‘डोक्याला शॉट’ लावण्याआधी एक मिनिटं,टीझर रिलीज

‘डोक्याला शॉट’ लावण्याआधी  एक मिनिटं,टीझर रिलीज

आंतरजातीय विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आपण आतापर्यंत पाहिल्या असतीलच. म्हणजे सिनेमातून अनेकदा हे विषय मांडले जातात. पण या नात्यात होणारे विनोद कोणी पाहिले आहेत का?  असाच काहीसा तुम्हाला हसायला लावणारा डोक्याला शॉट या सिनेमाचे टीझर आहे. हा पण एक मिनिटं आता तुमच्या डोक्याला शॉट लागण्याआधी तुम्ही या सिनेमाचे टीझर पाहाच. या सिनेमाच्या पहिल्या सीनपासूनच तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू येईल.


राखी सावंतने का लावला कानाला खडा?


कसा वाटला टीझर?


दिल दोस्ती दुनियादारीमधून घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.त्याचे प्रेम एका साऊथ इंडियन मुलीवर आहे. भिन्न भाषा आणि भिन्न संस्कृतीशी जुळवून घेताना सुव्रतची काय धांदल उडणार हा दाखवणारा चित्रपट असणार आहे, असे दिसत आहे. साऊथ इंडियन म्हटल की, डोळ्यासमोर येणाऱ्या सगळ्या गोष्टी टीझरमधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि हा प्रयत्न अगदी छान जुळून आला आहे. आता या लग्नाची गोष्ट काय असेल ? हे पाहण्यासाठी आपल्याला सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहावे लागणार आहे. तेव्हाच कळेल की सुव्रतला लग्नानंतर कायम इडली मिळणार की त्याच्या चित्रपटाच्या नावाप्रमाणे त्याच्या डोक्याला शॉट लागणार?

 प्राजक्ता बनली साऊथ इंडियन वधू


मराठी मुलगा सुव्रतची साऊथ इंडियन वधू प्राजक्ता माळी आहे. टीझरमध्ये प्राजक्ताची एक झलक दाखवण्यात आली आहे. ज्यात ती साऊथ इंडियन वधूच्या रुपात असून ती सव्रतच्या गळ्यात वरमाळा घालत आहे. शिवाय सुव्रतची एंट्री एकदम  टिपिकल साऊथ इंडियन पद्धतीची दाखवण्यात आली आहे. आता उत्सुकता आहे ती प्राजक्ताची… कारण तिला आपण अनेक मालिकांमधून पाहिले आहे. हंपी चित्रपटातून तिच्या अभिनयाचा वेगळा पैलू दिसला आहे आणि आता या चित्रपटात तिचा स्वभाव, तिची बोलण्याची पद्धत कशी असेल ?याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच असणार आहे.


prajakta mali


सुव्रतची कॉमेडी


‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून सुजय अर्थात आपला सुव्रत जोशी वेगळ्या अवतारात दिसला होता. पण कॉमेडीची त्याची टायमिंग एकदम करेक्ट होती. आता या चित्रपटातील टीझरमध्ये त्याच्या तोंडी एकच डायलॉग आहे तो म्हणजे ‘एक मिनिट’... पण सगळीकडे बोलण्याची त्याची पद्धत इतकी वेगळी आहे की, आपल्याला हसू आल्यावाचून राहात नाही.या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर त्याचे फनी पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. त्यामध्ये सुव्रतचा लुक नाही. पण प्राजक्ता साऊथ इंडियन मुलगी बनली आहे का? असे वाटत होते. पण आता टीझरमधून त्यावर पडदा उठला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट इन्स्टावर शेअर केली होती. त्यात त्याने wrap for yet another projet असे म्हटले होते आणि त्यातील मुलगी ओळखा असेही सांगितले होते आता ही मुलगी कोण तुम्हाला कळली असेलच.


रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणार दबंग सलमान खान 

प्रेमवीरांची दांडी गुल करणार का चित्रपटातील नवं गाणं ?


नवी जोडी 


 सुव्रत आणि प्राजक्ता या दोघांनी या आधी कधीच एकत्र काम केलेले नाही. पहिल्यांदाच हे दोघे जोडप्याच्या रुपात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री कपल म्हणून कशी वाटते ते पाहावे लागेल.


१ मार्चला सिनेमा प्रदर्शित


 अ व्हिवा इनएन या प्रोडक्शन हाऊसचा हा सिनेमा उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि सुमन साहू चित्रित आहे. हा सिनेमा येत्या १ माार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवकुमार पार्थ सारथी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशी सोबत गणेश पंडित, रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन प्रमुख भूमिकेत आहेत.


(सौजन्य- Instagram)