रागही निर्माण झाला होता.

दोन वर्षांच्या आत 'कसौटी जिंदगी की' मालिका गुंडाळणार गाशा

वाढदिवसाला दिला शुभेच्छा

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. रोज नवनवे ट्रेंड येतच असतात. काल रात्रीपासून चित्रपट निर्माता आणि अभिनेता अनुराग कश्यप चांगलाच ट्रेंड होताना दिसत आहे. बॉलिवूडचा हा नावचिन चेहरा सध्या चरसी म्हणून सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. त्याचा हॅशटॅगच नाही तर ड्रग्ज घेताना त्याचे मॉर्फ केलेले फोटोही ट्विटरवर चांगलेच गाजत आहे. पण अनुराग कश्यपने मात्र याला मजेत घेतले आहे. त्याने या शुभेच्छांवर न चिडता त्या सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने त्याला केलेल्या काही ट्विटला मजेशीर उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता या सगळ्याची एकूणच धूम सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 

दीपिका पादुकोण गोव्याला रवाना, या आगामी चित्रपटाचं शूटिंग होणार सुरू

सुशांत सिंह राजपूतसोबतचे ते चॅट

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझम हा विषय अधिक चघळला गेला होता.  अनेक मोठ्या फिल्ममेकर्सवर यामुळे आरोप व्हायला सुरुवात झाली होती. सुशांतला अनेक चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचा आरोप अनेक फिल्ममेकर्सवर होत होता. अनुराग कश्यपने यासंदर्भात सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर श्रुति मोदी हिच्यासोबत केलेल्या चॅटचा एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. अनुराग कश्यपला सुशांतसोबत काम करायचे नव्हते. काही वैयक्तिक कारणामुळे त्याला त्याच्यासोबत काम करायचे नव्हते. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याने मुद्दाम हे चॅट सगळ्यांसोबत हा फोटो शेअर करत त्याने सुशांतही काही वैयक्तिक कारणमांमुळे काम करत नसल्याचा उल्लेख केला आहे. त्याच्या या चॅटवरही त्याला ट्रोल केले जात आहे. 

रियाच्या जामिनावर आज विशेष कोर्टात सुनावणी, एक रात्र काढली तुरुंगात

अनुराग कश्यपच्या वेबसीरिज

अनुराग कश्यपने अनेक चांगल्या आणि दर्जेदार चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. पण त्याने सीरिजक्षेत्रात चांगलीच कामगिरी दाखवली आहे.  त्याने अनेक दर्जेदार सीरिजची निर्मिती केली आहे. त्याने लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स याची निर्मिती केली आहे. 

 

आज अनुराग कश्यपच्या आयुष्यातील चांगला दिवस असूनसुद्धा त्याला अशा पद्धतीने ट्रोल केल्यामुळे आजच्या दिवसात तो चांगलाच गाजत आहे हे मात्र नक्की!