ADVERTISEMENT
home / मनोरंजन
परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी निया शर्मा होती दोन दिवस उपाशी

परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी निया शर्मा होती दोन दिवस उपाशी

निया शर्मा आणि रवि दुबे यांची जोडी पुन्हा एकदा जमाई राजा 2.0 मधून झळकणार आहे. या वेबसिरिजमघ्ये सर्वात जास्त चर्चेत आहे नियाचा बिकिनी लुक. निया या शोमध्ये हॉट आणि दिलखेचक बिकिनी लुकमध्ये दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या हा परफेक्ट बिकिनी लुक व्हायरल होत आहे. नुकतंच नियाने या तिच्या परफेक्ट बॉडीशेपमागे लपलेलं  रहस्य उघड केलं आहे.

नियाच्या बॉडीशेपचं रहस्य

नियाचा जमाई राजा 2.0 मधला ब्लॅक बिकिनीमधला लुक ट्रोल झाला होता. मात्र हा लुक मिळवण्यासाठी नियालाही बरंच काही सोसावं लागलं असं तिचं म्हणणं आहे. नियाच्या मते परफेक्ट बॉडीशेपसाठी ती एक दोन तास नाही तर चक्क दोन दिवस उपाशी होती. शूटच्या आधी दोन दिवसापूर्वी तिने तिचं खाणं पिणं पूर्णपणे बंद केलं होतं. कारण तिला या शोमध्ये परफेक्ट शॉट द्यायचा होता. ती शूट आधीच या शॉटसाठी वेडी झाली होती. या शॉटबद्दल सतत तिच्या मनात विचार सुरू होते. तिला आधीच या शोमध्ये कसे सीन्स असणार हे माहीत होतं. शिवाय या शोमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी ती काहिही करायला तयार होती. तिला बिकिनीमध्ये परफेक्ट दिसायचं होतं यासाठी ती तिच्या बॉडीशेपवर खूप मेहनत घेत होती. आश्चर्य म्हणजे यासाठी दोन दिवस उपाशी राहिल्यावर जेव्हा हा सीन शूट करण्याची वेळ आली तेव्हा अचानक शूटिंग रद्द केलं जाणार होतं. कारण ढगांमुळे सर्य झाकला गेला होता आणि शूटिंगसाठी वातावरण योग्य नव्हतं. नियातर तिच्या शूटसाठी उत्साही आणि सज्ज झाली होती. त्यामुळे शूट रद्द होणार हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं. मग तिने स्वतःचे काही फोटो क्लिक केले आणि इन्साग्रामवर शेअर केले. या फोटोवर लाईक्सचा एवढा पाऊस पडला की ते एका क्षणात व्हायरल झाले.

प्रेक्षकांना का फसवत आहे निया शर्मा

नियाच्या मते ती तिच्या चाहत्यांना खरंतर या फोटोजमधून फसवत आहे. कारण बिकिनीमध्ये पोट सपाट दिसण्यासाठी तिला असं उपाशी राहावं लागतं. तिचं पोट नेहमीच असं फ्लॅट दिसत नाही. त्यामुळे चांगलं फोटोशूट करण्यासाठी तिला तिच्या चाहत्यांना फसवून असं काहितरी करावं लागतं. जमाई राजा 2.0 ला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरिजमध्ये निया आणि रवि दुबेचे अनेक बोल्ड सीन असणार आहेत. 

निया आणि रविचं नातं

2013 साली टेलिव्हिजनवर ‘जमाई राजा’ हा शो पहिल्यांदा सुरू झाला होता. या शोमध्ये निया शर्मा आणि रवि दुबेच्या जोडीला चांगली पसंती मिळाली. म्हणूनच आता पुन्हा एकदा वेबसिरिजच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या मालिके दरम्यान निया आणि रविमध्ये काही मदभेद असल्याची चर्चा होती. ते दोघंही वेगवेगळ्या स्वभावाचे असल्यामुळे एकमेकांची काम करण्याची पद्धत त्या दोघांना आवडत नव्हती. मात्र त्यांची जोडी प्रेक्षकांना इतकी आवडत होती की त्यांना एकमेकांमधील मदभेद विसरून प्रोफेशनल व्हावं लागलं.  आता ते दोघंही पुन्हा एकदा  प्रेक्षकांना त्यांच्या  जोडीची धमाल दाखवण्यास सज्ज झाले आहेत. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

बॉलीवूड अभिनत्री ज्यांनी थाटला क्रिकेटर्ससोबत संसार

मालदिव्जमध्ये आहे बिपाशा बासू, शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

ADVERTISEMENT

व्हर्च्युअल नामकरण सोहळा तुफान व्हायरल, सचिन देशपांडेची तुफान कल्पना

28 Feb 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT