मराठी इंडस्ट्रीमध्ये वादग्रस्त पोस्टमुळे कायम चर्चेत असलेली केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता तिच्या वादासाठी पुन्हा एकदा तिची पोस्टच कारणीभूत आहे. यावेळी तिने शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच तिला यावेळी दुप्पट ट्रोल केले आहे. ‘चितळे बाई आधी स्वत:ची पितळे सांभाळा, नंतर तुमची अक्कल पाजळा’ असा टोमणा तिला या पोस्टनंतर देण्यात आला आहे. आता केतकी चितळेने नेमकं काय केलं ते देखील जाणून घेऊया.
मराठमोळे आशिष पाटील आणि रुतुजाच्या लावणीवर रेमो फिदा, चित्रपटाची दिली ऑफर
तर सोशल मीडियावर केतकीने एक फोटो शेअर केला.’आरोप आणि सत्य’ अशी ही पोस्ट होती. या पोस्टमध्ये तिच्या हातात एक सिगरेट दिसत आहे.ती त्या सिगरेटचा झुरका घेत आहे. तिचा हा फोटो एकाने कमेंटमध्ये टाकत ही मुलगी संस्कार शिकवतेय अशी कमेंट लिहिली आहे. हा फोटो तिने आरोप या कॉलममध्ये टाकला. तर लोकांपर्यंत खरं जावं म्हणून तिने हातात असलेल्या सिगरेटचा अर्थ ही सिगरेट साखरेची असून हे चॉकलेट लहानपणी फारच प्रसिद्ध होतं. त्यामुळे तिने तिच्या हातातील सिगरेट नेमकी काय आहे याचा गुगलसर्च टाकला आहे.पण ही पोस्ट अगदी आताची आहे. पण त्याआधी तिला अनेकांनी ट्रोल करत काही आक्षेपार्ह फोटो टाकले होते. त्यामध्ये तिला तिच्या संस्कारावरुन ट्रोल करण्यात आले. त्याला उत्तर म्हणून तिने ही पोस्ट टाकली होती. हे कळून येते.
Posted by Ketaki Chitale on Tuesday, July 14, 2020
Posted by Ketaki Chitale on Tuesday, July 14, 2020
Posted by Ketaki Chitale on Tuesday, July 14, 2020
आता ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यामध्ये अनेकांना आक्षेपार्ह असे खरंच काही वाटणार नाही. पण वादाचे मूळ कारण हे शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख आहे. त्या एकेरी उल्लेखामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. तिच्या मजकूरापेक्षाही महाराजांचा अपमान ती करु शकत नाही. असे म्हणून तिचा सोशल मीडियावर समाचार घेण्यात आला. त्यानंतर तिला शिवसेनेच्या लोकांकडूनही धमकावण्यात आले. .याचा स्क्रिनशॉट तिने शेअर केला आहे.
सुपरस्टार असूनही सलमान खानचे 10 चित्रपट झाले होते सुपर डुपर फ्लॉप
Posted by Ketaki Chitale on Tuesday, July 14, 2020
केतकी चितळे काही काळापासून कायमच चर्चेत राहात आहे. केतळीला एका मालिकेतून काढल्यानंतर तिने त्याबद्दल एक व्हिडिओ केला होता. तिला एपिलेप्सीचा त्रास असून हा आजार मज्जातंतूशी निगडीत आजार आहे. या आजारामध्ये काही त्रास होतात.त्याचे कथन तिने या आधी केले होते. पण त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक ड्रामा करण्याचे सत्र सुरु केले आहे. तिने अनेक गोष्टीवर व्हिडिओ करुन विधान करुन सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ती यशस्वीही झाली आहे. पण प्रसिद्धीपेक्षाही ती ट्रोल होण्यात पुढे असते. आता तिने मुद्दाम शिवाजी हा एकेरी उल्लेख करत सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे पुन्हा एकदा वेधण्यासाठी हे नवे काहीतरी केले आहे असे साधारणपणे दिसत आहे.
केतकी चितळे हे नाव जर अनेकांच्या लक्षात असेल तर ते बालिका वधू या मालिकेमुळे. बालिका वधू मालिकेतील मोठ्या आनंदीचा शोध सुरु होता. अनेक चेहरे,ऑडिशन्स यासाठी झाल्या होत्या. त्यावेळी निवडलेल्या काही चेहऱ्यांमध्ये केतकी चितळे होती. पण तिचे सिलेक्शन या रोलसाठी झाले नाही. मराठमोळा चेहरा हिंदी मालिकेसाठी निवडला जातो. म्हणून तिला प्रसिद्धी मिळाली. तिला काही मालिकाही मिळाल्या. मराठीमध्ये कामाचा विचार केला तर तिने ‘सास बिना ससुराल’ ‘आंबट गोड’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ ‘लक्ष्मी सदैव मंगलम’, ‘मीरा’ आणि भो भो (2016) नावाचा चित्रपट केला आहे आणि अनेक लहानमोठ्या भूमिका केल्या आहेत. पण या कामांपेक्षा ती जास्त तिच्या वादग्रस्त पोस्टमुळेच प्रसिद्ध झाली आहे
आता केतकी चितळे हे मुद्दाम करते की तिने केलेल्या सगळ्या गोष्टीतून वादच काढला जातो हा नवा शोधाचा विषय आहे.