आरजू गोवित्रीकरला नवऱ्याकडून मारहाण, कोर्टाने दिला दूर राहण्याचा आदेश

आरजू गोवित्रीकरला नवऱ्याकडून मारहाण, कोर्टाने दिला दूर राहण्याचा आदेश

‘एक लडकी अनजानीसी’, ‘बागबान’ फेम आरजू गोवित्रीकरने तिच्या नवऱ्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. पतीच्या मारहाणीला कंटाळलेल्या आरजूला कोर्टाकडून दिलासा मिळाला असून तिचा पती म्हणजेच बिझनेसमन सिद्धार्थ सब्रवालला तिच्यापासून दूर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. आरजूला झालेली मारहाण एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील आदेश मिळेपर्यंत सिद्धार्थला त्यांच्या वरळीच्या घरी पुन्हा जाता येणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे.


हा  #Hot सेलिब्रिटी करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण


फेब्रुवारी महिन्यातील घटना


arzoo govitrikar


एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही घटना फेब्रुवारी महिन्यातील आहे. 19 फेब्रुवारी रोजी आरजूने वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.तिने झालेला सगळा प्रकार सांगत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना पुरावा म्हणून दिले होते. तिचा नवरा सिद्धार्थ सब्रवाल आरजू गोवित्रीकरला मारताना दिसत आहे. आरजूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ हा दारुच्या नशेत आरजूला नेहमीच मारहाण करायचा. त्या रात्री देखील त्यांचे त्याच्या दारु पिण्याच्या सवयीवरुन वाजले. चिडलेल्या सिद्धार्थने आरजूला मारहाण करत तिला बाथरुममध्ये नेले आणि तिथेही त्याने तिच्यावर हात उगारला.


सिद्धार्थ म्हणतो ही क्राईम सीनची तयारी


arzoo


तक्रार केल्यानंतर सिद्धार्थलादेखील पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. त्यावेळी त्याने सांगितलेला प्रकार ऐकूनही सगळे हक्कबक्क झाले. त्याने मी मारहाण केली नाही. तर आरजूनेच मला माझ्या कानशिलात वाजव म्हणून सांगितले. ती कोणत्या तरी क्राईम सिरिअलचा सराव करत होती. त्यामुळे मारहाण करण्याचा प्रश्नच येत नाही,असे त्याने सांगितले.


प्रियांका- निकचे बेडरुम सिक्रेट तुम्हाला माहीत आहे का?


महिलेवर हात उगारण्याचा कोणालाच अधिकार नाही


कोर्टाने आरजूला दिलासा देताना 2013 च्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाची आठवण करुन दिली. मॅजिस्ट्रेट कराडे यांनी सांगितले की, एखादे घर जर एकट्या नवऱ्याच्या नावावर असेल आणि तो बायको- मुलांसोबत राहात असेल तरी त्याला बायकोवर हात उगारण्याचा अधिकार नाही.  जर नवरा बायकोवर हात उगारत असेल तर त्याला घरातून बाहेर काढण्याचा आदेश कोर्ट देऊ शकते. कोर्टाची पुढील सूचना मिळेपर्यंत त्याला त्याच्या घरात जाण्यापासून मज्जाव केला जातो.


हे आमचे खासगी प्रकरण


आरजू आणि सिद्धार्थला या प्रकरणात  अनेकांनी काही प्रश्न विचारायचे प्रयत्न केले. पण या दोघांनीही हे आमचे खासगी प्रकरण असल्याचे सांगत बोलणे टाळले आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आरजू आणि सिद्धार्थ या दोघांकडून काही ठोस कळू शकले नाही. पण तिने पुरावा म्हणून सादर केलेल्या व्हिडिओमुळे हे मारहाणीचे प्रकरण असल्याचे स्पष्ट होते. 


कोण आहे आरजू गोवित्रीकर?


arzoo govitrikar  %281%29


आरजू ही मॉडेल आणि अभिनेत्री असून ती आदिती गोवित्रीकरची बहीण आगे. तिने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बागबान या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. 2010 साली तिने बिझनेसमन सिद्धार्थ सब्रवालशी लग्न केले. तिला एक मुलगा आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवरुन अनेकदा कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते. पण गेल्या काही महिन्यांपासून तिने सिद्धार्थसोबतचा एकही फोटो शेअर केलेला नाही.


दक्षिणेत आजही पसंती थलायवा रजनीकांतला


(फोटो सौजन्य -Instagram)