बॉलीवूडमधील अभिनेत्रींची आपल्याकडे एक वेगळीच क्रेझ आहे. पूर्वी अभिनेत्रींना जास्त काळ पडदा गाजवणं शक्य होत नसे. त्यातही त्यांचं लग्न झालं की करिअर संपलं अशी परिस्थिती होती. पण आता तसं चित्र दिसून येत नाही. बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. एका विशिष्ट वयानंतर अभिनेत्रींना काम मिळणं कमी होतं असं म्हणतात. पण काही अभिनेत्रींच्या बाबतीत मात्र असं दिसून आलं नाही. शिल्पा शेट्टी, विद्या बालन, जुही चावला, रवीना टंडन, माधुरी दीक्षित या अभिनेत्री आजही आपलं वर्चस्व टिकवून आहेत. त्यापैकी काही अभिनेत्री या स्वतः करोडपती आहेतच पण त्यांचे ‘पती’ही करोडपती आहेत. बऱ्याचदा लोकांना अभिनेत्रींबद्दल माहीत असतं पण त्यांच्या नवऱ्यांविषयीदेखील त्यांच्या चाहत्यांना तितकीच उत्सुकता असते. बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या करोड’पती’ आहेत. जाणून घेऊया अशा अभिनेत्रींविषयी –
1. शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी ही अशी अभिनेत्री आहे जिच्यावर आजही अनेक चाहते फिदा आहेत. 44 वर्षीय शिल्पा शेट्टीच्या अदा आजही तिच्या चाहत्यांना तितक्याच घायाळ करतात. परफेक्ट फिगर असणारी अभिनेत्री म्हणून नेहमीच शिल्पाचं नाव घेतलं जातं. शिल्पा आजही अनेक कामं करते. ती लहान पडद्यावर कार्यरत तर आहेच शिवाय तिचा स्पा चा उद्योगही आहे. याशिवाय योगाबद्दल शिल्पा नेहमीच भरभरून बोलते. तिचे फूड व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. शिल्पाने 2009 मध्ये व्यावसायिक राज कुंद्रा याच्याबरोबर लग्न केलं. राज कुंद्रा हा एनआरआय असून त्याची जवळजवळ 2600 कोटी इतकी संपत्ती असल्याचं म्हटलं जातं. शिल्पाच्या नवऱ्याचं लंडनला घर असून त्यांचा दुबईमध्येदेखील बंगला आहे. राज कुंद्रा नेहमीच त्याच्या संपत्तीमुळे चर्चेत असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर, ‘निकम्मा’ चित्रपटातून करणार कमबॅक
2. अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा ही एक अशी अभिनेत्री आहे जी सहसा कोणत्याही वादात नसते पण ती अतिशय फटकळ असून तिला बरेच जण घाबरतात. अनुष्काने क्रिकेटर विराटसोबत 2017 मध्ये अगदी खासगी सोहळ्यात इटलीमध्ये लग्न केलं. विराट आणि अनुष्का नेहमीच चर्चेत असतात. पण विराट हा भारतातील उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंपैकी एक असून करोडपती म्हणून ओळखला जातो. अनुष्काचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस असून विराटचेदेखील क्रिकेटव्यतिरिक्त अनेक उद्योग आहेत. विराट एक उद्योगपतीदेखील आहे.आदि विराटची केवळ एकट्याची 400 कोटी संपत्ती असल्याचं म्हटलं जातं.
3. राणी मुखर्जी
राणी मुखर्जी हे नाव कोणत्या बॉलीवूडप्रेमीला माहीत नाही असं नसेल. आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आपलंसं करणाऱ्या राणीने आदित्य चोप्राशी इटलीमध्ये अगदी खासगी सोहळ्यात लग्न केलं. राणीने बॉलीवूडमध्ये एक वेगळीच छाप सोडली. राणी मुखर्जीचं अनेक अभिनेत्यांबरोबर नाव जोडण्यात आलं पण तिने शेवटी आदित्य चोप्राशी लग्न केलं. राणीसाठी आदित्यने आपल्या पहिल्या पत्नीला सोडल्याचंही म्हटलं जातं. मात्र आता हो दोघे सुखात असून त्यांना आदिरा नावाची मुलगीदेखील आहे. आदित्य चोप्रा हा यश चोप्रा यांचा मुलगा असून त्यांचं प्रॉडक्शन हाऊस आहे. आदित्य हा साधारण 6300 कोटींचा मालक असल्याचं म्हटलं जातं. आदित्य चोप्रा अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये कार्यरत असून कधीही कोणत्याही कार्यक्रमांना मात्र हजेरी लावत नाही.
दुसरं लग्न करून काही अभिनेत्रींना मिळाला आनंद तर काहींच्या नशीबी आलं दुःख
4. विद्या बालन
विद्या बालनने टीव्हीवरील ‘हम पाँच’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र त्यानंतर बॉलीवूडमध्ये तिने एक से एक अप्रतिम चित्रपट दिले. तिच्या अभिनयाने अनेकांना घायाळ केलं. विद्या बालनचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं. मात्र विद्याने निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर याच्याशी 2012 मध्ये लग्न केलं. विद्याने त्यानंतरही चित्रपटांमध्ये काम करणं सुरू ठेवलं आहे. सिद्धार्थ रॉय कपूरचं निर्मात्यांमध्ये मोठं नाव आहे. शिवाय त्याचे फोटोही नेहमी व्हायरल होत असतात. सिद्धार्थ रॉय कपूरची अनेक जणांशी ओळख असून साधारण 3300 कोटीचा सिद्धार्थ रॉय कपूर मालक आहे. विद्या आणि सिद्धार्थ नेहमीच एकत्र दिसतात. सिद्धार्थची याआधी दोन लग्न झाली आहेत. विद्याशी त्याने तिसरं लग्न केलं आहे.
अशा अभिनेत्री ज्यांनी केलं विवाहित माणसांवर प्रेम
5. जुही चावला
जुही चावलाने तर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये नव्वदचं दशक गाजवलं. आजही जुही अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून येते. जुही कोणत्या तरी अभिनेत्याशी लग्न करेल असं अनेकांना वाटलं होतं. पण जुहीने व्यावसायिक जय मेहताशी लग्न करून सर्वांनाच धक्का दिला. जय मेहता सहसा कोणत्याही सोहळ्यात दिसत नाही. पण जय मेहता करोडपतींपैकी एक आहेत. जय मेहता यांचे अनेक उद्योग असून क्रिकेटमधील एक संघदेखील अभिनेता शाहरूख खान याच्याबरोबरीने त्यांच्या मालकीचा आहे. साधारण 2300 कोटी संपत्तीची मालमत्ता जय मेहताच्या नावावर असल्याचं सांगण्यात येतं. मात्र इतकं असूनही जुही चावलाने आपलं अस्तित्व जपून ठेवलं आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.