ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सुर्यवंशीमध्ये कतरिना कैफची वर्णी

सुर्यवंशीमध्ये कतरिना कैफची वर्णी

रोहीत शेट्टीच्या ब्लॉकब्लस्टर ‘सिम्बा’ या चित्रपटातच त्याच्या आगामी चित्रपट ‘सुर्यवंशी’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’च्या तुफान यशानंतर आता रोहीत शेट्टीचा ‘सुर्यवंशी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या  चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय सोबत कतरिना कैफची वर्णी लागली आहे. नुकताच अक्षयने त्याच्या इंस्टा अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, रोहीत शेट्टी, करन जोहर आणि कररिना कैफ दिसत आहेत. शिवाय यासोबत अक्षयने “कतरिना तुझे आमच्या पोलिस विश्वात स्वागत आहे. ही  आमची सुर्यवंशी गर्ल” अशा पद्धतीने तिचे स्वागत केले आहे. यापूर्वी अक्षय आणि कतरिना ही जोडी नमस्ते लंडन, वेलकम, सिंग इज किंग, दे दना दन, तीस मार खॉं, हमको दिवाना कर गये अशा अनेक चित्रपटातून एकत्र झळकली आहे. आता पुन्हा प्रेक्षकांना ही हिट जोडी सुर्यवंशीमधून पाहता येणार आहे.

2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर सुर्यवंशीचा धमाका

 काही दिवसांपूर्वी सुर्यवंशी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. ‘ए बुलेट फॉर बुलेट’ असं या चित्रपटाचं टॅगलाईन आहे. सुर्यवंशी चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि रोहीत शेट्टी करत आहेत. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिंघम आणि सिम्बामधील पोलिसाच्या भुमिकेतील अजय देवगन आणि रणवीर सिंगला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आता सुर्यवंशीमध्ये अक्षयची भूमिका नेमकी कशी असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रोहित शेट्टीचा अंदाज प्रत्येक चित्रपटामध्ये हटके असतो.  शिवाय अक्षयकुमार पहिल्यांदाच रोहितबरोबर सुर्यवंशीमध्ये काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रंचड उत्सुकता लागली आहे. सिम्बामधील ‘सूर्यवंशी’ची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. रिलीज झालेल्या सुर्यवंशीच्या पोेस्टरमुळे आणि त्यात कतरिनाची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आता हा अॅक्शन कॉप ड्रामा पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

अक्षय आणि कतरिना हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘केसरी’ चित्रपटाला चांगली लोकप्रियता मिळाली. लवकरच अक्षय करिनासोबत ‘गुडन्यूज’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाममध्ये अक्षय आणि करिनासोबतच दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणीदेखील दिसणार आहेत. मे मध्ये अक्षयचा ‘हाऊसफुल 4 हा चित्रपट येत आहे. शिवाय ‘मिशन मंगल’ देखील ऑगस्ट – सप्टेंबरदरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या वर्षअखेरीस तो हेराफेरी 3 च्या शूटिंगला सुरूवात करणार अशी चर्चा आहे. या  चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने चाहते खूपच खूश आहेत. कतरिना कैफ सध्या भारत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर कतरिना सुर्यवंशीच्या शूटिंगसाठी वेळ काढू शकणार आहे. वास्तविक मागील काही वर्षांपासून अक्षय आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चांमुळे ट्विंकलने अक्षयला कतरिनासोबत काम करण्यास मनाई केली होती. मात्र आता अक्षयने ट्विकंल खन्ना चा राग शांत केला असावा. म्हणूनच तिने अक्षयला पुन्हा कतरिनासोबत काम करण्यासाठी परवानगी दिली असावी. कारण काहिही असलं तरी जवळजवळ नऊ वर्षांनी ‘अक्षय आणि कॅट’पुन्हा एकत्र येणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी अक्षय-कतरिनाची जोडी आणि रोहीत शेट्टीचे अफलातून दिग्दर्शन यातून ‘सुर्यवंशी’ ब्लॉकब्लस्टर नक्कीच ठरणार.

अंगुरी भाभीला राजकीय पक्षांकडून ऑफर्स, काय करणार अंगुरी भाभी

ADVERTISEMENT

म्हणून अक्षय कुमार आजही आहे ‘खिलाडी’

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

22 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT