लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांप्रमाणेच सर्व सेलिब्रेटीज सध्या घरात अडकून पडले आहेत. त्यामुळे घरातील सर्व कामं करताना त्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘दी कपिल शर्मा’ शोमधून सर्वांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री अर्चना पूरनसिंह सध्या सोशल मीडियावरून काही व्हिडिओ शेअर करत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या घराचं लॉन स्वच्छ करताना दिसत आहे. एवढंच नाही तर लॉन स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूला मराठीत ‘खराटा’ म्हणतात हे ऐकून तिला खूप मोठा धक्काच बसला आहे. यावर अर्चनाने तिच्या मेडला मजेशीर उत्तरही दिलं आहे.
तुम्ही पाहिला का हा मजेशीर व्हिडिओ
सध्या घराबाहेर पडता येत नसल्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरातच फिटनेससाठी काहीतरी वर्कआऊट करत आहे. अर्चना आणि परमीत राहत असलेल्या बंगल्याला छोटं लॉन असल्यामुळे त्यांचं कुटंब तिथेच वॉक आणि एक्सरसाईज करत असतात. असंच एकदा वॉक करता करता घडलेला एक किस्सा अर्चनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहेत. ज्यात अचानक वॉक करता करता तिला अंगणात झाडावरची फळं पडून बराच केर जमा झाल्याची जाणीव झाली. म्हणून तो केर काढण्यासाठी तिने तिची मेड भाग्यश्री हिली हाक मारली आणि तिला झाडू आणण्यास सांगितलं. भाग्यश्री तिला झाडू आणून देते तेव्हा अर्चना तिला विचारते की, मराठीत झाडूला काय म्हणतात ? यावर भाग्यश्री तिला सांगते की अंगणातील केर काढण्याच्या झाडूला ‘खराटा’ असं म्हणतात. ‘खराटा’ असा शब्द ऐकताच अर्चनाला धक्काच बसतो ती यावर तिला लगेच म्हणते की, “अगं आम्ही तर झोपल्यावर घोरतो त्याला खराटे म्हणतो”. त्यानंतर अर्चना स्वतः खराटा घेऊन घराचं अंगण झाडू लागते. हे पाहून तिच्या मेडला आश्चर्य वाटतं. कदाचित तिने याआधी कधीच अर्चनाला घरातील कामे करताना पाहिलं नसेल. ती अर्चनाला म्हणते की, “ मी तुला केर काढताना पाहून शॉक झाली आहे ” यावर अर्चना भाग्यश्रीला विचारते, का केर काढणं चांगली गोष्ट नाही का ? मग भाग्यश्री तिला म्हणते की, “तसं नाही पण अज्जोला ते सूट करत नाही” तिची मेड तिला अज्जो म्हणत असावी असं यावरून वाटत आहे. शिवाय यावरून तिच्या मेडचे आणि तिचं एक माणूसकीचं नातंदेखील दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये अर्चना पूरनसिंहसोबत परमीत सेठी वॉक करताना दिसत आहेत. तिची मुलं आर्यमान आणि आयुषमान गार्डनमध्ये वर्कआऊट करत आहेत आणि आई शांतपणे खुर्चीवर बसून वातावरणाचा आनंद घेत आहे.
लॉकडाऊनमध्ये काय करतेय अर्चना
अर्चना पूरनसिंह बॉलीवूडमध्ये तिच्या जबरदस्त कॉमेडी सेंससाठी प्रसिद्ध आहे. पती परमीत सेठी आणि मुलांसोबत ती सध्या तिचा क्वारंटाईनचा काळ आनंदात घालवत आहे. 1987 साली ‘जलवा’ या चित्रपटातून अर्चनाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर मॉडलिंग करत तिने मोहब्बते, कुछ कुछ होता है, बोल बच्चन, राजा हिंदुस्थानी, क्रिश अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून तिने काम केलं. सध्या ती ‘दी कपिल शर्मा’ शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बऱ्याचदा या शोचे पडद्यामागचे मजेशीर किस्से आणि सीन ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते. आता मात्र शूटिंग बंद असल्यामुळे स्वतःच्या घरातील असे काही किस्से शेअर करून ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
अधिक वाचा –
#coronaheroes ना मराठी कलाकारांचा मानाचा मुजरा
सहा वर्षांच्या नात्यानंतर ‘पवित्र रिश्ता’फेम या जोडीचे झाले ब्रेकअप, चाहत्यांना धक्का