दोन वर्षांच्या आत 'कसौटी जिंदगी की' मालिका गुंडाळणार गाशा

दोन वर्षांच्या आत 'कसौटी जिंदगी की' मालिका गुंडाळणार गाशा

दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेली एकता कपूरची मालिका ‘कसौटी जिंदगी की’ लवकरच आपला गाशा गुंडळणार आहे. येत्या 3 ऑक्टोबरपासून मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेमध्ये सतत काही ना काही बदल होत होता. तसंच मध्यंतरी प्रमुख भूमिकेत असणारा पार्थ समाथानही कोरोनामुळे आजारी होता.  तर काही दिवसांपूर्वी पार्थ मालिका सोडत आहे अशीही बातमी होती. मात्र आता मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोड शेवट करून मालिका बंद होणार असे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व कलाकार मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. याच आठवड्यात सर्वांना ही सूचना देण्यात आल्याचे समजत आहे. हा निर्णय नक्की का घेण्यात आला याबद्दल कोणालाही माहीत नसल्याचं कलाकारांचं म्हणणं आहे. 

11 वर्षांपूर्वी केलेल्या रियाने केलेल्या ट्विटवर नेटीझन्सची चर्चा

प्रत्येक कलाकाराने केलं जीव ओतून काम

गेले दोन वर्ष या मालिकेतील प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करत आहे. मात्र त्यानंतरही ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा स्लॉट बदलून साथ निभाना साथिया 2 या नव्या मालिकेला देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तसंच या मालिकेतील कमोलिका, मिस्टर बजाज ही पात्रही खूप वेळा बदलण्यात आली. पहिल्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेचे भाग साधारण सात वर्ष चालू होते. मात्र आता ही मालिका दोन वर्षांच्या आतच संपविण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे कळते.  याचे नक्की काय कारण आहे हे मात्र उघड होऊ शकलेले नाही. पण तरीही घसरता टीआरपी आणि  कलाकारांचे सततचे धरसोड प्रकरण हेच या मालिकेचे बंद होण्याचे कारण असेल असे बऱ्याच जणांना वाटत आहे. 

'बधाई हो' मधील अभिनेत्री रुग्णालयात दाखल, ब्रेन स्ट्रोकचा त्रास

पार्थ अजूनही मालिकेत कायम

पार्थला संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटात काम मिळालं असून तो लवकरच मालिका सोडणार अशीही बातमी पसरली होती. त्याने आपला राजीनामाही दिला होता. मात्र आता पार्थ मालिका सोडणार नसून तो रोज सेटवर येत असून आपलं चित्रीकरण पूर्ण करत आहे. कोरोनामधून बरा होऊन पार्थने पुन्हा काम सुरू केले आहे. त्याशिवाय त्याच्या हाती आता मोठा चित्रपटही लागला आहे. तसंच मालिका संपत असल्याने पार्थ आता चित्रपटावरही लक्ष केंद्रीत करू शकेल. दरम्यान मालिकेतील कलाकारांचे एक मोठे कुटुंब झाले होते. त्यामुळे मालिका संपल्यावर सगळेजण एकमेकांच्या आठवणीत रमतील असंही यातील कलाकार साहिल आनंद याने सांगितलं आहे. तर साहिलनेही ही मालिका सोडली होती. मात्र आता सहा महिन्यांनी पुन्हा एकदा साहिल चित्रीकरणासाठी सेटवर आल्याचेही सांगण्यात येत आहे. मालिकेच्या शेवटच्या भागांचे चित्रीकरण सध्या चालू असून मालिकेचा शेवट हा आनंदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एरिका फर्नांडिस आणि पार्थ समाथानची ही मालिका जास्त काळ मात्र तग धरू शकली नाही हेच खरं आहे. त्यामुळे पहिल्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेला प्रेक्षकांनी जितका भरभरून प्रतिसाद दिला तितका प्रतिसाद या मालिकेला मिळालेला दिसून येत नाही. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जरी असली तरीही पहिल्या मालिकेइतके प्रेम या मालिकेला मिळू शकले नाही.

अक्षय कुमारने 'या' चित्रपटांमध्ये साकारला आहे अफलातून खलनायक

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा