महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. मागच्या वर्षीच नागराज बिग बी सोबत झुंड चित्रपट करणार असल्याचं जाहिर करण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. निर्मात्यांनी नुकतंच कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केलं आहे. यावर्षी हा चित्रपट 20 सप्टेबरला प्रदर्शित होत आहे. अनेक अडचणींवर मात करत झुंड आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नागराजने आतापर्यंत मराठीतून फॅन्ड्री, सैराट, नाळ असे लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. झुंड हा नागराज दिग्दर्शित पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. शिवाय या चित्रपटात महानायकासोबतच त्याची लकी जोडी ‘आर्शी-परश्या’ अर्थात रिंकू राजगूरू आणि आकाश ठोसर देखील असणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारं आहे.
Release date finalised… #Jhund, starring Amitabh Bachchan and directed by #Sairat director Nagraj Manjule, to release on 20 Sept 2019… Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Raaj Hiremath, Savita Raj Hiremath and Nagraj Manjule. pic.twitter.com/iPMaIyT8Z9
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2019
अमिताभ बच्चन झाले होते भावनिक
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये झुंड चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. या चित्रपटाचं शूटिंग नागपूर मध्ये करण्यात आलं. खूद्द बिग-बी नेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत शेअर केलं होतं “झुंडच्या शूटिंगसाठी नागपूरात आहे.मराठी ब्लॉक बस्टर सैराट फेम नागराजचा पहिला हिंदी सिनेमा..आकर्षणाचा केंद्रबिंदू…भौगोलिकदृष्टा नागपूर भारताचा केंद्रबिंदू…दोन केंद्राचे मिलन.” असं म्हणत बिग बी ने नागराजसोबतचा एक फोटो देखील शेअर केला होता.या पोस्टमध्ये महानायकाच्या आगमनामुळे या अख्खं नागपूर ‘सैराट’मय झालेलं पाहायला मिळालं होतं. शिवाय त्यानंतर चित्रीकरणा दरम्यान ‘बिग बीं’नी त्यांच्या गावातील आठवणींना उजाळा देणारी एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. नागपूरमधील झुंडच्या चित्रीकरणा दरम्यान अभिताभ बच्चन यांनी बैलगाडी आणि बसमधून प्रवास केला होता.
झुंड चित्रपट फुलबॉल खेळावर आधारित
झुंड चित्रपट प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. झोपडपट्टीत राहण्या-या गरीब मुलांनी खेळातून करियर घडावं यासाठी विजय बारसे यांनी प्रयत्न केले होते. समाजाकडून वाईट वागणूक मिळाल्याने वाममार्गाला गेलेल्या काही मुलांना विजय बारसे यांनी फुटबॉलपटू बनवलं होतं. त्यातील काही मुलांनी परदेशातील होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती. झोपडपट्टीत फुटबॉल खेळ रुजवण्याचा बारसे यांचा संघर्ष या सिनेमामधून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
शीतल महाजनचं इजिप्तमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’
‘Wedding चा शिनेमा’ चं टीझर प्रदर्शित