Flashback : 'पीकू' च्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला नव्हती पहिली पसंती

Flashback : 'पीकू' च्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला नव्हती पहिली पसंती

बॉलीवूडमध्ये अनेक गाजलेल्या भूमिका या पहिल्यांदा एखाद्या अभिनेत्याने नाकारल्यानंतर दुसऱ्याला मिळतात. पण नेमक्या याच भूमिका आणि चित्रपट गाजल्यानंतर त्यांना आपली चूक कळते. अशा बऱ्याच कथा बॉलीवूडमध्ये आहेत. यातच आता सामील झाली आहे दीपिका पदुकोणच्या पीकूची कथा.

Instagram

बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) चा 2015 साली आलेला सिनेमा 'पीकू' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पीकू चित्रपटातील अभिनयाबद्दल दीपिकाचं खूप कौतुक झालं होतं. तसंच या चित्रपटातील अभिनयासाठी दीपिकाला अनेक अवॉर्ड्सही मिळाले होते. या चित्रपटात दीपिकासोबत महानायक अमिताभ बच्चन आणि हरहुन्नरी अभिनेता इरफान खान होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं शूजित सरकारने. दीपिका आणि अमिताभ यांची या चित्रपटातील केमिस्ट्री एकदम धमाल होती. त्यामुळे जेव्हा पीकूसाठी दीपिकाही पहिली पसंती नव्हती हे कळल्यावर आम्हालाही धक्का बसला. कारण पीकू म्हटल्यावर लगेचच डोळ्यासमोर येते ती दीपिका आणि अमिताभ यांची जोडी.

पीकूबाबत या अभिनेत्रीने केला खुलासा

पीकूबाबत बॉलीवूडची बबली गर्ल परिणीती चोप्ना (Parineeti Chopra) ने खुलासा केला आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, पीकूसाठी दिग्दर्शक शूजित सरकारची पहिली पसंती दीपिका पदुकोणला नाहीतर तिला विचारण्यात आलं होतं. हो… एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये परिणीती चोप्राने सांगितलं की, शूजित सरकार यांनी पीकूसाठी मला अप्रोच केलं होतं. मला या गोष्टीचं दुःख आहे की, तेव्हा तो सिनेमा मी नाकारला. याबाबत चित्रपटाबाबत सांगताना ती म्हणाली की, मी या चित्रपटाला थेट नकार दिला नव्हता. खरंतर मी कन्फ्यूज झाले होते. पण त्यामुळे माझं बरंच मोठं नुकसान झालं. परिणीतीने नाकारलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 करोडची कमाई केली होती. जी नक्कीच कौतुकास्पद होती.

पीकूची सिंपल कथा

View this post on Instagram

#Piku :) Trailer - www.bit.ly/PIKU-Trailer

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या चित्रपटात दाखवण्यात आलेलं की, दीपिका आपल्या वडिलांची खूप लाडकी असते. पण त्यांचं नात अगदी तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं असतं. वडिलांच्या आजारामुळे पीकू लग्नही करत नसते आणि त्यांच्या काळजी घेण्यातच आपला सगळा वेळ घालवत असते. प्रेक्षकांना हे बापलेकीचं नातं खूपच आवडलं होतं. त्यामुळेच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. परिणीताचं नुकसान झालं तर दीपिकाचा नक्कीच फायदा झाला. हा सिनेमा तिच्या करिअरमधील एक माईलस्टोन ठरला आहे.

दीपिका आणि परिणीतीचे फ्युचर प्रोजेक्ट्स

लवकरच दीपिका तिचा नवरा रणवीर सिंह (Ranveer Singh) सोबत आगामी 83 या चित्रपटात दिसणार आहे. क्रिकेटवर आधारित या सिनेमामध्ये रणवीर क्रिकेटर कपिल देवच्या भूमिकेत दिसणार असून दीपिका त्याच्या बायकोच्याच भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर या दोघांचा हा पहिला एकत्र येणार सिनेमा असल्यामुळे याबाबत उत्सुकता आहे.

तर परिणीती लवकरच 'जबरिया जोडी' या चित्रपटा दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती रोमान्स करताना दिसेल. याच दिग्दर्शन प्रशांत सिंहने केलं आहे. 'जबरिया जोडी' शिवाय परिणीती चोप्रा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्येही झळकणार आहे. यासाठी ती खास बॅडमिंटनचं ट्रेनिंगही घेत आहे.

हेही वाचा -

‘या’ कारणासाठी आलिया भटला सोडावं लागलं ब्रम्हास्त्रचं शूटिंग अर्धवट

प्रियांकाला लागले संघाचे वेड, प्रियांकाच्या नव्या फोटोनंतर लोकांमध्ये चर्चा

पाकिस्तानी क्रिकेटर करणार होता ‘या’ अभिनेत्रीचं अपहरण, केला खुलासा