ग्लॅमरस आणि मसालेदार त्रिकोणाचा 'मीडियम स्पाईसी'

 ग्लॅमरस आणि मसालेदार त्रिकोणाचा 'मीडियम स्पाईसी'

सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांचा हा चित्तवेधक स्टाईलिश आणि ग्लॅमरस अंदाज आहे. त्यांच्या ‘मीडियम स्पाईसी’ या आगामी सिनेमासाठी नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधला. डोळ्यांना व्हिजुअल ट्रिट देणा-या या फोटोमुळे आता ‘मीडियम स्पाईसी’ सिनेमाची उत्सुकता अजून वाढलीयं. 

या चित्ताकर्षक फोटोसोबतच चित्रपटाची तारीख घोषित करण्याविषयी निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “सई, ललित आणि पर्ण यांच्यातली केमिस्ट्री सिनेमाच्या आणि फोटोशूटच्या चित्रीकरणावेळीही आम्हांला जाणवली आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची हिचं झलक या फोटोतही दिसतेय. एखादा पदार्थ चविष्ट व्हायला जशी पदार्थांची योग्य प्रमाणात भट्टी जमणे गरजेचं असतं, तशीच या तीनही कलाकारांची भट्टी जमलेली तुम्हांला सिनेमा पाहताना जाणवेल. आपापल्या भूमिका स्वत:मध्ये मुरण्यासाठी सई, ललित आणि पर्णच्या मेहनतीला मोहितच्या दृष्टिकोनाचीही योग्य जोड मिळाली आहे. या सगळ्यांची एकत्रित मेजवानीचं आता 5 जूनला प्रेक्षकांना मिळणार आहे.” या लक्षवेधी फोटोसोबतच ‘मीडियम स्पाईसी’ सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केलीय. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाईसी’ 5 जून 2020 ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतात की, “सई, ललित आणि पर्णमुळे ‘मीडियम स्पाईसी’ सिनेमाची लज्जत काही औरच झाली आहे. तिघांचेही व्यक्तिमत्व, आवडी-निवडी, काम करण्याच्या पध्दती आणि उर्जा वेगवेगळ्या आहेत. पण एक रूचकर सिनेमा बनवायला, हाच वेगळेपणा सिनेमाचा समतोल राखण्यात आणि नाट्य खुलवण्यासाठी खूप परिणामकारकपणे उपयोगी पडलाय.”

सूत्रांनुसार, सध्या हा सिनेमा पोस्ट प्रॉडक्शनमध्ये असल्याने चित्रपट संपूर्णपणे तयार व्हायला अजून काही काळ लागणार आहे आणि त्यानंतर उन्हाळ्यांच्या सुट्ट्या संपल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याअगोदर रिलॅक्स मूडमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा एन्जॉय करता यावा, म्हणून सिनेमाच्या टिमने एकत्रितपणे रिलीज डेट 5 जून ठरवली आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाईसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर यांच्याशिवाय सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील.

#POPxoLucky2020 मध्ये आम्ही देत आहोत प्रत्येक दिवशी एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.