अनुष्का शर्माचा नवा फोटो विरुष्काच्या फॅन्समध्ये होत आहे वायरल

अनुष्का शर्माचा नवा फोटो विरुष्काच्या फॅन्समध्ये होत आहे वायरल

अनुष्का शर्माने खुशखबर दिल्यानंतर त्यांच्या फॅन्समध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातून अनेक आनंदवार्ता येत असताना विरुष्काकडून आनंदाची बातमी मिळाल्यानंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे. अनुष्काने ती आई होणार ही बातमी सोशल मीडियावरुन दिल्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा होती. तिने बेबी बंपसोबत शेअर केलेला फोटो अगदी हा हा म्हणता सगळ्या सोशल मीडियावर वायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा अनुष्काचा एक गोड फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. पुन्हा एकदा बेबी बंप दाखवताना अनुष्काचा हा अंदाज अनेकांना आवडला असावा, असाच काहीसा अंदाज सोशल मीडियावरु येत आहे. चला तर पाहुया अनुष्काचा हा नवा फोटो

सारा अली खानचे नाव का येत आहे ड्रग्ज प्रकरणात, काय म्हणाली रिया

अशी दिली आनंदाची बातमी

अनुष्का- विराट अर्थात विरुष्का ही जोडी अगदी सगळ्यांच्या आवडीची. त्यांच्या अफेअर्सपासून ते त्यांच्या शाही लग्नसोहळ्यापर्यंत अनेकांनी त्यांना चांगलेच फॉलो केले आहे. अनेक सेलिब्रिटींनी आनंदाची बातमी दिल्यानंतर अनुष्का- विराट आनंदाची बातमी कधी देणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एरव्ही सेलिब्रिटींच्या कायम मागावर असणारे पापाराझी कोरोनामुळे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात फार काही झाकून पाहू शकत नाही. त्यामुळे सेलिब्रिटीच त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या बातम्या सोशल मीडियावरुन देत आहे. अनेकांनी या काळात सोशल मीडियाला थोडे दूरही ठेवले. अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर नेहमीच काही फॅशन फोटो शेअर केले होते. पण अचानक  27 ऑगस्टला तिने एक पोस्ट शेअर केली आणि अनेकांना आनंदाचा धक्का दिला. तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी तिचा बेबी बंप दाखवून केली.

बिग बॉस 14' चा ग्रँड प्रिमियर होणार 'या' दिवशी, लवकरच कळणार थीम

नवा फोटोही आहे फारच क्युट

Instagram

आता अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्येही ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी उभी आहे. पांढऱ्या रंगाचा टॉप घातला असून तिने मार्बल रंगाच स्कर्ट घातला असावा असे फोटोमधून दिसत आहे. तिचा हा फ्रेश सुंदर फोटो पाहून विराटलाही या फोटोवर कमेंट दिल्यावाचून राहावले गेले नसावे कारण त्याने या फोटोखाली एक छान कमेंट लिहिली आहे. त्याने ‘एकाच फ्रेममध्ये माझे सारे विश्व सामावले आहे’ असा उल्लेख केला आहे. त्याच्या या कमेंटवरही खूप रिअॅक्शन्स आल्या आहेत. 

जानेवारीत येणार नवा पाहुणा

अनुष्काने ही आनंदाची बातमी देत त्यांच्या घरी येणारा हा नवा पाहुणा कधी येणार याचा अंदाजही दिला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला विरुष्का आई-बाबा होणार आहेत. 2020 या वर्षाची सुरुवात दिमाखात झाली असली तर जगभरात कोरोना विषाणूचा वाढता कहर पाहता गेल्या सहा महिन्यांपासून सगळेच जण घरात बसून आहेत. अनेक गोष्टी या
ठप्प झाल्या आहेत. चित्रपट आणि क्रिकेट विश्वालाही याचा चांगलाच धक्का बसला आहे. पण काहींच्या आयुष्यात या मोकळ्या वेळाने फारच आनंद आणला आहे. 


आता या फोटोनंतर अनेकांना अनुष्काच्या बेबी शॉवरच्या फोटोची प्रतिक्षा आहे. 

पूनम पांडे अडकली विवाहबंधनात,गुपचूप केले लग्न