आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत

आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत

कंगना राणौत ही अशी अभिनेत्री आहे, जिच्या अभिनयाची तर चर्चा होतेच पण त्याहीपेक्षा अधिक चर्चा होते ती, तिने केलेल्या वक्तव्यांची. आता पुन्हा एकदा कंगनाने नव्या वक्तव्याने यामध्ये भर घातली आहे. बॉलीवूडची ‘मर्दानी’ कंगनाने आता संपूर्ण बॉलीवूडविरुद्धच मोर्चा उघडला आहे की काय अशी सध्या परिस्थिती आहे. ऋतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन आणि करण जोहर या सर्वांविरुद्ध तिने अगदी खुलेआम दुश्मनी जाहीर केली. हे कमी म्हणून आता तिने आपला मोर्चा वळवला आहे तो आलिया भटकडे. कंगनाचा चित्रपट ‘मणिकर्णिका’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळवत आहे. पण या चित्रपटाला इतर अभिनेत्यांकडून म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळेच कंगना सध्या प्रचंड भडकलेली आहे.


kangana
कंगनाला मिळाला नाही बॉलीवूडचा पाठिंबा


कंगनाच्या म्हणण्यानुसार, कंगनाचा मणिकर्णिका हा चित्रपट महिला सशक्तीकरण दर्शवतो. त्यामुळे बॉलीवूडच्या महिलांनी तिच्या या चित्रपटाला पाठिंबा दर्शवायला हवा होता. पण असं काहीही झालं नाही.यासंदर्भात मागच्या आठवड्यात कंगनाने आलिया भटवर नाराज असल्याचंही म्हटलं होतं. यावर आलिया भट म्हणाली होती की, कंगना जर तिच्यावर रागावली असेल तर ती नक्की तिची माफी मागेल. पण असं असूनही कंगनाने आता आता आलियाला करण जोहरच्या हातातील बाहुली असं म्हटलं आहे.


18580991 1123841891054849 4412363337908617216 n
कंगना राणौतने आलिया भटवर पुन्हा एकदा नेपोटीझमचा शिक्का मारला


कंगनाने आलियावर आपला राग व्यक्त करत म्हटले की, आलिया हा चित्रपट बघण्याची हिंमत मी  करू शकते आणि तिची तारीफ करू शकते तर आलिया का नाही माझा चित्रपट बघत? ती कशासाठी घाबरत आहे?  मणिकर्णिका हा चित्रपट महिला सशक्तीकरणावर असून देशप्रेमावर हा चित्रपट आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटाला पाठिंबा मिळायला हवा होता असं कंगनाचं मत आहे. कंगनाने पुढे असंही म्हटलं की, आलियाला स्वतःचं मत नसेल तर ती करण जोहरच्या हातातील बाहुली आहे. असं असताना ती कशी काय यशस्वी आहे? आलिया फक्त पैसे कमावत असून जर कोणत्याही गोष्टीवर स्वतःचा आवाज उठवत नसेल तर ती नक्कीच यशस्वी नाही. आलियाला लवकरच आपली जबाबदारी कळेल आणि या नेपोटिझमच्या वर्तुळातून बाहेर येऊन ती विचार करू शकेल असंही कंगनाने यावेळी म्हटलं आहे.


kangna ranaut
कंगनाने आलियावर साधला निशाणा


यापूर्वी कंगनाने आलिया आणि आमिरसारख्या अभिनेत्यांची नावं घेऊन म्हटलं की, बॉलीवूडमधील कलाकार हे केवळ एकमेकांना कामापुरतेच विचारतात. आलियावर निशाणा साधत कंगनाने म्हटलं की, जेव्हा आपल्या चित्रपटाचं स्क्रिनिंग असतं तेव्हा कोणताही कलाकार येत नाही पण बाकी स्क्रिनिंगच्या वेळी आपल्याला मात्र अगदी बेशरमीने लोक आमंत्रण देतात. कंगनाने सांगितलं की, आलियाने तिला राझीचं ट्रेलर पाठवलं होतं आणि चित्रपट बघण्यासाठीदेखील सांगितलं होतं. चित्रपट बघितल्यानंतर आलिया आणि मेघना गुलजार दोघींनाही कंगनाने फोन केला होता असंही तिने सांगितलं. पण जेव्हा मणिकर्णिकाची वेळ आली तेव्हा तिला कोणताही प्रतिसाद कोणाहीकडून मिळाला नाही. आपल्याविरुद्ध बॉलीवूडमध्ये बरेच कलाकार उभे ठाकले असल्याचंही कंगनाला वाटत आहे. या सगळ्या वक्तव्यावर अजूनही आलियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आलिया आतापर्यंत कोणत्याही वादात बोलल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात नाही. शिवाय आलिया जरी भट कँपमधून आली असली तरीही तिने आतापर्यंत आपल्या अभिनयानेच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे या सगळ्यावर आता आलियाची प्रतिक्रिया काय असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.


फोटो सौजन्य - Instgram 


हेदेखील वाचा - 


देवेन भोजानी ‘भाकरवडी’तून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला


करणसोबत कॉफी प्यायला येणार आहेत नवे 'स्टुडंट ऑफ द इयर '


सुबोध भावे–भार्गवी चिरमुले यांचे ‘काही क्षण प्रेमाचे’