ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
अंडरआर्म्स काळवंडलेत?  मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी

अंडरआर्म्स काळवंडलेत? मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी

स्लिवलेस, सिंग्लेट, हॉल्टरनेक अशा टॉप्सची सध्या चलती आहे. पण हे टॉप्स घालताना आपल्याया नेहमी टेन्शन येते ते आपल्या अंडरआर्म्सचे… कारण असे कपडे घालण्यासाठी क्लिअर अंडरआर्म्स असणे आवश्यक असते. पण काळवंडलेले अंडरआर्म्स, इनरग्रोथ यामुळे तुमचे अंडरआर्म्स आकर्षक दिसत नाहीत. पण रोज काळजी घेतली तर तुमचे अंडरआर्म्स चांगले दिसू शकतात. ही काळजी घेणे खिशालाही परवडणारी आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. पण थोडावेळ काढणे गरजेचे आहे.

म्हणून येथील त्वचा काळवंडते,जाणून घ्या कारणे आणि झटपट उपाय

माईल्ड साबणाचा वापर

मनाच्या स्वच्छतेसोबत शरीराची स्वच्छता असणेही आवश्यक असते, असे नेहमीच म्हटले जाते. अंडरआर्म्सच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. नेहमी आंघोळ करताना एखाद्या माईल्ड साबणाने अंडरआर्म्स चांगले धुवून घ्या. तुम्ही दोन वेळा आंघोळ करत नसाल तरी रात्री झोपताना अंडरआर्म्स स्वच्छ करुन झोपायला विसरु नका. दिवसातून किमान दोन वेळा तुम्हाला अंडरआर्म्स स्वच्छ करणेआवश्यक आहे. विशेषत: काही महिलांना काखेत खूप घाम येतो. त्या घामाचा दर्पही खूप असतो. घाम अंडरआर्म्समध्ये सुकतो आणि तो भाग काळवंडतो म्हणून अशांनी तर कायमच अंडरआर्म्स स्वच्छ ठेवलेच पाहिजे. कारण त्यांचे अंडरआर्म्स काळवंडण्याची शक्यता अधिक असते.

ADVERTISEMENT

arm sweat

तुम्हालाही हवेत मुलायम आणि कोमल पाय? मग नक्की वाचा

स्क्रबिंग

अंडरआर्म्स आठवडयातून एकदा तरी स्क्रब करा. कारण तुम्हाला दिसत नसले तरी त्या भागात सुक्ष्म जीवाणू असतात.  शिवाय डेड स्किनही असते. स्क्रब केल्याने घाणही निघून जाते.

ADVERTISEMENT

घाम कसा थांबवायचा हे देखील वाचा

तुमच्यासाठी काही नैसर्गिक स्क्रब

बाजारात कित्येक स्क्रब मिळतात. पण ते तुम्हाला नको असतील तर घरच्या घरी काही स्क्रब तयार करता येतील.

  • कॉफी स्क्रब -जाड दळलेली कॉफी घेऊन त्यात थोडी अॅलोवेरा जेल घालून थीक पेस्ट तयार करा आणि अंडरआर्म्सना चोळा. पण अगदी १ मिनिटेच कारण हा भाग खूप नाजूक असतो.
  • ओट्स– कॉफी प्रमाणे ओट्समध्ये तुम्हाला अॅलोवेरा जेल आणि थोडीशी हळद घालायची आहे. हा स्क्रब खूप सिल्की स्मुथ आहे त्यामुळे तो थोडावेळ अधिक चोळायला हरकत नाही.
  • बेकिंग सोडा– थोडासा बेकिंग सोडा घेऊन त्यात अगदी दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घाला आणि ती पेस्ट अंडरआर्म्सला दोन ते तीन मिनिटे लावून ठेवा आणि अंडरआर्म्स थंड पाण्याने धुवून टाका.
  • मध आणि साखर– मध्यम आकाराची साखर घेऊन त्यात थोडे मध मिसळून हे मिश्रण तुम्हाला अंडरआर्म्सवर एक मिनिट घासायचे आहे. कोमट पाण्याचे काख धुवून तेथील त्वचा कोरडी करुन घ्यायची आहे. 

*स्क्रब केल्यानंतर तेथील त्वचा कोरडी होऊन जाते.अशावेळी एखादे मॉश्चरायझर लावायला विसरु नका.

ADVERTISEMENT

 डिओ वापरताना

अनेकांना डिओ थेट अंडरआर्म्समध्ये मारण्याची सवय असते. ही सवयही तुमच्या अंडरआर्म्ससाठी घातक आहे. कारण कोणतीही गोष्ट थेट तुमच्या अंडरआर्म्सला लावणे चुकीचे त्यातच जर तुम्ही शेव किंवा वॅक्सिन केल्यानंतर हा प्रयोग तेला तर जळजळ अधिक जाणवते. डिओ लावण्याआधी अंडरआर्म्सवर एक पातळ लेअर व्हॅसलीनचा लावा आणि मग त्यावर डिओ लावा. हे रोज करणे शक्य नसल्यास मानेवर आणि पुढील भागावर डिओ लावा.

use of deo

अंडरआर्म्ससाठी काय चांगले शेव्हिंग की वॅक्सिंग?

ADVERTISEMENT

अंडरआर्म्स ब्लिचिंग

अनेकांना पार्लरमध्ये अंडरआर्म्स स्वच्छ आणि उजळ दिसण्यासाठी ब्लीच करण्याचा सल्ला दिला जातो.  ब्युटीशिअनच्या सल्ल्याने जरी तुम्ही ते करत असलात तरी ते तुमच्या अंडरआर्म्ससाठी चांगले नाही. कारण ब्लीचचा परिणाम असेपर्यंत ते स्वच्छ गोरेपान वाटतात. पण हा टेंपररी ईलाज आहे.त्यामुळे ते करणे टाळा.

underarms bleaching

 झटपट केस काढणे धोक्याचे

ADVERTISEMENT

एखाद्या पार्टीला किंवा कोणासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन झाला आणि त्यावेळी तुम्हाला अचानक स्लिवलेस किंवा सिंग्लेट कपडे घालायचे असतील तर आपण लगेच एका हाताता रेझर नावाचे श्सत्र घेऊन तयारच असतो. म्हणजे काही दिवसांपूर्वी वॅक्स त्यानंतर काखेतले थोडेसे केस वाढले आणि घाईत बाहेर जायचे म्हणून रेझर वापरणे कधीही चुकीचे आहे. तुम्हाला कितीही घाई होत असली तरी तुमच्या एका चुकीच्या वागण्यामुळे तुमच्या अंडरआर्म्सवर परिणाम होऊ शकतो. कारण अशामुळे केसांची वाढ मागे पुढे होते. काही ठिकाणी केस लवकर वाढत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही भविष्यात कधीही वॅक्सिंग करायला जाता तेव्हा तुम्हाला त्रास होतो. ग्रोथ नसलेले केस निघत नाहीत.अंडरआर्म्स स्वच्छ  दिसत नाहीत.

तंग कपडे

काहींना तंग कपडे घालण्याची सवय असते. विशेषत: सलवार, कुडती, टिशर्ट  काहीजण फारच टाईट वापरतात. त्यामागे त्यांना त्यांची फिगर दाखवायची असते हे बरोबर असले तरी तुमच्या या तंग कपड्यांचा त्रास तुमच्या अंडरआर्म्सला होतो. कारण अंडरआर्म्सला आवश्यक असलेली हवा लागत नाही. शिवाय जर ते कपडे स्लिवलेस असतील तर मग विचारता सोय नाही. कारण त्याच्या कडा तुमच्या अंडरआर्म्सला सतत लागत असतात. त्यामुळे तुम्हाला न कळत जखमा होत राहतात. त्या तुम्हाला लक्षात येत नाहीत. त्यामुळे थोडे सैल कपडे घाला.

tight clothing

ADVERTISEMENT

 थोडी काळजी घेतली तर तुमचे अंडरआर्म्सही दिसतील. सिल्की स्मुथ होतील.

टीप- खूप प्रयोग करणेही चांगले नाही. कारण त्यामुळे तुमचे अंडरआर्म्स अधिक नाजूक होत जातात आणि तुम्हाला हवे तसे अंडरआर्म्स मिळणे कठीण होऊन जाते.

(फोटो सौजन्य- Instagram)

 

ADVERTISEMENT

 

 

28 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT