...आणि कुंभ मेळ्यात उजळून निघाले ‘ब्रम्हास्त्र’, पाहा फोटो

...आणि कुंभ मेळ्यात उजळून निघाले ‘ब्रम्हास्त्र’, पाहा फोटो

करण जोहरचा आगामी प्रोजेक्ट ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या चर्चेसोबतच बी टाऊनमधील कपल आलिया आणि रणबीर कपूरही खूप चर्चेत आहेत. आता ब्रम्हास्त्र पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे एक वेगळा प्रयोग ब्रम्हास्त्रच्या निमित्ताने करण्यात आला आहे. म्हणजे या आधी आपण बरेच लॉन्चिंगचे कार्यक्रम पाहिले असतील. गाणे, ट्रेलर लाँच करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. त्या वेगळ्या फंड्यापैकी एक म्हणजे ब्रम्हास्त्रचा फंडा. तब्बल १५० ड्रोनचा वापर हवेत उडवून आकाशात एक मोठे ब्रम्हास्त्र तयार करण्यात आले. या ब्रम्हास्त्रासमोर चित्रपटाच्या ईशा (आलिया) आणि शिवा (रणबीर) यांचीही सगळ्यांना नव्याने ओळख झाली. पण  प्रमोशनचा हा फंडा चांगलाच हटके होता असे म्हणायला हवे.


अक्षय कुमारच्या सूर्यवंशीचा फर्स्ट लुक रिलीज


bramastra 1


कुंभ मेळ्यात केला प्रयोग


बरं!! या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही फॅन्सी जागा निवडण्यात आली नाही. तर चक्क कुंभ मेळ्याचे स्थान निवडण्यात आले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून आलिया-रणबीर आणि अयान मुखर्जी हे तिघे कुंभ मेळ्यात पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी आरती केली आणि तब्बल १५० ड्रोन एकाचवेळी हवेत उडवून त्याचे ब्रम्हास्त्र तयार करण्यात आले. या निमित्ताने चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला. १५० ड्रोनच्या मदतीने आधी ब्रम्हास्त्र तयार करण्यात आले. तर त्यानंतर चित्रपटाचे नाव ड्रोनच्या माध्यमातून तयार करण्यात आले. कुंभ मेळ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे चित्रपटाच्या नावाचे अनावरण करण्यात आले. आलिया- अयान आणि रणबीर असे हे त्रिकुट या आलियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. आलियाने हिरव्या रंगाचा फ्लोरल इथनिक वेअर घातला असून रणबीरने निळा शर्ट आणि त्यावर स्लिवलेस व्हाईट जॅकेट घातले आहे. 


नागराज मंजुळे करणार 'मराठी करोडपती'चे सूत्रसंचालन


प्रवासात केली मजा


आलिया- रणबीरच्या अफेअर्समुळे पापाराझींचे लक्ष त्यांच्याकडे सतत असते. ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने ते अनेकदा एकत्र असतात. आता चित्रपटाच्या चित्रीकरणाव्यतिरिक्त प्रमोशन ही गोष्ट आलीच. ब्रम्हास्त्र चित्रपटाविषयी कमालीची गुप्तता पाळल्यानंतर आता पहिल्यांदा या चित्रपटाचा लोगो लाँच करण्याच्या निमित्ताने ब्रम्हास्त्रची टीम कुंभ मेळ्यासाठी बाहेर पडली. या प्रवासादरम्यान आलिया आणि रणबीरने खूप धम्माल केली. त्यांचा प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओदेखील त्यांनी पोस्ट केला आहे.‘ब्रम्हास्त्र’सुरुच राहणार


'ब्रम्हास्त्र' हा सुपरहिरो जॉनरमधील चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत अशीदेखील चर्चा आहे की, ब्रम्हास्त्र हा चित्रपट दर दोन वर्षांनी येणार आहे. करणची या चित्रपटासाठीची पुढील तयारी देखील झाली आहे. ब्रम्हास्त्र हा सुपरहिरो प्रकारातील चित्रपट असून त्यात भारतीय पौराणिक कथांचा समावेश असणार आहे. 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट अयान मुखर्जी  दिग्दर्शित असून या चित्रपटाचे नाव आधी ‘ड्रॅगन’ असे ठेवण्यात आले होते. पण नंतर ब्रम्हास्त्र हे नाव निश्चित करण्यात आले. ब्रम्हास्त्र हे असे शस्त्र आहे ज्याचा कोणीच संहार करु शकत नाही. या चित्रपटात आलिया- रणबीरसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


पाहा 'सूरसपाटा' मराठी चित्रपटाचा ट्रेलर


वर्षाच्या शेवटी सिनेमा रिलीज


 आता नुकताच चित्रपटाचा लोगो लाँच झाला म्हटल्यावर चित्रपटाला वेळ हा लागणारच. हा चित्रपट वर्षाअखेरीस भेटीला येणार आहे. २५ डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे शुटींग बुल्गेरीयामध्ये शूट करण्यात आले आहे.


अयान आला इन्स्टावर 


इन्स्टावर अनेक सेलिब्रिटींचे अकाऊंटस असले तरी अनेक जण आजही इन्स्टा वापरत नाही. ब्रम्हास्त्रच्या निमित्ताने अयान मुखर्जीने स्वत:चे इन्स्टा अकाऊंट तयार केले असून त्याने काही फोटोही शेअर केले आहे. 


ayan bramastra


(फोटो सौजन्य- Instagram)