ADVERTISEMENT
home / मनोरंजन
जय-वीरुची जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर तेही मराठी चित्रपटात

जय-वीरुची जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर तेही मराठी चित्रपटात

जय- वीरु म्हटले की, आपल्याला शोले चित्रपट आठवतो. दोन मित्रांचे खूप चांगले असेल की, त्यांना जय-वीरुची उपमा दिली जाते. आता हीच जोडी पडद्यावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हास्य आणि विनोदाची फोडणी देणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झोलझाल’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. आता या जोडगोळीची धम्माल मस्ती पाहण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. 

#CoronaVirusमुळे घरी बसून कंटाळलात तर हे टिकटॉक व्हिडिओ पाहा

विनोदाची फोडणी ‘झोलझाल’

जय-वीरु

ADVERTISEMENT

अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके निर्मित हा चित्रपट राज्यभरात 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. झोलझालमध्ये जय-वीरुची भूमिका अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके यांनी केली आहे. निर्माता म्हणून काम पाहणाऱ्या अमोलने या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली आहे. या दोघांनी चित्रपटाच्या शुटींग दरम्यानही भरपूर धम्माल केली आहे.त्यांच्या पोस्टरमध्येच त्यांची ही धम्मालजोडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर काहीतरी हलकं पाहायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहायला हवा.

सेटवर झाली ओळख

झोलझालचे जय वीरु

आता प्रत्येक कलाकाराची ओळख ही आधीपासूनच असते असे नाही. चित्रपट करताना त्यांच्यामध्ये ट्युनिंग होत असते. झोलझाल चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अमोल आणि ऋतुराजमधील मैत्री वाढत गेली असे त्यांनी सांगितले. स्क्रिनवर चित्रपटासाठी गंमत जंमत करता करता ते कधी खरेच जय- वीरु झाले त्यांनाच कळले नाही. या चित्रीकरणादरम्यान त्याने मजा केल्याचे POPxomarathi ला सांगितले. सेटवर त्यांनी नुसतेच काम नाही तर सहकलाकारासोबत मजाही केली. 

ADVERTISEMENT

आता हा झोल कसला?

झोलझालचे पोस्टर

चित्रपटाच्या नावावरुन काहीतरी झोल झाला एवढं तरी कळतंय. पण हा झोल नेमका कसला आहे ते अद्याप कळत नाही. पण पोस्टरवर असलेली पैशांची बॅग मात्र हा पैशांचा झोल असल्याचे दाखवत आहे. पण या धम्माल कॉमेडीचा अंदाज आता ट्रेलर आल्यानंतरच कळू शकेल. पण हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवेल अशी खात्री दिग्दर्शक मानसकुमार दासगुप्ता यांना आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी थोडं थांबावं लागेल.

तो चित्रपट नाकारल्याचा मला आजही पश्चाताप होतो – जूही चावला

ADVERTISEMENT

कोरोनामुळे होणार का काही परिणाम ?

अनेक हिंदी चित्रपटावर आणि त्यांच्या रिलीजवर कोरोनामुळे परिणाम झाले आहेत. सध्या सगळीकडे थिएटर बंद असून सगळ्या चित्रपटांच्या तारखाही बदलल्या आहेत. संपूर्ण देश 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. बाहेर पडण्यापासून सगळ्यांना मज्जाव करण्यात आला आहे. आता एप्रिल किंवा मे पर्यंत देशातील सगळी परिस्थिती निवळेल का याची वाट पाहावी लागणार आहे. कारण याचा फटका मराठी चित्रपटांनासुद्धा बसणार आहे. अनेकांनी घरात वेळ घालवण्यासाठी सध्या वेबसिरीजचा आधार घेतला आहे. यात मराठी वेबसिरीजना चांगला फायदा झाला आहे. पर्यायाने वेबसिरीज बनवणाऱ्या सगळ्यांनाच याचा अधिकाधिक फायदा होताना दिसत आहे. 

एकूणच काय सध्या देशातील परिस्थिती काहीही असली तरी झोलझालसाठी तुम्हाला थोडा वेळ नक्कीच काढायचा आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

19 Mar 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT