अजय देवगणला त्याच्या सिंघम चित्रपटातील भूमिकेमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. तो घराघरात जाऊन पोहोचला. पण त्याने त्या एका चित्रपटापुरती ती भूमिका साकारली नाही तर तो खऱ्या आयुष्यातही सिंघम असल्याचे आता सिद्ध झाले आहे. सध्या जगात covid 19 मुळे सगळं काही ठप्प आहे. शुटिंग थांबलं आहे. चित्रपट तयार होण्यासाठी जे कामगार काम करतात अशांकडे आता काही काम नाही. त्यांना मदतीचा हात म्हणून अजय देवगणने या कामगारांना मोठी रक्कम देऊ केली आहे. त्यामुळे हा खरा ‘सिंघम’ अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
जुन्या फोटोंवर होतोय कमेंटचा पाऊस, कवी तेच..
अशी मिळाली माहिती
आतापर्यंत अनेक कलाकारांनी कामगारांना मदत देऊ केली आहे. ही आकडेवारी समोरसुद्धा आली आहे. यामध्ये अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, ऋतिक रोशन, सलमान खान अशा कलाकारांनी मदत केली आहे. पण त्यांनी याचा गवगवा केला नाही. अगदी त्याचपद्धतीने अजय देवगणने केलेली मदत ही कळली नसती जर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एक व्हिडिओ शेअर केला नसता तर. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून FWICE (Federation of Western India Cine Employees ) या कामगार संघटनेला 51 लाखांची मदत केली आहे. त्याच्या या मदतीमुळे कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरचं लग्न तुटण्याच्या मार्गावर
Dear @ajaydevgn, we thank U for your generous contribution of ₹51 lakhs towards @fwice_mum, for the benefit of our 5 lakh #CineWorkers. U have proved time & again, especially in times of crisis, that U are a real life #Singham. God bless U.#FWICEFightsCorona #IndiaFightsCorona pic.twitter.com/e2NZ0V3q52
— Ashoke Pandit (@ashokepandit) April 1, 2020
तर पंतप्रधान फंडालाही केली मदत
सध्या देश इतक्या मोठ्या महामारीचा (Pandemic) चा सामना करत आहे. यासाठी उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम देशाकडून केले जात आहे. प्रत्येक राज्य यासाठी झटत आहे. अजय देवगणच्या प्रोडक्शन कंपनीने त्या ठिकाणीही मदत जाहीर केली आहे. त्याने तब्बल 1.1 कोटींची मदत पंतप्रधान फंडात केली आहे. या संदर्भातील अधिकृत ट्विट त्याने केले आहे.
निसा संदर्भात अफवा
काही दिवसांपूर्वी अजय देवगणची मुलगी निसा देवगण हिला कोरोना झाल्याच्या चर्चा होत होत्या. पण आता या चर्चांना ब्रेक लागला आहे. कारण या सगळ्या अफवा असल्याचे अजय देवगण याने सांगितले आहे. काजोल निसाला घेऊन काही चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. त्यानंतरच या चर्चेला उधाण आले. एका वेबसाईटने कोणतीही माहिती न घेता निसाला कोरोना झाल्याची बातमी करुन टाकली. त्यानंतर अनेकांनी अजय देवगणला याची विचारणा केल्यानंतर त्याला या बाबतीत स्पष्टीकरण द्यावे लागले.
Thank you for asking. Kajol & Nysa are absolutely fine. The rumour around their health is unfounded, untrue & baseless🙏
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 30, 2020
सगळे शुटींग थांबले
देशभरात मार्च महिन्यापासूनच थिएटर बंद करण्यात आली आहेत. अनेक चित्रपटांनी त्यांच्या रिलीजच्या तारखादेखील बदलल्या आहेत. अनेक डेलीसोपचे शुटींग थांबले आहे. अजय देवगणचा ‘तान्हाजी’ चित्रपट येऊन गेला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता सूर्यवंशी चित्रपटही लवकरच फ्लोअरवर येणार आहे.
पण आज खऱ्या अर्थाने सिंघमचा सिंघमपणा पुन्हा एकदा सगळ्यांना दिसला असे म्हणायला हवे.