टीव्हीवरील हे सेलिब्रिटी कपल विभक्त होणार असल्याची चर्चा

टीव्हीवरील हे सेलिब्रिटी कपल विभक्त होणार असल्याची चर्चा

2020 सुरू झालं आहे मनोरंजातील अनेक चांगल्या वाईट घडामोडीही समोर येत आहेत. यात बातमी आली आहे ती एका सेलिब्रिटी कपलच्या विभक्त होण्याची. संजिदा शेख आणि आमिर अली हे टीव्हीवरील आवडतं आणि प्रसिद्ध टीव्ही कपल म्हणून ओळखलं जातं. दोघांच्या जोडीने अनेकांना प्रेम आणि जन्मोजन्मीची साथीची प्रेरणा दिली आहे. आमिर आणि संजिदा आपल्या जोडीचा जलवा नच बलिएमध्येही दाखवला होता. फॅन्सना हे कपल जेव्हा ऑनस्किन एकत्र दिसतं तेव्हा खूपच पसंत केलं जातं. तुम्हीही जर आमिर-संजिदाचे फॅन्स असाल तर पुढील बातमी वाचल्यावर तुम्हाला वाईट नक्कीच वाटेल.

Instagram

मेड फोर इच अदर...आता मात्र

सूत्रानुसार संजिदा आणि आमिरमध्ये आता काहीच आलबेल नाही. एवढंच नाहीतर हे दोघं सध्या वेगवेगळे राहत आहेत. आमिर आणि संजिदा यांचे आपापसात बरेच वाद सुरू असल्यामुळे त्यांनी वेगवेगळं राहायचा निर्णय घेतला आहे. पण त्यांच्या नात्यातील हा दुरावा आत्ताच का आला आहे याचं कारण मात्र समोर आलेलं नाही. जर तुम्ही या दोघांचं सोशल मीडिया अकाउंट नीट पाहिलं तर तुम्हालाही त्यांच्यातील दुराव्याचा अंदाज येईलच. आमिरने जरी 20 डिसेंबर 2019 ला आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर संजिदााच्या नावाने बर्थडे पोस्ट शेअर केली असली तरी वास्तवातील चित्र मात्र वेगळ आहे. या पोस्टमध्ये आमिरने संजिदा आणि त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तसंच सोबतच एक प्रेमळ मेसेजही लिहीला होता. तर संजिदानेही आमिरच्या पोस्टवर थॅक्स असा रिप्लाय केला होता. 

पण जर तुम्ही संजिदाचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलंत तर आमिरसोबतचा तिचा शेवटचा फोटो सप्टेंबरमधला आहे. सप्टेंबर महिन्यात संजिदाने आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

आमिरने दिली ही प्रतिक्रिया

आमिरला जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने अशी प्रतिक्रिया दिली, तुम्ही कशाबद्दल विचारत आहात मला काहीच कळत नाहीयं. एवढंच उत्तर देऊन त्याने पुढे काहीच सांगितलं नाही. आत्तापर्यंत या कपलने एकमेकांमधील दुराव्याबाबत समोर येऊन कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही.

आमिर आणि संजिदाचं लग्न 2012 साली झालं होतं. त्या आधी 7 वर्षांपासून त्यांचं नातं होतं. टीव्हीवर अनेक वर्षांपासून त्यांची जोडी झळकते आहे. एवढंच नाहीतर या दोघांच्या जोडीने नच बलिएचा तिसरा सिझनही जिंकला होता. पूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये आमिरने हेही सांगितलं होतं की, संजिदाला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण त्याला मात्र लग्नाची भीती वाटत होती. पण त्यांची वेगळं होण्याची बातमीही कपलच्या फॅन्ससाठी नक्कीच शॉकिंग आहे.

View this post on Instagram

Merry Christmas 🎄

A post shared by Sanjeeda Shaikh 🧿 (@iamsanjeeda) on

संजिदाने नुकतंच टीव्ही सीरियल 'लव का है इंतजार' मध्ये काम केलं होतं. तर आमिर अलीने 'कहानी घर घर की', 'वो रहने वाली महलों कीं, 'एफआयआर' सारख्या गाजलेल्या सीरियल्समध्ये काम केलं आहे.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.