दीया और बाती हम फेम कनिका महेश्वरीने '17' किलो वजन केलं कमी

दीया और बाती हम फेम कनिका महेश्वरीने '17' किलो वजन केलं कमी

'दीया और बाती हम' अथवा 'तू सूरज मैं सांज पियाजी' या मालिकेतील मिनाक्षी राठी तुमच्या नक्कीच लक्षात असेल. मॉंसाशी सतत खोटं बोलणारी, पैशांसाठी काहिही करायला तयार होणारी तरी घरातील एक हवी हवीशी असणारी अशा घरेलू बहूची भूमिका तिने यात साकारली होती. तिच्या विनोद आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे सहाय्यक भूमिका असूनही मिनाक्षी लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मात्र आता जर तुम्ही या मिनाक्षीला म्हणजेच अभिनेत्री कनिका महेश्वरीला पाहाल तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कारण तिचा हा ट्रान्सफॉर्मेशन लुक पाहून तुम्ही तिला ओळखणार सुद्धा नाही. कनिकाने ट्रान्सफॉर्मेशन करत आता चक्क 17 किलो वजन कमी केलं आहे. 

कसं केलं कनिकाने एवढं वजन कमी

कनिकाने 'दीया और बाती हम' अथवा 'तू सूरज मैं सांज पियाजी' या मालिकांमधील मिनाक्षी साकारल्यानंतर 2012 मध्ये बिझनेसमेन अंकुर घईसोबत संसार थाटला. 2015 मध्ये कनिका आई झाली तिने मुलाला जन्म दिला. ज्यामुळे तिने करिअरमधून काही काळासाठी ब्रेक घेतला. बाळाच्या संगोपनासाठी तिने अभिनय आणि मालिकांपासून स्वतःला इतकी वर्षे दूर ठेवलं होतं. मात्र आता ती पुन्हा 'क्यू उत्थे दिल छोड आये' मालिकेतून दिसणार आहे.  मात्र बाळंतपणानंतर पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाळ झाल्यानंतर तिचं वजन वाढल्यामुळे तिला चिडवण्यात येत होतं. सोशल मीडियावरूनही ती बॉडी शेमिंग केलं जात होतं. कनिकाने मात्र या सर्व निंदेला एका आव्हान स्वरूपात स्विकारलं. कारण तिच्या मते शारीरिक फिटनेस पेक्षाही तुमचं मानसिक फिटनेस गरजेचं असतं. जर तुमचं मन शांत असेल तर तुम्ही कोणतंही आव्हान स्विकारू शकता. त्यानुसार तिने तिच्या मानसिक स्वास्थावर आधी जास्त भर दिला. त्यामुळेच ती लोकांच्या निंदेला आव्हान स्वरूपात स्वीकारू शकली. लॉकडाऊनच्या रूपात आलेल्या संधीचा तिने चांगला फायदा घेतला. या काळात तिने वर्कआऊट आणि डाएटवर भर दिला. बाळाचं संगोपन आणि स्वतःचा फिटनेस या दोन्ही गोष्टी या काळात तिने कौशल्याने केल्या. ज्यामुळे बघता बघता तिचं वजन चक्क सतरा किलोने कमी झालं. आता नवीन मालिकेत तिला पाहून निंदा करणारे लोक स्वतःच्या तोंडात बोट घालत आहेत. 

काय म्हणाली याबाबत कनिका महेश्वरी

वजन कमी करण्याबाबत कनिकाने शेअर केलं की आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्हाला स्वतःचं शेड्यूल बनवावं लागतं आणि ते काटेकोरपणे पाळावं लागतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मलाच स्वतःवर खूप अभिमान वाटू लागतो. हे म्हणणं खूप सोपं आहे पण करणं नक्कीच कठीण आणि चॅलेजिंग होतं. लॉकडाऊनच्या काळात तर मला कोणतीही मदत मिळत नव्हती. बऱ्याचदा फक्त भात आणि डाळच खावा लागत होता. मात्र तेव्हाही मी वर्कआऊट करणं नाही सोडलं. याकाळात मी प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, गोड पदार्थ, ग्लूटेन माझ्या डाएटमधून पूर्ण बंद केलं होतं. मी दर विक ऐंडला माझा आठवडाभराचा प्लॅन आणि टू डू लिस्ट तयार करते. माझी फिटनेस जर्नी ही शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होती. मी माझ्या वॉलपेपरवर माझा जुना फोटो लावून ठेवला होता. जो मी दिवसभर पाहत  असे, भिंती आणि बाथरूममध्ये नोट लावल्या होत्या ज्या मी सतत वाचत असे. याचा संपूर्ण परिणाम आता माझ्या फिटनेसमधून तुम्ही पाहू शकता.