होलिकोत्सव हा सण संपूर्ण भारतीयांसाठी एक आनंदाचा सण असतो. कारण या दिवशी प्रत्येकाच्या आनंदाला अगदी उधाण आलेलं असतं. होलिका दहन आणि रंगपंचमीमुळे या सणाला फारच मजा येते. वास्तविक आजकालच्या आधुनिक जगात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे सर्वजण कुटुंबापासुन दूर राहतात. त्यामुळे होळीच्या शुभेच्छांसोबतच रंगपंचमीच्या दिवशी अनेकांकडे खास गेट-टूगेदरचं आयोजन केलं जातं. त्यामुळे कुटुबातील माणसं, मित्रमंडळी एकत्र येतात. दूरावलेली नाती एकत्र येण्यासाठी रंगपंचमी एक चांगलं माध्यम आहे.
सणासाठी एकत्र आलेल्या पाहुण्यासाठी घरोघरी खास होळी स्पेशल रेसिपीजचा बेत केला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी केली जाते. शिवाय रंगपंचमीला भारतातील अनेक घरात थंडाई करण्याचा बेत ठरतो. थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्यामुळे या दिवसांमध्ये काहीतरी थंड पदार्थ करणं गरजेचं असतं. शिवाय दिवसभर रंगपंचमी खेळल्यानंतर थकवा घालविण्यासाठी काहीतरी पौष्टिक आणि थंड पेय नेहमीच उत्तम ठरतं. त्यामुळे या दिवशी अनेकजण थंडाईचा प्लॅन करतात. बाजारात तयार थंडाई उपलब्ध असते. मात्र ‘होममेड थंडाई’ तयार करण्याची मौजच काही न्यारी असते. त्यामुळे यावर्षी तुम्ही देखील रंगपंचमीच्या पार्टीसाठी थंडाई बनविण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगितलेली ही होममेड थंडाईची रेसिपी अवश्य फॉलो करा. शिवाय आम्ही तुम्हाला थंडाई कशी तयार करायची याचा एक व्हिडिओ देखील शेअर करत आहोत. विविध ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने थंडाई केली जाते. मात्र योग्य पद्धतीने थंडाई तयार करण्यासाठी तुम्हाला परफेक्ट रेसिपी आणि साहित्य माहित असणे गरजेचे आहे. आम्ही दिलेली थंडाईची रेसिपी खानदानी राजधानीचे कॉरपोरेट शेफ महाराज जोधाराम चौधरी यांनी आपल्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे या रंगपंचमीला घरीच मस्त थंडाई तयार करा आणि कुटुंबासोबत या थंडगार होममेड थंडाईचा आस्वाद घ्या.
थंडाईसाठी लागणारे साहित्य
साडे चार कप फुल फॅट क्रीम दूध, अर्धा कप पिठी साखर, चिमुटभर केशर, काही थेंब गुलाबपाणी, अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप पिस्ता, दोन चमचे खसखस, दोन चमचे बडीसोप, दोन चमचे टरबूजाच्या बिया, एक चमचा वेलची, अंदाजे वीस काळीमिरीचे दाणे, तीन चार गुलाबाच्या पाकळ्या.
वाचा- रंगपंचमीची संपूर्ण माहिती
होममेड थंडाई करण्याची कृती
सर्वात आधी दूध गरम करून सामान्य तापमानाला थंड करा. अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप पिस्ता, दोन चमचे खसखस, दोन चमचे बडीसोप, दोन चमचे टरबूजाच्या बिया वीस मिनीटे पाण्यात भिजवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. कोमट झालेल्या दूधात साखर मिक्स करा आणि दोन तास फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवून द्या. दोन तासांनंतर त्यात सुक्यामेव्याची वाटलेली पेस्ट टाका. केशर तव्यावर हलके गरम करून कोमट दुधात मिसळून तेही दूधात मिसळा. दूधात हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि पुन्हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
सर्व करताना गुलाबाचे काही थेंब आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा आणि थंडगार थंडाई सर्वांना द्या.
अधिक जाणून घेण्यासाठी POPxo चा How to make Thandai at Home हा व्हिडीओ नक्की पहा
POPxo च्या सर्व वाचकांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा…सुरक्षित रंगपंचमी खेळा आणि कुटुंबासोबत आनंदाने हा सण साजरा करा. आम्ही दिलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा.
दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज
मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी तुम्ही पाहिल्यात का
उपवासाच्या दिवशी करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम