ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
ग्रामीण महिलांसाठी या कंपनीने उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

ग्रामीण महिलांसाठी या कंपनीने उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

आज भारतातील महिलांचा प्रत्येक क्षेत्रात वावर होताना दिसत आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रात आत्तापर्यंत महिला नव्हत्या त्या क्षेत्रातही आता महिला पुढाकार घेऊन सहभागी होत आहेत. मुख्य म्हणजे त्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शनही मिळत आहे. असाच एक उपक्रम सुरू केला आहे एलअँडटी या कंपनीने.

एलअँडटीच्या वडोदरा हेव्ही इंजिनीअरिंग वर्क्सने (व्हीएचईडब्लू) ग्रामीण विद्यार्थिनींना वेल्डिंग तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. आजवर पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रांमध्ये तरुण विद्यार्थीनींची पहिली बॅच कौशल्यविकासाची वाटचाल सुरू करणार आहे.

महिलांना #Insurance ची गरज का आहे

ADVERTISEMENT

समाजातील आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गांतील विद्यार्थ्यिनींच्या तांत्रिक कौशल्यांमध्ये रूची आणि सहभाग वाढवण्याच्या हेतूने, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2020 या निमित्ताने विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यानिमित्ताने, एलअँडटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि हेव्ही इंजिनीअरिंगचे प्रमुख वाय. एस. त्रिवेदी यांनी सांगितले की,  “एलअँडटी सर्वोत्तम वेल्डिंग तंत्रज्ञानासाठी, तसंच अत्यंत क्लिष्ट हेव्ही मशीनरी, प्रोसेस प्लांट इक्विपमेंट व न्यूक्लिअर सिस्टीम यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय महिला दिन 2020 च्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने, हा तांत्रिक अभ्यासक्रम तरुणींना समान संधी उपलब्ध करणार आहे.”

“वेल्डिंग हा महिलांचा पारंपरिक व्यवसाय नसला, तरी नऊ तरुणींचा समावेश असणाऱ्या पहिल्या बॅचचे या अत्यंत स्पेशलाइज्ड आणि चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या औद्योगिक व्यवसायामध्ये काम करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पहिल्या बॅचच्या प्रगतीच्या अनुषंगाने आम्ही भविष्यात हा कार्यक्रम आणखी विस्तारणार आहोत,” असे त्रिवेदी यांनी सांगितले.

श्रॉफ फाउंडेशन ट्रस्ट (एसएफटी) चालवत असलेले विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल अँड आंत्रप्रिन्युअल कॉम्पिटन्स (व्हीआयव्हीईसी) हे या सीएसआर उपक्रमामध्ये एनजीओ पार्टनर आहे.

उद्योगातील प्रत्यक्षातील परिस्थिती विचारात घेऊन या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे आणि व्हीएचईडब्लू प्रकल्पातील वरिष्ठ व्यवस्थापन यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. वेल्डिंगबद्दलची कौशल्यं वाढवण्याव्यतिरिक्त, या विद्यार्थिनींना कॉम्प्युटर शिकणं, इंग्रजी संभाषण, योग, इ. अशा 32 मोड्युलद्वारे वैयक्तिक विकास साधण्यासाठी सज्ज केलं जाणार आहे.

ADVERTISEMENT

प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर, महिलांना एलअँडटी व एसएफटी यांच्याकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कंपनीच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण केल्यास या विद्यार्थिनींना एलअँडटीच्या व्हीएचईडब्लूमधील वर्कशॉपमध्ये आणखी प्रशिक्षण घेण्याची संधी चाचपण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

व्हीएचईडब्लू हा उपकरणं व सिस्टीम यांची निर्मिती करणारा विशेष प्रकल्प असून त्यामध्ये परदेशी धातू व प्रगत कम्पोझिट साहित्य यांचा समावेश आहे. व्हीएचईडब्लू प्रकल्प प्रक्रिया प्रकल्प, आण्विक, संरक्षण व एअरोस्पेस उद्योग यांना सेवा देतो. अत्यंत कुशल मनुष्यबळ आणि नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या पद्धती व प्रक्रिया यांचा अवलंब, ही या प्रकल्पाची क्षमता आहे. व्हीएचईडब्लूमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या क्लिष्ट व प्रगत वेल्डिंग प्रक्रिया केल्या जातात, जसे सबमर्ज्ड आर्क, गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग (जीटीएडब्लू), गॅस मेटल आर्क वेल्डिंग (जीएमएडब्लू), ऑटोमॅटिक ट्युब-यू-ट्युब शीट वेल्डिंग, ऑटोमॅटिक नोझल वेल्डिंग व रेझिस्टन्स स्पॉट वेल्डिंग. अमेरिकेला न्यूक्लिअर सिस्टीम निर्यात करणारा व्हीएचईडब्लू हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी

एलअँडटी कंपनीची पार्श्वभूमी:

ADVERTISEMENT

लार्सन अँड टुब्रो ही तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांत कार्यरत असलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची उलाढाल 21 अब्ज डॉलर आहे. ही कंपनी जगभरातील तब्बल 30 देशांत व्यवसाय करते. सक्षम, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि सर्वोच्च गुणवत्ता साध्य करण्यासाठी प्रयत्न यामुळे एलअँडटीला गेली आठ दशकं प्रमुख व्यवसाय क्षेत्रांत नेतृत्व मिळवणं आणि टिकवणं शक्य झालं आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

08 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT