अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी

अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी

हिवाळ्यात वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम होतो तुमच्या नाजूक ओठांवर... कारण कोरड्या आणि थंड हवेमुळे तुमचे फोट फुटतात आणि त्वचा कोरडी होते. कधी कधी तर फुटलेल्या ओठांमधून रक्तदेखील येऊ लागतं. बोलताना, खाताना तुमचं लक्ष सतत फुटलेल्या ओठांकडे जातं आणि जीभ आपोआप ओठांवरून फिरू लागते. याचा परिणाम आणखीनच भयानक होतो कारण त्यामुळे तुमची समस्या अधिकच त्रासदायक होते. यासाठीच तुम्हाला  हिवाळ्यात एका चांगल्या लिपबामची गरज असते. ज्यामुळे तुमचे ओठ सतत मऊ आणि मुलायम राहतील. शिवाय तुमच्या ओठांचा गुलाबी रंग कायम टिकून राहील. बऱ्याचदा एखाद्या सौंदर्यसमस्येवर उपचार करण्यासाठी सेलिब्रेटीजचे ब्युटी रूटिन फॉलो केलं जातं. काही दिवसांपूर्वीच ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्करने तिचं लिप केअर रूटिन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. दीपिकाने तिच्या युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने चक्क होममेड लिप बाम घरी कसं तयार करायचं याची सोपी पद्धत शिकवली आहे. 

दीपिका कक्करप्रमाणे असं घरीच तयार करा लिप बाम-

दीपिकाने या व्हिडिओमध्ये तीन प्रकारचे लिप बाम दाखवले आहेत. जे तुमच्या सर्व प्रकारच्या ओठांच्या समस्या दूर करण्यास नक्कीच फायदेशीर ठरतील.

होममेड बीटरूट लिप बाम -

साहित्य -

 • एक चमचा बी वॅक्स
 • एक चमचा शीया बटर
 • एक चमचा नारळाचे तेल
 • अर्धा चमचा एरंडेल तेल
 • एक चमचा बीटरूट पावडर
 • अर्धा चमचा आयसिंग शिमर


लिप बाम बनवण्याची पद्धत -

 • बी वॅक्स आणि शिया बटर वितळवून घ्या
 • त्यामध्ये नारळाचे तेल आणि एरंडेल तेल मिसळा
 • मिश्रण एकजीव करा आणि त्यात बीटरूट म्हणजेच बीटची कोरडी पावडर टाका
 • तुम्हाला आवडत असेल तर ओठांना चमकदार करण्यासाठी  त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाची आयसिंग शिमर पावडर टाकू शकता
 • आयसिंग शिमर केकसाठी वापरतात त्यामुळे तुम्हाला ती कोणत्याही केकचे साहित्य मिळणाऱ्या दुकानात मिळेल
 • सर्व साहित्य एकत्र करा आणि हवा बंद डबीत भरून ठेवा. थंड झाल्यावर तुम्ही या मिश्रणाचा वापर एखाद्या लिप बामप्रमाणे करू शकता

होममेड स्टॉबेरी लिप बाम -

साहित्य -

 • एक चमचा बी वॅक्स
 • एक चमचा शिया बटर
 • अर्धा चमचा एरंडेल तेल
 • एक चमचा नारळाचे तेल
 • एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल
 • स्टॉबेरी फूड कलर
 • अर्धा चमचा आयसिंग शिमर 

 होममेड लिप बाम बनवण्याची पद्धत -

 • बी वॅक्स आणि शिआ बटर गरम करून वितळवून घ्या
 • त्यात नारळाचे तेल आणि एरंडेल तेल मिसळा
 • मिश्रणात व्हिटॅमिन ईची कॅप्सुल फोडून टाका आणि मिश्रण एकजीव करा
 • मिश्रणात आयसिंग शिमर पावडर आणि स्टॉबेरी फूड कलर मिसळा
 • मिश्रण एकजीव करा आणि एका छोट्या डबीत भरून  ठेवा

होममेड वॅनिला लिप बाम -

साहित्य -

 • एक चमचा पेट्रोलिअम जेली
 • एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल
 • एक चमचा एरंडेल तेल
 • वॅनिला फूड इसेंस
 • आयसिंग शिमर

होममेड लिप बाम बनवण्याची पद्धत -

 • मायक्रोवेव्हमध्ये पेट्रोलिअम जेली गरम करून घ्या
 • वितळलेल्या जेलीत व्हिटॅमिन ई कॅप्सुल फोडून टाका
 • एरंडेल तेल, वॅनिला इसेंस आणि आयसिंग शिमर मिसळा आणि  मिश्रण एकजीव करा
 • मिश्रण छोट्या डबीत भरून ठेवा

अभिनेत्री दीपिका कक्करने शेअर केलेले हे लिपबाम तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही बनवले का आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.