ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
होळीची संध्याकाळ घालवायची कशी – नवे फंडे

होळीची संध्याकाळ घालवायची कशी – नवे फंडे

रंग नैसर्गिक तऱ्हेने आपल्या भावना आणि मूड यांच्याशी आपल्याला जोडतो. रंगांनी आयुष्य भारलेलं आहे. नुसतं बोलतानाही किती वेळा आपण आयुष्यात रंग भरूया असंही म्हणतो. त्यामुळे होळीचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची उधळण घेऊन येत असतो आणि आपल्याला हा सण जवळचा वाटतो. होळी सेलिब्रेशन म्हणजे जगण्याची शिकवण, आनंदी राहण्याची आणि आपलं एकमेकांबरोबर नातं चांगलं राहण्याचा सण. दिवसभर होळीच्या शुभेच्छा देऊन आणि रंगांनी रंगून मजा केलेली असते. पण संध्याकाळी आपण काहीच खास करत नाही. पण तुम्हाला हवं तर तुम्ही तुमची संध्याकाळ मजेत घालवू शकता. आपलं नातं मजबूत करण्यासाठी कपल्स अशा तऱ्हेने आपली होळी संध्याकाळ प्लॅन करू शकतात.

Holi Dhamal

लाँग ड्राईव्ह
तुम्हाला रोज अर्थातच तुमच्या घरकाम आणि ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नाही. बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या पार्टनरबरोबर लाँग ड्राईव्हला जायची इच्छा असते पण वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला अशा वेळी ही इच्छा नक्कीच पूर्ण करता येईल. होळीच्या संध्याकाळचा असा उपयोग नक्की करून घ्या. यावेळी तर होळी अर्थात रंगपंचमी विकेंडला लागून येत आहे. मध्ये एक दिवस सुट्टी घेऊन तुम्ही एक – दोन दिवसाची आऊटडोअर ट्रिपदेखील करू शकता. किंवा हीच वेळ आहे तुम्ही शॉर्ट हनीमूनदेखील प्लॅन करू शकता. ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये कामामुळे आलेला ताण निघून जाईल.

घरी करू शकता पार्टी

ADVERTISEMENT

Holi Party
ही होळीची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मित्रांच्या नावेही करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना आपल्या घरी संध्याकाळी बोलावून पार्टी करू शकता. त्यामुळे तुमच्या मित्रांना तुमच्या बायकोला अथवा नवऱ्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करता येईल. तसंच तुम्ही एकमेकांच्या मित्रांद्वारे एकमेकांनाही जास्त समजून घेऊ शकता. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ही संध्याकाळ एकत्र घालवून कामाचा ताण कमी करू शकता. शिवाय बरेच दिवस एकमेकांना भेटला नसाल तर पुन्हा एकदा भेटून मजा करू शकता.

कुटुंबाबरोबर घालवा वेळ
दिवसभर जर तुम्ही कल्ला केला असेल तर संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर एकत्र जेवणाचा मस्त बेत करू शकता. तसं नसेल तर तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे या संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जाण्याचा प्लॅनही करू शकता. होळीचा सण आहे त्यामुळे घर कसं भरल्यासारखं वाटतं. नातेवाईकांकडे जाताना अर्थातच त्यांच्यासाठी खास गिफ्ट घेऊन जा. त्यांनाही तुम्हाला भेटून बरं वाटेल. संध्याकाळ एकत्र घालवा आणि मजा करा.

अबीर गुलाल पार्टी

holi
होळीच्या दिवशी तुम्हाला जर इतर रंग आवडत नसतील तर संध्याकाळी तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी अबीर गुलाल पार्टी ठेऊ शकता. पण अबीरचा प्रयोग मर्यादेत करायला हवा हे लक्षात ठेवा. या पार्टीमध्ये छान आवडणारे खास होळी स्पेशल पदार्थ आणि गाणी या दोन्ही गोष्टी ठेवा. होळीमध्ये ही पार्टी थोडी वेगळीदेखील होईल. कारण दरवर्षी तेच तेच प्रयोग करून कंटाळा येतो.

ADVERTISEMENT

वाचा – रंगपंचमीची संपूर्ण माहिती

मूव्ही डेट
तुम्ही खूपच दमला असाल. पण तरीही तुम्हाला काहीतरी वेगळं करावं वाटत असेल आणि आपल्या पार्टनरबरोबर वेळ घालवावा वाटत असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी संध्याकाळी मूव्ही डेट प्लॅन करू शकता. मूव्ही बघता बघता त्याबरोबर पॉपकॉर्न खा ज्यामुळे तुमचा मूड अजूनच फ्रेश होईल. त्यानंतर तुम्हाला आवडत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आवडत असलेले पदार्थ मागवून तुमच्या पार्टनरबरोबर संध्याकाळ एन्जॉय करा.

दुसऱ्यांची मदत
तुमच्या दोघांचीही नोकरी चांगली आहे. तुम्ही जर तुमचं आयुष्य खूपच चांगल्या तऱ्हेने जगत असाल. पण तुमच्याइतके नशीबवान लोकं जगामध्ये नाहीत. अशावेळी सणासुदीला तुम्ही त्यांना मदत करू शकता. होळीच्या संध्याकाळी तुम्ही ओल्ड एज होम अथवा अनाथालयामध्ये जाऊन तिथल्या लोकांना गिफ्ट्स अथवा त्यांच्यासाठी काही खास खायला घेऊन जा. होळीच्या दिवशी काहीतरी वेगळं करून तुम्ही तुमची संध्याकाळ मजेत घालवू शकता आणि शिवाय त्या लोकांनाही एक वेगळा आनंद मिळतो.

प्रायव्हेट पार्टी

ADVERTISEMENT

Holi Eve
तुम्ही जर अगदी पार्टीमध्ये एन्जॉय करणाऱ्या व्यक्ती असाल तर, तुम्ही संध्याकाळी खास माणसांसाठी पार्टी ठेऊ शकता. बऱ्याचदा रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या माणसांशी बोलू शकत नाही. वेळ देऊ शकत नाही. पण अशा पार्टीमध्ये अगदी मोजकीच माणसं असतात. त्यांंना रंगपंचमीच्या शुभेच्छा द्या. आपण खास त्यांच्यासाठी वेळ काढून आपली आणि अगदी त्यांचीही संध्याकाळी मजेशीर करू शकतो. त्यामुळे तुमच्यातील आलेला दुरावा कमी होण्यासही मदत होते.

झोप घेणं
तुम्ही जर रोजच्या दगदगीने कंटाळला असाल आणि रंग खेळून दमला असाल तर तुम्ही तुमच्या रूममध्ये मस्तपैकी आराम करा. इतक्या दिवसांची राहिलेली झोप तुम्ही पूर्ण करू शकता. पण त्यापूर्वी काहीतरी हलकं फुलकं खायला विसरू नका. म्हणजे जर जास्तच दमायला झालं असेल तर तुम्हाला अगदी सकाळीच जाग आली तरी चालेल.

हेदेखील वाचा –

‘भारत’मध्ये होळी-दिवाळीच्या गाण्यावर दिसणार सलमान-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री

ADVERTISEMENT

 

होली की हार्दिक शुभकामनाएं और संदेश

18 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT