हिंदी सिनेसृष्टीने अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. 1982 साली रिलीज झालेला ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट त्यापैकीच एक आहे. एकाचवेळी चित्रपटात सात अभिनेते आणि अभिनेत्री असलेला हा चित्रपट त्याकाळात खूपच गाजला होता. अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होता. आता इतक्या वर्षानंतर या चित्रपटाचे रिमेक करण्याचा निर्णय रोहित शेट्टी याने घेतला आहे. फराह खान आणि रोहित शेट्टी हा चित्रपट करणार असून त्यांनी यासाठी ऋतिक रोशनची निवड केली आहे आणि आता ऋतिक रोशनची हेमामालिनी कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
ऋतिकसोबत या चित्रपटात कोण असेल याची जोरदार चर्चा सुरु होती. दीपिका पदुकोण,कतरिना कैफ आणि कृति सननचे नाव सातत्याने पुढे येत होते. पण आता एक नवेच नाव यासाठी पुढे आले आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. हो अभिनेत्री अनुष्का शर्माची यासाठी निवड करण्यात आली आहे. एका वेबसाईडने या बातमीला दुजोरा दिला आहे. आता या रोलसाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसणार आहे.
आता या चित्रपटात मोठी स्टारकास्ट लागणार आहे म्हटल्यावर यासाठी अनेक अभिनेत्री लागणार हे तर नक्कीच होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री प्रिती झिंटाला देखील या चित्रपटासाठी ऑफर देण्यात आली होती. पण तिनेही ऑफर नाकारली. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिती झिंटाला या चित्रपटासाठी लीड रोल नाही तर सात बहिणींच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण तिने त्याला नकार दिला.
आता जर तुम्ही अमिताभ यांचा ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट पाहिला नसेल तर ही सात भावडांची गोष्ट आहे. शेती करणारे हे भाऊ शहराशी संबधित नसल्यामुळे कसेही राहात असतात. पण त्यांचा मोठा भाऊ अमिताभ ज्यावेळी हेमा मालिनीच्या प्रेमात पडतो. त्यावेळी तो तिला भावांबद्दल काहीही सांगत नाही. पण लग्नानंतर ते गबाळे भाऊ पाहून तिला आश्चर्य वाटते आणि ती त्यांना बदलण्यासाठी जे काही करते त्यातून घडणारा विनोद या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर मग तुम्ही हा जुना चित्रपट आणि रिमेक नक्कीच पाहायला हवा.
आता सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा पहिल्यांदाच रिमेक होत नाही. कारण हिंदी आधी मराठीमध्ये सचिन पिळगावकर यांनी ‘आम्ही सातपुते’ हा चित्रपट काढला होता. तो याच चित्रपटावर आधारीत होता. विशेष म्हणजे सचिन पिळगावकर हिंदी सत्ते पे सत्ता या चित्रपटात सात भावापैंकी सगळ्यात लहान भाऊ होता. तर मराठीमध्ये त्यांनी सगळ्यात मोठ्या भावाची भूमिका साकारली होती.
एखाद्या जुन्या चित्रपटाचा रिमेक येणार म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच अगदी उत्सुकता असते. पण सध्या तरी अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. पण लवकरच या चित्रपटाचा श्रीगणेशा होईल असे सांगितले जात आहे.
आता या रिमेकमध्ये अनुष्का शर्माचे नाव पुढे आले आहे म्हणजे यामध्ये काहीतरी तथ्य नक्कीच असेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.