अशा अभिनेत्री ज्यांनी केलं विवाहित माणसांवर प्रेम

अशा अभिनेत्री ज्यांनी केलं विवाहित माणसांवर प्रेम

बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेचा भाग होण्यासाठी रोज अनेकजण मुंबईत दाखल होतात. काहींना यशाचा मार्ग सापडतो तर काहीजण येथील गर्दीत हरवून जातात. या चमचमत्या दुनियेत पैशाला जास्त महत्त्व असणं साहजिक आहे. इथे पैशांच्यापुढे नात्यांनाही महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे लग्नासारखं अनमोल नातं ही इथे पैशासाठी तोडलं जातं. आज या लेखात आम्ही अशाच काही बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी प्रेमासाठी म्हणा की पैशांसाठी विवाहीत माणसांशी लग्न करून स्वतःचा संसार थाटला आणि बिनदिक्कत दुसरी बायको म्हणून मिरवत आहेत. 

बिपाशा बासू

Instagram

बॉलीवूडची बाँग गर्ल बिपाशा बासूने जितकं नाव तिच्या सेक्स अपील आणि भूमिकांमुळे मिळवलं त्यापेक्षा जास्त लक्ष वेधलं तिच्या लव्हलाईफने. अनेक अभिनेत्यांशी तिचं नाव जोडलं गेलं आणि तिचं ब्रेकअपही झालं. अखेर तिने टीव्हीवरील अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी 2016 साली 30 एप्रिलला लग्न केलं. करणचं या आधी जेनिफर विंगेटशी लग्न आणि घटस्फोटही झाला होता. खरंतर सुंदरतेच्याबाबतीत बिपाशापेक्षा जेनिफर विंगेट जास्त सुंदर आहे.

शिल्पा शेट्टी

एकेकाळी सुपरस्टार असणाऱ्या शिल्पा शेट्टीला कोण ओळखत नाही. तिच्या सौंदर्याचे आजही अनेकजण चाहते आहेत. याच सुंदरतेला भाळून भारतातील बिजनेसमॅन राज कुंद्राला तिने आयुष्यभरासाठी कैद केलं. शिल्पाचं जेव्हा राज कुंद्राशी अफेयर सुरू होतं तेव्हा तो विवाहीत होता. पण शिल्पाशी लग्न करण्यासाठी त्याने पहिल्या बायकोला घटस्फोट दिला.

विद्या बालन

View this post on Instagram

🥰 Happy Anniversary to us 🥰!!

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

उलाला गर्ल विद्या बालनला बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. चित्रपटांमधील तिचा अभिनयही तेवढाच दमदार असतो. पण लग्न करताना तिने पसंती दिली ती दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या सिद्धार्थ रॉय कपूरला. तरीही विद्याने त्याच्याशी लग्न केलं. या दोघांचं लग्न 2012 मध्ये 14 डिसेंबरला एका खाजगी समारंभात पार पडलं. 

रवीना टंडन

टीप टीप बरसा पानी सारख्या गाण्यांमध्ये सिझलिंग परफॉर्मन्स देणाऱ्या अभिनेत्री रवीना टंडनचे आजही जबरदस्त फॅन फोलोइंग आहे. पण तिच्या लग्नाबद्दल विचारल्यावर आजही तिचे फॅन्स नाराजी व्यक्त करतात. रवीनाने बिझनेसमन अनिल थडानीशी का लग्न केलं. जो आधीच विवाहीत होता. रवीना टंडनशी लग्न करण्यासाठी त्याने पहिल्या बायकोला नताशाला घटस्फोट दिला.

श्रीदेवी

View this post on Instagram

❤️❤️❤️❤️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

बॉलीवूडमध्ये स्वतःची अशी खास जागा असणारी चांदनी म्हणजेच श्रीदेवी आता आपल्यात नाही. तिच्या अजरामर भूमिकांमुळे तिला कोणीही विसरू शकणार नाही. ती जितकी दिसायला सुंदर होती तितकाच तिचा अभिनयही सुंदर होता. तिचा अचानक झालेला अपघाती मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूरच्या चित्रपटांमध्ये काम करता करता त्याच्या प्रेमात पडली. तेव्हा बोनी विवाहीत असून त्याला दोन मुलंही होती. मग श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी त्याने पहिल्या बायकोला घटस्फोट दिला. या सर्व गोष्टींमुळे बोनीचा मुलगा अर्जुन कपूर अनेक वर्ष नाराज होता. अखेर श्रीदेवी गेल्यावर बोनी कपूर आणि त्याची चार मुलं एकत्र आली.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.