#BBM च्या घरात पुन्हा पडली वादाची ठिणगी

#BBM च्या घरात पुन्हा पडली वादाची ठिणगी

#BBM हाऊसमध्ये सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. वीकेंडचा वारआधी घरात शिवानी सुर्वेची #BBMमध्ये पुन्हा एकदा एंट्री झाली तर दुसरीकडे महेश सरांनी वीणाला टार्गेट करत हिनाची बाजू उचलून धरली. वीणाला तिच्या रूड वागण्यावरून महेश मांजरेकरांनी चांगलंच सुनावलं. तर घरातल्या सदस्यांची हिना भाकरी प्रकरणावरून चांगलीच कानउघडणी केली. तसंच रूपाली भोसले आणि वीणा जगतापला किशोरी शहाणेंना उलटून बोलण्याबद्दलही जाब विचारला. शिव आणि वीणाच्या वाढत्या जवळीकीवरही त्यांनी बोट ठेवलं. त्यामुळे हा वीकेंड बिग बॉस मराठी सिझन 2 च्या सदस्यांसाठी चांगलाच तापदायक ठरला. एकच गोष्ट चांगली झाली की, या वीकेंडला कोणीही घराबाहेर गेलं नाही.   

Instagram

दुसरीकडे बिग बॉसच्या दूस-या पर्वात दणक्यात एंट्री घेऊन बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमधला पहिला महिना गाजवणारी शिवानी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसमधून बाहेर पडली होती. पण आता पूर्ण बरी झालेली शिवानी सुर्वे बिग बॉसमध्ये शुक्रवारी परतलीयं.

शिवानीची नाट्यमय एंट्री

बिग बॉसच्या घरात पुनरागमन केलेल्या शिवानीची एंट्री नाट्यमय अंदाजात झाली. बिग बॉसमध्ये परतताना शिवानीने बिग बॉसमधल्या इतर स्पर्धकांसाठी पेस्ट्रीज आणल्या आणि त्यांचं तोंड गोड केलं. घरच्यांनीही तिचं हसतमुखाने स्वागत केलं. परतताना मात्र शिवानी कन्टेस्टंट म्हणून नाही, तर घरातली पाहुणी बनून आलेली आहे

शिवानीची एंट्री जशी बिग बॉसच्या घरच्यांसाठी आनंददायी होती, तशीच तिच्या चाहत्यांसाठीही हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. शिवानीच्या चाहत्यांनी चॅनलच्या पेजवर आपल्या भरघोस प्रतिक्रियांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘वेलकम बॅक’, ‘शिवानी परत आली’,‘वाघीण परत आलीये’ अश्या भरपूर शुभेच्छांचा वर्षाव सातत्याने सोशल मीडियावर होत आहे.

सूत्रांच्या अनुसार, शिवानी ही बिग बॉसच्या यंदाच्या पर्वातली एक खूप स्ट्राँग स्पर्धक होती. ती बिग बॉसमध्ये असावी, असं बिग बॉस पाहणा-या अनेक प्रेक्षकांचं मत होतं. शिवानीला प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडायला लागल्यावर अनेक चाहत्यांची निराशा झाली होती. तशा प्रतिक्रियाही सातत्याने प्रेक्षक नोंदवत होते. आता बिग बॉसमध्ये शिवानीची पुन्हा एन्ट्री झाल्यावर हा खेळ नक्कीच अधिक मजेशीर होत जाणार आहे. हे #Weekendchawaar मधून लक्षात आलंच आहे. सध्या बिग बॉसमध्ये खूप मत-मतांतरं सुरू आहेत. नवे ग्रुप बनत आहेत. अशावेळी आता शिवानीच्या एंट्रीने हा शो खूप मनोरंजक होईल यात शंका नाही. त्यामुळे आता वीणा आणि शिवानीचं जमणार की, पुन्हा वादावादी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.