लॉरेनच्या Topless फोटोशूटची सगळीकडे होतेय चर्चा

लॉरेनच्या Topless फोटोशूटची सगळीकडे होतेय चर्चा

उत्तम डान्ससाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री लॉरेन गॉटलिब सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहे. तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आणि बघता बघता हे फोटो इतके व्हायरल झाले की, लॉरेन माहीत नसणाऱ्यांनाही लॉरेन कोण? याची उत्सुकता निर्माण झाली. आता हे फोटो खास का आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तिने शेअर केलेले तिचे फोटो हे टॉपलेस आहेत. आता कळलं या फोटोची इतकी चर्चा का होत आहे ती.

लॉरेनचा Topless अंदाज

बुधवारी लॉरेनने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ती topless दिसत असून तिने सिल्व्हर सिक्वेन्सची बेलबॉटम पँट घातली आहेत. फिटनेसला नेहमीच महत्व देणाऱ्या लॉरेनचा फिट अंदाज यामध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय असा फोटो शेअर करताना लोकांनी कोणताही वाईट अर्थ काढू नये म्हणून तिने तिच्या फोटोखाली फनी कॅप्शन लिहिलेल्या आहेत. तिने म्हटले आहे की, तुम्ही माझा फोटो नीट निरखून पाहा. मी हिल्स घातले आहेत.

लॉरेनचे फोटो नेहमीच असतात खास

Instagram

लॉरेनची प्रोफाईल पाहिलेत तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल ती म्हणजे लॉरेनचे फोटो हे नेहमीच खास असतात. फिटनेसला महत्व देणारी लॉरेन तिच्या हॉट फिगर आणि सेक्सी अंदाजात नेहमी फोटोशूट करते त्यामुळेच तिच्या फोटोला सर्वाधिक पसंती मिळते.

डान्समधून कमावले नाव

लॉरेन मूळ अमेरिकेची असून so do you think you can dance या रिअॅलिटी शोमधून ती पुढे आली आहे. तिने हॉलीवूडमधील अनेक शोमधून काम केले आहे. हॅनामोंटाना, ब्रींग इट ऑन यामधून तिने काम केलं आहे. तिला ABCD या चित्रपटातून लीड रोल करण्याची संधी मिळाली त्यानंतर तिने झलक दिख ला जा चे अँकरींगही केले आहे. तिने आतापर्यंत केलेल्या कामामुळे अनेकांनी तिची तारीफही केली. त्यामुळे तिचे जगभरात चाहते आहेत.

छोट्या पडद्यावरच्या या अभिनेत्री, बॉलीवूडपेक्षा अभिनेत्रींपेक्षा वरचढ 

लॉरेन झलक दिख ला जा या रिअॅलिटी शोची स्पर्धक होती. ती या स्पर्धेमध्ये पुनीत सोबत सहभागी झाली होती. त्यांची डान्स जोडी देखील फारच प्रसिद्ध झाली होती. चांगले दिसण्यासोबतच त्यांचा डान्स हा परफेक्ट होता. त्यामुळेच त्यानंतर पुनीत आणि लॉरेन यांचे नाव जोडले गेले.  या शिवाय म्युझिक कंपोझर विशाल धदलानीसोबतही तिचे नाव जोडले गेले. पण तिने याचा खुलासा करत काहीच नसल्याचे म्हटले आणि नंतर तिच्या इन्स्टाग्राम पेजवर दिसला तो बेंजामिन.. म्हणजे लॉरेनचा खरा बॉयफ्रेंड. त्यांचा तो फोटो पाहून love is in air अशीच प्रतिक्रिया आली. ती लवकरच लग्न करणार असे  देखील कळाले. सध्या तिच्या लग्नाबद्दल काही माहीत नाही. पण तिचे हॉट फोटो मात्र खूप गाजतायत हे नक्की!

सत्ते पे सत्ता' या चित्रपटात ऋतिकसोबत लागली या अभिनेत्रीची वर्णी


खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.