ADVERTISEMENT
home / बिग बॉस
सिद्धार्थ शुक्लाचे जिंकणे आधीच होते निश्चित,कलर्सच्या कर्मचाऱ्याने केला खुलासा

सिद्धार्थ शुक्लाचे जिंकणे आधीच होते निश्चित,कलर्सच्या कर्मचाऱ्याने केला खुलासा

शनिवारी एकदाचा Bigg Boss 13 चा ग्रँड फिनाले फायनली झाला. कलर्स वाहिनीचा लाडका जावई सिद्धार्थ शुक्ला हा रिअॅलिटी शो जिंकला. असीमला मागे टाकत त्याने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. एकीकडे सिद्धार्थच्या जिंकण्याचा आनंद त्यांचे फॅन्स साजरा करत असताना सिद्धार्थवरुन टीकेची झोड उठू लागली. अनेकांनी हा निकाल आधीपासूनच ठरलेला असल्याचे म्हटले.  काहींना या कार्यक्रमाला स्रिक्पटेड असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे एका कलर्सच्या कर्मचारीने हे सगळे आधीच ठरले असल्याचा खुलासा ट्विटरवरुन केला आहे. त्यामुळे Bigg Boss वरच लोकांना शंका येऊ लागली आहे.

Bigg Boss 13: फॅक्टरी टास्कनंतर होणार फिनालेमध्ये डायरेक्ट एंट्री

सिद्धार्थ शुक्ला झाला विजेता

Instagram

ADVERTISEMENT

कोणी केला हा खुलासा

कलर्ससाठी काम करणाऱ्या फेरिहा नावाच्या मुलीने या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिने यामध्ये म्हटले आहे की, सिद्धार्थ शुक्ला या सीझनचा विजेता होणे अगदी आधीपासूनच ठरलेले होते. सिद्धार्थला कमी मत मिळून सुद्धा तो जिंकणार हे माहीत होते. या कार्यक्रमासाठी आम्ही जीव तोडून काम करतो. पण हे असे ठरलेले असेल तर याला काही अर्थ नाही म्हणूनच मी कलर्सची नोकरी सोडत असल्याचे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तिच्या बॉसलाही केले टार्गेट

इतकेच नाही तर या मुलीने तिच्या बॉसला म्हणजेच मनिषा शर्मा नावाच्या एका व्यक्तीलाही या मध्ये टॅग केले आहे. सिद्धार्त शुक्ला आणि तिच्यामधील असलेल्या संबंधामुळेच त्याला जिंकवण्याचे प्रयत्न तिने केले असे म्हटले आहे. मनिषा शर्मा नावाची ही व्यक्ती कलर्सवर मोठ्या पदावर काम करत असल्याचे यावरुन दिसते. त्यामुळे नोकरी सोडताना तिने तिच्यावर असलेला रागही या ट्विटमधून बोलून दाखवला आहे. 

Bigg Boss: अरहानसोबत ब्रेकअप केल्यानंतर रश्मीने अरहानला घडवली अद्दल

सिक्रेट कॉन्ट्रॅक्ट दाखवा

फेरिहाने केलेला दावा खोटा वाटू नये म्हणून तिने पुढे आणखी एक ट्विट करत एक खुलासा केला आहे. तिने यामध्ये सिद्धार्थ शुक्लाचे कॉन्ट्रॅक्ट काय होते ते सगळ्यांसमोर आणा असे लिहिले आहे. सिद्धार्थ शुक्लाने ज्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली त्यावर आधीच असे लिहिले होते की, सिद्धार्थ शुक्ला हा या सीझनचा विजेता असणार आहे. त्यामुळे हा सगळा शो आधीच स्क्रिप्टेड होता.ज्याने लोकांची दिशाभूल केली आहे.

ADVERTISEMENT

फेरिहा झाली टार्गेट

हीच  कलर्सची कर्मचारी फेरिहा

Twitter

फेरिहाने या सगळ्याचा खुलासा करत लोकांच्या मनात संदेह निर्माण केला असला तरीसुद्धा ही मुलीवरही संशय घेतला जात आहे. काहींनी तिच्या प्रोफाईलला व्हिझिट केल्यानंतर ही मुलगी संशयास्पद असल्याचे म्हटले. फेरिहा ही पाकिस्तानी असून ती कायम भारताविरोधी पोस्ट लाईक करते असे म्हटले आहे तर काहींना फेरिहाने सांगितलेली ही गोष्ट पटली असून त्यांनी कलर्सकडे याची विचारणा केली आहे. कलर्सने याचा खुलासा करावा असे देखील अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे फेरिहा जरी टार्गेट होत असली तरी सिद्धार्थच्या जिंकण्यावर अनेकांना संशय आहे.

आता सिद्धार्थ खरचं तिच्या मेहनतीमुळे जिंकला की त्याच्यावर झालेली टीका खरी होती हे कळेल याची खात्री नाही. कारण प्रेक्षकांनीच या शोला कायम डोक्यावर चढवून ठेवले आहे. आता हिंदीचा रिअॅलिटी शो संपल्यानंतर मराठी बिग बॉसही लवकरच येईल.

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

16 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT