चित्रपटाच्या निर्मिती आणि हक्कांबाबत अनेकदा काँट्रोव्हर्सीज निर्माण होतात. जसं हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हे घडतं तसंच मराठी चित्रपट इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. नुकताच असा एक उच्च न्यायालयातला वाद अखेर मिटला असून त्या चित्रपटाच्या निर्मिताचा मार्ग मोकळा झाला आहे. जाणून घेऊया या वादाबाबत विस्तृतपणे.
काय होता हा संपूर्ण वाद?
जवळपास आठ-दहा महिन्यांपूर्वी अमेय खोपकर एंटरटेन्मेटकडून ‘दे धक्का 2’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, यापूर्वी दे धक्का या चित्रपटाची निर्मिती झी कडून करण्यात आली होती. त्यामुळे दे धक्काचे हक्क झीकडे असून, ‘दे धक्का 2’ ची निर्मिती अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला करता येणार नाही असे झीचे म्हणणे होते. या वरून निर्माण झालेला वाद सहा महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन नुकताच त्यावर निकाल दिला. उच्च न्यायालयाने झी चा दावा फेटाळून ‘दे धक्का 2’ च्या निर्मितीचा अधिकार अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला असल्याचे नमूद केले. त्यामुळे अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला ‘दे धक्का 2’ या चित्रपटाची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘दे धक्का’ निर्णय
अमेय खोपकर एंटरटेन्मेंटने झी स्टुडिओजला धक्का दिला आहे. ‘दे धक्का 2’ च्या निर्मितीबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला असून, आता अमेय खोपकर एंटरटेन्मेंटच ‘दे धक्का 2’ ची निर्मिती करणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत
अखेर अमेय खोपकर आणि त्यांच्या ‘दे धक्का 2’ टीमच्या प्रयत्नांना यश आलं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचां त्यांनी स्वागत केलं आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत अमेय खोपकर म्हणाले की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे, तसंच ‘दे धक्का 2’ या चित्रपटाच्या टीमचं त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी मी अभिनंदन करतो.
दे धक्का च्या सिक्वलची उत्सुकता
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आता प्रेक्षकांमध्ये नक्कीच पुढील भागाची उत्सुकता निर्माण होईल. कारण दे धक्का हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. दे धक्का हा चित्रपट फुल धम्माल कॉमेडी आणि मल्टीस्टारकास्ट असलेला होता. त्यामुळे याच्या सिक्वलमधील स्टारकास्टबाबतही साहजिकच उत्सुकता आहे. दे धक्का मधील उगवली शुक्राची चांदणी हे गाणंही खूप गाजलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलला पहिल्या चित्रपटाच्या यशाचा नक्कीच फायदा होईल. या चित्रपटाचं जे पोस्टर व्हायरल झालं होतं त्यामध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि मेधा मांजरेकर अशी स्टारकास्ट दिसत आहे. तसंच दे धक्का चा हा भाग महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात जाणार असल्याचंही याच्या पोस्टरमध्ये सूचवण्यात आलं आहे. त्यामुळे याची कथा सिक्वलमध्येही इंटरेस्टिंग नक्कीच असेल.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
हेही वाचा –