प्रियंका-निकचं हे ‘बेडरूम सिक्रेट’ तुम्हाला माहीत आहे का

प्रियंका-निकचं हे ‘बेडरूम सिक्रेट’ तुम्हाला माहीत आहे का

बॉडीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉडीवूडप्रमाणेच हॉलीवूडचंही हॉट कपल आहे. या दोघांच्या फोटो आणि मॅरीड लाईफची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. 2018 साली डिसेंबरमध्ये प्रियंका आणि निकने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. प्रियंका आणि निकचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे लग्नानंतर सतत त्यांच्याविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रियंका निकपेक्षा मोठी आहे तरी त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा कोणताच परिणाम झालेला नाही. प्रियंका आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल चाहते सतत काहीतरी चर्चा करतच असतात. काही दिवसांपासून प्रियंका आणि निक बेबी प्लॅन करत असल्याच्या बातम्यादेखील सोशल मीडियावर वारंवार येत आहेत. काही चुकीच्या पद्धतीने काढलेल्या फोटोमुळे प्रियंकाचे बेबी बंप दिसत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.  आता या दोघांबद्दल आणखी एका गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.


Priyanka Nick Bedroom Secret


निक आणि प्रियंका बेडरूममध्ये पाळतात हे नियम


प्रियंका आणि निक त्यांच्या वैवाहिक जीवनात फार खुश आहेत. लग्नानंतर सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो आणि हॅपी मुव्हमेंट्स शेअर करत असतात. मात्र घरी मात्र प्रियंकाने झोपण्याआधी काही कडक नियम सुरू केले आहेत. हे नियम प्रत्येक वैवाहिक जोडप्यासाठी उपयुक्त आहेत. एका मुलाखतीत प्रियंकाने तिचं बेडरूम सिक्रेट खुलं केलं आहे. या बेडरूम सिक्रेटमुळे निक आणि प्रियंका पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत  आहेत.


Priyanka Nick Bedroom Secret 1


बेडरूममध्ये मोबाईलला आहे मनाई


लग्नाच्या पूर्वी तुम्ही कसेही वागत असला तरी तरी लग्नानंतर काही गोष्टींबाबत बदल आणि तडजोड हे दोघांकडून व्हाययला हवेत. प्रियंका आणि निकने त्यांच्या वैवाहिक जीवनात हे बदल केले आहेत. ज्यांचे ते काटेकोरपणे पालन करण्याचा करत आहेत. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे दोघांपैकी कोणीच बेडरूममध्ये मोबाईल फोन वापरायचा नाही. हा नियम प्रियंका आणि निक सक्तीने फॉलो करतात. कारण प्रियंका मोबाईल आणि सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते  ज्यामुळे हा नियम फॉलो करण्यासाठी प्रियंकाला फारच त्रास होत होता. म्हणूनच निकने प्रियंकाला मोबाईल बेडरूम बाहेर ठेवण्याची सक्ती केली आहे. प्रियंकादेखील सध्या निकचे याबाबतीत ऐकत मोबाईल पासून दूर राहण्यास सुरूवात केेली आहे. सुरूवातीला मात्र प्रियंकाला हा नियम पाळण्यासाठी थोडासा त्रास झाला. 


Priyanka Nick Bedroom Secret 2


या बेडरूम सिक्रेटमुळे होईल तुमचं वैवाहिक जीवन होईल सुखी


वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होण्यासाठी दोघांनीदेखील हा नियम स्वतःला लावून घेतला आहे. शिवाय लग्नानंतर कपल्स बेडरूममध्ये आपापल्या मोबाईलवर व्यस्त असतील तर ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. सध्या अनेक विवाहित जोडप्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लग्नानंतर बेडरूममध्ये मोबाईल स्वतःपासून दूर ठेवणं प्रत्येकालाच जमतंच असं नाही. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक जीवनात भांडणं आणि कलह निर्माण होतात. म्हणूनच लग्नानंतर प्रत्येक जोडप्याने हे बेडरूम सिक्रेट फॉलो करायलाच हवं.


Priyanka Nick Bedroom Secret 4


हा #Hot सेलिब्रिटी करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण


Lovestory : मिलिंद सोमण आणि अंकिता कोन्वर


सलमानच्या फॅनने ‘भारत’साठी बुक केलं संपूर्ण थिएटर


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम