सेलिब्रिटी आहात म्हणजे परफेक्टच दिसले पाहिजे असा आता सर्वसाधारण समज झाला आहे. पण सेलिब्रिटीही माणसंच असतात की, हाडामांसाची ..तरी देखील एखादी सेलिब्रिटी थोडी जाड किंवा सेलिब्रिटींच्या प्रमाणांमध्ये बसणारी नसेल तर मग तिला ट्रोल केले जाते. एलियाना डिक्रुजच्या बाबतीतही असेच काही झाले आहे. तिच्या काही फोटोजची छेडछाड करुन तिच्या शरीरावरुन सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्यांना तिने चांगलीच चपराक दिली आहे. तिच्या या उत्तरामुळे नक्कीच अनेकांना आत्मविश्वास मिळेल.
सोनाली कुलकर्णी या डान्स शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत
इलियाना डिक्रुजचे वजन गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. तिच्या शरीरातील हे बदल अनेकांनी फारच वाईट पद्धतीने टिपले. उगाचच फोटोमध्ये शरीराचा एखादा अवयव मोठा दाखवून उगाचच त्यावर चर्चा केली जाते. तिच्या या फोटोजबद्दल एका प्रसिद्ध मनोरंजन चॅनेलने तिची मुलाखत घेतली. त्यावेळी तिने सांगितले की, हो माझे वजन वाढले आहे. पण याचा अर्थ असा नाही की, माझे काही फोटो घेऊन तुम्ही काही भाग मोठे दाखवाल.तर त्यात काही अर्थ नाही.
वयाच्या 13 व्या वर्षापासून अनुभव
इलियाना डिक्रुजने पुढे एक धक्कादायक खुलासा केला आहे तो म्हणजे ती वयाच्या 13व्या वर्षापासून या सगळ्या गोष्टी ऐकत आली आहे. तिला या आधीही तिच्या वेगळ्या फिगरसाठी टार्गेट केले जायचे. पहिल्या पहिल्यांदा मला वाईट वाटायचे असे इलियाना म्हणाली. पण एलियानाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकली आहे. इलियाना डिक्रुज ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड फोटोग्राफर अँड्रयू क्नीबोसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ‘पागलपंती’ या चित्रपटात दिसली आहे. या आधी ती अक्षय कुमारसोबत रुस्तम या चित्रपटात दिसली होती.
सामान्य म्हणून स्विकारा
एका ठिकाणी मुलाखत देतान इलियाना म्हणाली की, मी एक सर्वसाधारण मुलगी आहे. तुम्ही मला स्क्रिनवर ज्या लुकमध्ये पाहता त्या लुकमध्ये येण्यासाठी मला दोन तास लागतात. त्यामुळे मी परफेक्ट आहे हे समजणे चुकीचे आहे. मी सुद्धा एक सर्वसाधारण मुलगी आहे. मला माझे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कृपा करुन असे ट्रोलिंग कोणाचेच करु नका. कारण त्यामुळे एखाद्याचे आयुष्य खराब होते. लोकांनी माझ्या या रुपाचाही स्विकार करावा.
काजोलच्या गाण्यावर डान्स करणारा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
इलियानाही होती मानसिक आजाराने ग्रस्त
इलियानाला वयाच्या 13 व्या वर्षापासून या गोष्टी ऐकाव्या लागत आहे. 13 व्या वर्षात जर तुम्हाला अशा गोष्टी ऐकायला मिळत असतील तर तुम्हाला वाईट वाटणे साहजिक आहे. त्याहीपेक्षा तुमच्या मनावर त्याचा फारच गंभीर परिणाम होत असतो.इलियानाच्या बाबतीतही असे झाले होते. ती मानसिक आजाराने ग्रस्त होती. आपल्याकडे नसलेल्या किंवा असलेल्या वेगळ्या गोष्टींमुळे होणारी कुचंबना यामुळे ती एकलकोंडी झाली होती. पण तिने यावर योग्यवेळी इलाज घेतला आणि त्यातून ती बाहेर आली.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.